नैराश्य | डिप्रेशन म्हणजे काय | Depression in Marathi
अपेक्षाभंग होणे, मनासारखी एखादी गोष्ट न होणे अशी इतर ही काही कारणे असतात जे नैराश्य माणसाला आणते. मना विरुद्ध एखादी गोष्ट झाली तरी त्यातून पटकन बाहेर पडायला पाहिजे नेमके येथेच घोडचूक होते. बाहेर पडण्याऐवजी त्याच गोष्टीत गुंतत जातो. व्यक्ती डिप्रेशनची शिकार होते. व्यक्ती एकच गोष्ट घेऊन बसतो. त्यामुळे आणखीन नैराश्य वाढत जाते.
जर आपणस खालील लक्षणे असतील, खालील परिस्थिती व तुम्ह जात आहात तर तुम्हांला नैराश्य आले आहे किंवा तुम्ही नैराश्याचे शिकार होत चाललेले आहात समजायला हरकत नाही.
नैराश्य लक्षणे
- या काळात कशातच मन लागत नाही.
- अन्न जात नाही.
- नीट झोप पण लागत नाही.
- पहाटे दोन आणि तीन लाच जाग येते, नंतर झोप येत नाही.
- राहून राहून तेच तेच विचार आपल्या डोक्यात नुसते घोळत राहते. मार्ग काही निघत नाही. आपण असे करू तसे करून नुसते विचार सुरु असते.
- आपल्या आजूबाजूला काय चाललय याचे भान राहत.
- कोणत्याच गोष्टीचे कौतुक ही वाटत नाही. कधी
- सकारात्मक विचार तर, सायंकाळी पर्यत नकारात्मक विचार कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. घेतलेला निर्णय क्षणात बदलतो.
- स्वतःला काय झाले हे कळत नाही दुसऱ्यांना सांगता येत नाही.
नैराश्यमुळे डोक्यात केमिकल लोच्या होतो.
आपल्या डोक्यातील बिघडलेल्या केमिकल लोच्यामुळे नैराश्यवाढत जाते. हा केमिकल लोच्या कुणाचे प्रेम भंग झाल्यामुळे होतो तर, कुणाचे कोणाशी तरी संबंध बिघडल्यामुळे होते, कुणाचे नातेवाईक सोबतच्या भांडणामुळे होते, तर तर काहींचे जॉब गेल्यामुळे होते. अशी बरीच करणे असतात. काही कारणे अशी असतात की आपण कोणालाच सांगू शकत नाही. व्यक्ती देवदास बनतो.
नैराश्याच्या स्थितीमध्ये जीवन नको वाटते.
या काळात कोणाचाही सल्ला आपल्याला उपयोगी पडत नाही. आपले विचारच आपल्या मर्यादा तयार करतात. जीवन नको वाटत असते. आनंद हरवून गेलेलं असतो. आपण सांगतो तसे या काळात एखादी गोष्ट नाही झाली ना मग आपण एकदम आपल्या जवळच्या माणसांवर चिढतो. सगळ्यांना जबाबदार आपणच असतो. या काळात जवळच्या जेष्ठ नातेवाईक यांचे मने सांभाळण्याचा नादात आपणच आपले दुख वाढवतो.
नैराश्यामध्ये विस्मरण वाढते जाते.
विस्मरण वाढत जाते. काहीच लक्षात राहत नाही. अगदी वर्ग मित्रांची नावे सुद्धा आपण विसरतो. तब्येत खालावत जाते. घराचे सुद्धा आपल्याला वैतागलेले असतात. त्यांना आपली काळजी ही वाटत असते. ते काही करू शकत नाही. पण अश्या परिस्थिती घरच्या आपल्याला नकळत आधार असतोच. अश्या अवस्थेत ज्यांना सपोर्ट मिळत नाही. त्यांच्या साठी अतिशय वाईट काळ असतो हा. काही जण आत्महत्या करतात. तर काही जण मानसिक रुग्ण बनतात.
नैराश्यात व्यक्तीची अवस्था ही पंख छाटलेल्या एखाद्या पक्ष्या सारखी होऊन जाते.
काळात आपली अवस्था ही पंख छाटलेल्या एखाद्या पक्ष्या सारखी होऊन जाते. सगळे काही संपले असे वाटते. आपण पूर्वी सारखे आपण राहिलेले नसतो. इगो, घमंड काहीच नसतो. आपण पूर्णतः जमिनीवर येते. अशी स्थिती आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी येतेच. कशाने येईल, कधी येईल हे सांगता येत नाही.
नैराश्यावर मात कसे कराल. नैराश्या घालविण्यासाठी कोणते उपाय कराल याकरता पुढील लिंक वर जा. नैराश्य कसे दूर करावे | How To Overcome Depression