शिक्षण एक सामाजिक संस्था | Types of Education
शिक्षण ( education ) हा शब्द लॅटिन शब्द ‘educare’ या शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ जागृत करणे, वाढवणे किंवा ‘बालकांच्या सुप्त गुणांना बाहेर काढणे’ असा होतो. या पोस्ट मध्ये आपण शिक्षण एक सामाजिक संस्था कशी आहे हे पाहणार आहोत.
शिक्षणसंस्थेची प्रमुख कार्ये
- संस्कृतीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण करणे.
- व्यक्तीचे सामाजिकीकरण,
- व्यक्तीला रोजगार मिळविण्यास लायक करणे व तयार करणे. त्याचबरोबर
- सामाजिक नियंत्रण राखणे इत्यादी कामे मुलभूत सामाजिक संस्था म्हणून शिक्षण या संस्थेस करावे लागते.
शिक्षण यांच्या अनेक तज्ञांनी केलेल्या व्याख्या | Definition of Education
महात्मा गांधी यांनी केलेली शिक्षणाची व्याख्या.
गांधीजींच्या मते, शिक्षण म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा विकास होय. शिक्षण म्हणजे माणूस घडवणे होय असे त्यांनी सांगितले आहे.
गांधीजींनी शिक्षणाचे पुढील ध्येय असे असे सांगितले आहे.
- चारित्र्य निर्मिती करणे,
- सर्वांगीण विकास करणे,
- सांस्कृतिक शिक्षण देणे,
- आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे शिक्षण देणे
स्वामी विवेकानंद यांनी केलेली शिक्षणाची व्याख्या.
शिक्षण हे सुप्त परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे, जे मनुष्यामध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण याला घेऊन असलेले मत
रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण म्हणजे काय याबद्दल त्यांचे विचार पुढील प्रमाणे मांडले आहे
शिक्षण म्हणजे आत्मविष्कार होय. शिक्षण म्हणजे सत्य ज्ञानाचा साक्षात्कार होय.
ऋग्वेद मध्ये केलेली शिक्षणाची व्याख्या
शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी मनुष्याला स्वावलंबी आणि निःस्वार्थ बनवते.
उपनिषद मध्ये केलेली शिक्षणाची व्याख्या
शिक्षण हे मुक्तीसाठी आहे
भगवद्गीता मध्ये केलेली शिक्षणाची व्याख्या
बुद्धीपेक्षा अधिक शुद्ध पृथ्वीवर काहीही नाही.
शिक्षणाचे प्रकार | Types of Education
१) औपचारिक शिक्षण
2) अनौपचारिक शिक्षण
१) औपचारिक शिक्षण
चार भिंतीच्या आत देले जाणारे शिक्षण म्हणजे औपचारिक शिखान होय. औपचारिक शिक्षण हे शिक्षणाचे संरचित आणि पद्धतशीर प्रकार आहे.
ज्यात प्रशिक्षित शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना एका विशिष्ट दर्जाचे शिक्षण दिले जाते.
असे औपचारिक शिक्षण प्रमाणित आहे याची खात्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षण संस्था (उदा. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इ.) कार्यरत असतात. विशिष्ठ कालावधीमध्ये हे शिक्षण दिले जाते.
औपचारिक शिक्षण हे वर्ग आधारित असते. याचा अर्थ विद्यार्थी जे काही शिकतो ते पुस्तक आणि इतर शैक्षणिक साहित्य त्यांना ज्ञान दिले जाते.
सर्व शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित आणि मान्यता प्राप्त संस्थेद्वारे पात्रता धारण केलेले असतात.
2) अनौपचारिक शिक्षण
चार भिंतीच्या बाहेर राहून घेतले जाणारे शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण होय. हे शालेय शिक्षणाच्या चौकटीबाहेर संघटित केलेली पद्धतशीर शैक्षणिक कृती असते.
व्यक्तीचे निरंतर शिक्षण सुरु राहावे म्हणून सुरु केलेले हे शिक्षण असते.
अनौपचारिक शिक्षणाचे प्रकार
- चाकोरीबाहेरील बाहेरील सहज शिक्षण
- प्रासंगिक शिक्षण
- प्रौढशिक्षण
- अंशकालीन शिक्षण आणि
- निरंतर शिक्षण
हे शिक्षण वर्गाच्या बाहेर घडते. मग ते संग्रहालये आणि ग्रंथालयांसारख्या शैक्षणिक ठिकाणी किंवा घरातील किंवा गैर-शैक्षणिक संस्थांसारख्या शैक्षणिक ठिकाणी असो.
शिक्षणाची कार्ये ( शिक्षण एक सामाजिक संस्था )
- समाजीकरण
- व्यक्तिमत्वाचा विकास
- सामाजिक नियंत्रण
- सामाजिक एकात्मता
- स्थितीचे निर्धारण
- सामाजिक गतिशीलतेसाठी मार्ग प्रदान करते
- सामाजिक विकास
भारतातील उच्च शिक्षण: समस्या आणि आव्हाने
- शिकवण्याची गुणवत्ता.
- योग्य मूल्यधारित शिक्षण नाही.
- गरीब
- स्त्री शिक्षण.
- राजकीय घटक व राजकीय हस्तक्षेप:
- नैतिक मुद्दे.
- शिक्षणातील भ्रष्टाचार.
- आर्थिक अडचणी.
- नावनोंदणी:
- गुणवत्ता
- खराब पायाभूत सुविधा आणि सुविधा:
- अपुरे संशोधन:
- खराब शासन संरचना