सामान्यज्ञान आणि समाजशास्त्र | Sociology and Common sense
मागील पोस्ट मध्ये आपण सामान्यज्ञान म्हणजे काय ते पहिले. या पोस्ट मध्ये आपण सामान्यज्ञान आणि समाजशास्त्र यांतील फरक ( Sociology and Common sense ) पहाणर आहोत.
सामान्यज्ञान आणि समाजशास्त्र यांतील फरक | Difference in Sociology and Common sense
सामान्यज्ञान ( Common sense ) | समाजशास्त्र ( Sociology ) |
1. सामान्यज्ञान हे वैयक्तिक आणि नैसर्गिक गृहितकांवर आधारित असतात. जे एखाद्या व्यक्तीने बनवले असते आणि ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या नियमाप्रमाणे हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. लोकप्रिय श्रद्धेवर आधारित असतात. | 1. समाजशास्त्र हे शास्त्रीय पद्धतीवर अवलंबून असते. हे सामान्यज्ञानापेक्षा वेगळे आणि अधिक प्रगतशील असते. एक ज्ञानशाखा म्हणून समाजशास्त्रात गोष्टींचा अभ्यास केला जातो. |
2. सामान्यज्ञान व्यक्तीपरत्वे भिन्न असते आणि ज्या कुटुंबात जन्माला येतो त्या कुटुंबाच्या चालीरीती आणि विश्वासांवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे, सामाजिक बदलांची गरज नाही त्यांना वाटत नाही. जैसे-थे (status quo) स्थिती असते. | 2. समाजशास्त्रामध्ये, पुराव्याच्या गुंतागुंतीच्या तपशिलांचा तसेच विश्वासांचा अभ्यास केला जातो आणि काय लागू केले जाऊ शकते आणि काय नाही यावर निर्णय घेतले जातात. गोष्टी सत्यात्याने पडताळून पहिल्या जातात. सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. क्रियाशील बदल अपेक्षित असते. (Active change) |
3. सामान्यज्ञानमध्ये असा कोणताही ठरलेला नियम नाही की विशिष्ट सिद्धांत प्रत्येकाला लागू होईलच (कारण लोकांची मते परस्परविरोधी आहेत). काही वेळा सामान्यज्ञानाचा उपयोग होत असला तरी तो पद्धतशीर अभ्यासातून पुढे न आलेले असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अचूक अंदाज लावता येत नाही. | 3. समाजशास्त्रात, समजुती तसेच पुरावे यांचे सविस्तर संशोधन करून कोणते सिद्धांत तथ्य किंवा काल्पनिक आहेत यावर समाजशास्त्रज्ञांचे संशोधन करून मांडणी असते. |
4. एखाद्या व्यक्तीचे सामान्य ज्ञान फक्त एक गृहितक. या प्रकरणात, एखाद्याच्या विश्वासाच्या समर्थनासाठी कोणताही पुरावा नाही. | 4. समाजशास्त्रीय सिद्धांत हे केवळ गृहितक नसून समाजशास्त्रज्ञ पुरावे गोळा करून आणि त्यांचा सखोल अभ्यास करून सिद्धान्तांवर निष्कर्ष काढतात. हे संशोधन पाहता, या सिद्धांतांनी मांडलेले मुद्दे विश्वासार्ह आहेत आणि वास्तविक जीवनाला खऱ्या अर्थाने लागू आहेत. |
5. सामान्य ज्ञान वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. | 5. समाजशास्त्र हे समाजाकडे व्यक्तींच्या दृष्टीने नव्हे तर समग्रपणे संपूर्णपणे पाहते. |
6. विविध परिस्थितींचा अनुभव घेताना सामान्य ज्ञान विकसित होते | 6. समाजशास्त्र केवळ वैयक्तिक अनुभव नसलेल्या विचारांची मागणी करते. |
सामान्यज्ञान आणि समाजशास्त्र यातील भेद
सामान्यज्ञान खूप मर्यादित असते. या उलट समाजशास्त्रीय निष्कर्ष वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या मोठ्या संख्येने लोकांना लागू होतात. त्यामुळे ते व्यापक आहेत. समाजशास्त्रमध्ये समाजाचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. मात्र सामान्यज्ञानमध्ये याचा अभाव असतो. ते परंपरेने तयार झालेले असते. पण, याचा अर्थ असा नाही की, सामान्यज्ञान याचा काही उपयोगच नाही. सामान्य ज्ञान खूप उपयुक्त आहे. खरं तर, अनेक समाजशास्त्रज्ञांना त्यांच्याबद्दल विचार करण्यास आणि त्यांची चौकशी करण्यास मदत केली आहे. तर, सामान्यज्ञान आणि समाजशास्त्र दोन्ही भिन्न आहेत, पण जवळून विणलेले आहेत. सामान्यज्ञान हे समाजशास्त्राला कच्चा माल पुरवते. म्हणजेच अध्ययनाला आशय पुरवते.