जास्त ऐकण्याचे व कमी बोलण्याचे फायदे | The benefits of listening more and talking less.
मराठी मधील हि म्हण ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ आपल्या परिचयाची नक्कीच असेल. याचा अर्थ विचार न करता एखाद्या विषयावर बोलणे आणि तोंडावर पडणे. आणखी एक म्हण आहे बघा ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ जास्त काही गुण आणि कौशल्य नसताना व्यक्ती जास्त बढाई मरतो. अश्या प्रकारच्या लोकांना कमी बोला, जास्त ऐका, कमी प्रतिक्रिया द्या, जास्त निरीक्षण करा असा सल्ला दिला जातो.
कमी बोला व जास्त ऐका | Talk less, listen more essay
आजच्या ब्लॉग द्वारे आपण ‘कमी बोला व जास्त ऐका’ या तत्वाचे महत्व आपणास समजावून सांगणार आहे. कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. दोन्ही बाजू क्वचितच समान असतात, अन्यथा एखादी बाजू उजवी असते तर एखादी हि कमजोर असते. व्यक्ती त्याच्या ज्ञानेंद्रियेद्वारे ज्ञान ग्रहण करीत असतो. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाद्वारे आपण ज्ञान मिळवतो. जसे की, सर्वात जास्त आपण डोळ्याने 83 टक्के ज्ञान मिळवतो. कानाने 11 टक्के, नाकाने 2 टक्के, जिभेने 3 टक्के व त्वचेने 1 टक्के असे ज्ञान आपल्याला मिळते. डोळ्या खालोखाल कानाने जास्त ज्ञान मिळते हे येथे लक्षात घ्यावे. त्यामुळे बोलण्यापेक्षा जास्त ऐकले की फायदा होतो शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होते. बोलण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते तेवढी उर्जा ऐकण्यासाठी लागत नाही.
कमी प्रतिक्रिया द्या, जास्त निरीक्षण करा | React less, observe more
शब्द हे शस्त्रासारखे असते. कारण शारीरिक जखमेपेक्षा शाब्दिक जखम मोठी असते. शारीरिक घाव लवकर बरे होते शाब्दिक घाव दीर्घ बरे होत नाही. मनाला वेदना देतात. कोणी जवळच्या व्यक्तींनी तुमच्यावर शाब्दिक चिकलफेक, गंभीर टीका केली त्यांचे बोलणे आपल्याला मनात दीर्घ टोचत राहते. अशी बोललेली व्यक्ती दिसताच क्षणी आपण नकारत्मक प्रतिक्रिया झटकन देतो. क्रोधीत होतो. वेळप्रसंगी शाब्दिक चकमक करतो. यातून संबध बिघडतात. त्यामुळे कोणालाही कोणतीही प्रतिक्रिया देताना सावधपने द्यावे. देण्याची कधीही घाई करू नये. शब्दांचे अनेक अर्थ असतात. समोरील व्यक्तीवर ठरते कि ती कशी अर्थ लावते. अनपेक्षित समोरच्यानी जरी अर्थ घेतला तरी तुम्ही कमीत कमी त्यांना प्रतिक्रिया द्या आणि त्याऐवजी स्थिती निरीक्षण करा.
जाणून घ्या एकूण घेण्याचे १० फायदे | 10 benefits of listening.
1. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडून अधिक समज वाढते.
2. समोरील व्यक्ती आपल्यात रस (Interest ) दाखवते त्यामुळे परिणामी बोलणाऱ्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यास मदत होते.
3.बोलनेच्या फक्त ऐकल्याने शरीरातील ऊर्जा कमी वापरली जाते आणि उर्जाची बचत होते.
4.आज्ञाधारक हा गुण आपल्यात विकसीत होते.
5.दुसऱ्याचे मन हलके करण्यास आपण मदत करतो.
6. जास्तीत जास्त ऐकण्याची सवय लागल्यामुळे आपल्या अनुभवात भर पडून आपले संभाषण कौशल्य सुधारते.
7.या सवयी मुळे अनावश्यक बडबड आपली कमी होते. कामाचे आणि मोजकेच आपण बोलू लागतो.
8. इतरांना तुम्ही आवडू लागता कारण बोलणे कमी व कृती जास्त तुमच्याकडून होऊ लागते. बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ हे या साठी म्हटले जाते.
9. आधी करावे आणि मग सांगावे ही उक्ती तुम्हांला लागू पडते.
10. अनावश्यक बडबड ही एक सवय आहे, ती प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त ऐकण्याची सवय लावून आपण कमी करू शकतो.
कमी बोलण्याचे फायदे
1. तुम्ही कमी बोलणारे आहात असे इतरांना समजले तर लोक जेव्हा तुम्ही बोलला तेव्हा गांभीर्याने तुमचे बोलणे ऐकतील.
2. कमी कसे बोलायचे याचे एक सूत्र आपणास येथे सांगत आहे. जेव्हा कोणी आपणास प्रश्न विचारले अथवा बोलेल त्यावेळी तुम्ही त्यांना शब्दात उत्तर द्या.समोरील व्यक्तीचे समाधान न झाल्यास वाक्यात उत्तर द्या. त्यानंतर हि नाही समाधान झाल्यास तुम्ही थोडक्यात किंवा सविस्तर उत्तर द्या.
3. समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. गरज नसतात अनावश्यक कोणती गोष्ट लोकांना शेयर करू नका.
4. परिस्थिती पाहून संवाद थांबविणे आवश्यक आहे.
5. लोक तुमच्याकडून जे ऐकू इच्छित आहे ते त्यांना ऐकवावे.
6. कोणत्याही गोष्टीचे विषयांतर करता कामा नये. वेळीच मूळ विषयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
7. गोष्टी एकदम सोप्या भाषेत करून समोरील ऑडियन्स/प्रेक्षक पाहून मांडणी करीत जावे.
8. समोरच्याच्या हृदयात आस्था /स्थान मिळवू शकतो. लोकांना तुमचे व्यक्तिमत्व आवडू लागते.