ई-श्रम कार्डचे फायदे | Benefit of E-Shram Card
कामगारांचे कल्याण करणारे ई-श्रम कार्ड.
जाणून घ्या केंद्र सरकारचा ई-श्रम योजना व पोर्टल सुरु करण्याचा उद्देश.
ई-श्रम कार्ड काढा आणि द्या तूमच्या कुटुंबीयास 2 लाख रुपयाचे विमा कवच. ई-श्रम कार्डधारक व्यक्तीच्या वारसदाराला मिळणार दोन लाख रुपये. जाणून घ्या ई-श्रम बदल संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत.
२६ ऑगस्ट-२०२१ रोजी केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल सुरु केले आहे. याद्वारे देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि कामगारांविषयी संपूर्ण माहिती या पोर्टलद्वारे गोळा केली जाणार आहे. या पोर्टलचा मुख्य उद्देश हा देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी आहे.
या पोर्टल वर नोंदणी केल्यावर ‘युनिक आयडेंटिफिकेशन नंबर कार्ड’ मिळते. कार्ड केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयद्वारे देण्यात येते. ई-पोर्टल स्वःता नोंदणी करू शकतो अथवा CSC सेवा केंद्राद्वारे नोंदणी मोफत करावयाचे आहे. पोर्टलवर नोंदणी केल्यावर (यूएएन कार्ड UAN E- Sharmaik ) डिजिटल कार्ड देण्यात येते.
ई श्रम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी कोण करू शकतो | ई श्रम कार्ड करिता पात्र व्यक्ती कोण
- देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुर तसेच ज्यांचे हातावर पोट आहे आणि ज्यांना 15 हजार पेक्षा कमी पगार आहे त्याचबरोबर सदरची व्यक्ती ही Tax पेयर नसावी व अशी सर्व व्यक्ती.
- रविवारची सुट्टी किंवा कामाची सुट्टी घेतल्यावर ज्यांना पैसे मिळत नाही अश्या सर्व व्यक्ती.
- ज्यांचे PF व PPF कट होत नाही अश्या सर्व व्यक्ती.
- ज्यांना EPFO आणि ESIC लागू नाही अश्या सर्व व्यक्ती.
अशी कोणतीही व्यक्ती जे वरील सर्व निकष पूर्ण करते. त्याचबरोबर ज्याचे वय १६ पेक्षा अधिक व ५९ वर्षाच्या आत आहे. अशी व्यक्ती नोंदणी करण्यास पात्र आहे. उदाहरण म्हणून खाली काही परिचयाच्या असणाऱ्या व्यवसायांची टेबल पाहू शकता.
स्थलांतरित कामगार | दुध उत्पादक | मच्छीमार, सॉ मिल कामगार |
घरकाम करणाऱ्या | मीठ कामगार | पशुपालन कामगार |
तार रेशीमकाम कामगार | ऑटो चालक | टॅनरी कामगार |
लहान आणि सीमांत शेतकरी | सेरीकल्चर कामगार | इमारत आणि बांधकाम कामगार |
कृषी श्रम करणारे शेत मजूर | नाव्ही | लेदर वर्कर्स |
रस्त्यावर विक्रेते | वृत्तपत्र विक्रेते | सुईणी |
आशा कामगार | रिक्षाचालक | घरगुती कामगार |
असंघटीत क्षेत्रात येणारे विविध व्यवसायआहेत. ई श्रम कार्ड नाव येण्यासाठी शासनांनी अश्या व्यवसायांच्या कोडची एक यादी तयार केली आहे. त्या करिता खालील Download NCO code व्यवसाय यादी यावर क्लिक करून आपण पाहू शकाल.
ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे
1) नाव, 2) व्यवसाय, 3) पत्त्याचा पुरावा, 4) कौटुंबिक तपशील, 5 )शैक्षणिक पात्रता, 6) कौशल्य तपशील 7) आधार कार्ड, 8) रेशन कार्ड, 9) जन्म प्रमाणपत्र, 10) मोबाईल क्रमांक [आधार कार्डशी जोडलेले] , 11) बँक पासबुक, 12 ) वीज बिल.
वरील पैकी अनिवार्य 4 कागदपत्रे लागतील. रजिस्ट्रेशन करण्याकरिता लागणारे माहिती कागदपत्रे त्यामध्ये
1) आधार कार्ड,
2)आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नं. आधारशी मोबाईल नं जोडला नसला तरी तुमच्या जवळ कोणताही मोबाईल असणे गरजेचे आहे कारण त्यावर OTP (One Time Password ) साधारणपणे तो 6 अंकी असतो.
3)नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा बँक पासबुक हे खूप महत्वाचे दस्तावेज आहे. कारण जेव्हा सरकार कडून कोणतीही आर्थिक मदत भविष्यात केली जाईल तेव्हा तुम्ही जे ई-श्रम कार्ड काढताना जे बँक तपशील देता तेव्हाच ते मिळतील म्हणून बँक पासबुक गरजेचे आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे व चालू असावे. जन-धन अंतर्गत जे खाते ही चालेल.
4) चौथ्या अनिवार्य दस्तावेज म्हणजे वारसदार यांचे नाव व जन्म तारीख. घरातील वारसदार म्हणून आई, वडील, लहान भाऊ, बायको मुलगा मुलगी असे रक्त नाते संबधातील कोणतीही व्यक्ती लावू शकता. तुमच्या अवलंबून असलेल्या व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून द्यावे.
वारसदार यांची माहिती देताना घ्यावयाची काळजी
वारसदार व्यक्तीचे नाव सांगताना आधार कार्ड वर जे नाव व जन्म तारीख जुळेल तेच सांगावे. सदरच्या व्यक्तीचे बँकेच्या पासबुक वर तेच नाव असायला पाहिजे जे आधार वर आहे. त्याच्या बँकेला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे.
जेव्हा असंघटीत क्षेत्रात काम करताना जर ई श्रम कार्ड धारक असणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यु झाला तर त्याच्या वारादाराला रुपये 2 लाख मिळू शकतील. कारण या योजनेला प्रधानमंत्री अपघात विमा योजना जोडलेली आहे.
या योजनेला प्रत्येक भारतीय नागरिक याचा लाभार्थी आहे. वर्षाला १२ रुपये इतकी रक्कम आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेतून कट होतात. आपण आपल्या बँकेत जाऊन या योजनेची formalities केली की वारसदारास रुपये 2 लाख मिळतात. कोविड-19 मुळे अनेक व्यक्ती मृत पावल्या होत्या. त्यांचे १२ रुपये दरवर्षी कट होत होते म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये काही बँक कडून देण्यात आले होते.
अनेक जण प्रश्न उपस्थित करतात की, खरोखरच पैसे मिळणार का? त्याकरिता माझे वरील स्पष्टीकरण पुरेसे आहे. सरकारकडील हक्क सहज मिळत नाही. त्याकरिता व्यक्तीला हातपाय हलवावे लागते. संघटीत व्हावे लागते. संघटीत यासाठी की जर एखादी बँक अथवा सरकारी यंत्रणा तुमचा क्लेम ( हक्क ) नाकारला की संघटीत दबाव कामाला येतो.
ई श्रम कार्डचे फायदे
- राष्ट्रीय ओळखपत्र ID Proof म्हणून वापर करू शकता.
- असंघटीत क्षेत्रात नेमके कोणते काम तुम्ही करता याबद्दल पुरावा देणारे कार्ड आहे.
- कार्डधारक व्यक्तीचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास रुपये 2 लाख मिळणर.
- कार्डधारक व्यक्तीचा कामावर असताना अपघाती दुर्घटना घडून जर अपंगत्व आले तर त्यांना रुपये 1 लाख मिळणर.
- शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या सर्व योजनाच्या लाभ मिळण्यास सुरुवात होईल ( राशन, हेल्थ विमा-आयुष्मान भारत, घरकुल योजना, बेरोजगार भत्ता, बेरोजगारांना नोकरी )
- नैसर्गिक आपत्ती, साथ रोगप्रसार काळात जे टालेबंधी ( Lockdown) झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत होऊ शकते.
ई -श्रम नोंदणी करिताची प्रक्रिया
1) ई श्रमिक पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी, आपल्याला प्रथम अधिकृत वेबसाइटवर किंवा सीएससी सेंटर ला जावे लागेल.
1.1 ) ई–श्रम वेबसाइट लिंक – https://www.eshram.gov.in/ या वेबसाईट जाऊन स्वःता नोंदणी https://register.eshram.gov.in/#/user/self या लिंक वर जाऊन करू शकता. किंवा जवळच्या CSC, महासेवा केंद्र येथे जाऊन करू शकता.
2)त्यानंतर होम पेजवर तुम्हाला ‘ सेल्फ रजिस्ट्रेशन ‘ चा पर्याय निवडावा लागेल .
3)त्यात, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल जो आधार कार्डाशी जोडलेला आहे. जर आधार मोबाईलशी जोडला नसेल तर थम्ब मशीन द्वारे तुम्ही नोंदणी करू शकता.
4)त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल.
5)फाइल केल्यानंतर, तुम्हाला EPFO आणि ESIC साठी YES / NO चा पर्याय निवडावा लागेल.
6)त्यानंतर तुम्हाला ‘ ओटीपी पाठवा ‘ वर क्लिक करावे लागेल .
7) आता तुम्हाला एक OTP मिळेल. विचारलेल्या विभागात OTP प्रविष्ट करा.
8)आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि नियम व अटी मान्य करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
9) परत आपणास एकदा OTP विचारेल ते टाकल्यावर तुमच्या आधारशी जोडलेली माहिती आपणास दिसेल. त्या माहिती मध्ये आपल्याला बदल करता येत नाही. जर आधार वरील तपशिलात बदल करायचे असल्यास तुम्हांला आधार केंद्रावर जाऊनच करावे लागेल.
10 )अर्ज तुमच्या समोर उघडेल, विचारलेल्या प्रमाणे तुम्हाला तो भरावा लागेल.
11)आवश्यक तेथे जर कागदपत्रे असतील तर ती अपलोड करावी लागतात. ITI किंवा इतर कोणताही कोर्स तुम्ही केलेला आहेत. आता बेरोजगार आहात तर त्या केस मध्ये सरकारकडून नोकरी मिळू शकते.
12) सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करून शेवटी सबमिटवर क्लिक करा आणि ई श्रम कार्ड डाउनलोड करून घ्या.
शेवटी रजिस्ट्रेशन end करावे. ही प्रक्रिया संपल्याचा SMS संबधित व्यक्तीला येईल. डाउनलोड केलेल्या कार्डचे कलर प्रिंट काढून त्यांचे लमिनेसन करून घ्यावे.
ई -श्रम नोंदणी करिताची प्रक्रिया समजून घेण्यासाठी पुढील लिंक वर जाऊन व्हिडीओ पाहावे. https://www.youtube.com/watch?v=yBwUfGrTRQY
ई- श्रम कार्ड वरील माहिती मध्ये बदल कसे करायचे. How to update E-Shram card
ई- श्रम कार्ड वरील माहिती मध्ये बदल करायचे असल्यास अथवा पत्ता मध्ये बदला करायचे असल्यास तुम्ही ई-श्रम पोर्टल वरील दिलेल्या लिंकच्या सहाय्याने करू शकता .
प्रथम लिंक वर जावा, आधारशी लिंक असणारा मोबाईल नं टाका. OTP येईल तो टाका. कॅप्चा कोड टाका. नंतर तुमचा आधार कार्ड नं टाका. आधारशी लिंक असणाऱ्या मोबाईल OTP येईल तो टाका. नंतर दिसत असलेला कॅप्चा कोड टाका.
नंतर नियम व अटी मान्य करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. इतकी प्रक्रिया केल्यावर तुम्ही उघडलेल्या पेज वर Already Registered नावाचा मेनू दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर update profile हा पर्याय दिसेल. खालील फोटो मध्ये आपण पाहू शकता नेमके कुठे हा पर्याय आहे ते.
त्यावर जावून तुम्ही तुमच्या आधीच्या माहिती मध्ये आवश्यक बदल करून Save/ update करू शकता. पुन्हा अपडेट झालेला कार्ड डाउनलोड करू शकता.
कामगारांना मार्गदर्शन व त्यांच्या शंकांचे निरसन करिता राष्ट्रीय निशुल्क हेल्पलाईन नं -14434.