फोनचा पॅटर्न लॉक विसरल्यास काढा 2 मिनिटात
तुमच्या फोनचा पॅटर्न लॉक विसरल्यास काढा 2 मिनिटात, फक्त पाच स्टेपमधील कृती करून काढा कोणत्याही मोबाईल पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक.
फोनचा पॅटर्न लॉक विसरल्यास खालील स्टेप्स करा.
1 स्टेप
सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या बाजूला असलेले बंद बटण ( Power off ) बंद करा म्हणजेच स्वीच ऑफ करा आणि एक मिनिट थांबा.
2 स्टेप
1 मिनिटानंतर स्वीच ऑफ झालेला मोबाईल सुरु करण्यासाठी असलेले बटन ( पॉवर स्विच ) आणि आवाज कमी होणारे बटन ( Volume down / V – ) बटण एकाच वेळी दाबून धरावे लागेल.
3 स्टेप
असे केल्याने तुमचा मोबाइल ‘रिकव्हरी मोड ( Recovery Mode) जाईल. रिकव्हरी मोड जाण्यासाठी दोन्ही स्विचेस [आवाज कमी होणारे बटन (Volume down ) आणि पॉवर बटण ] बराच वेळ दाबून ठेवा. आणि तुमचा मोबाइल रिकव्हरी मोडमध्ये जाईल.
4 स्टेप
रिकव्हरी मोडमध्ये गेल्यानंतर, ‘फॅक्टरी रीसेट ( Factory reset) पर्याय निवडा. आता ‘Wipe Cache’ वर क्लिक करा. असे केल्याने तुमच्या मोबाईल स्टोरेजमधील सर्व डेटा क्लिअर होतो. ( नवीन मोबाईल घेताना जसे मोबाईल असतो तसे होतो म्हणूने सर्व बाहेरून टाकलेले app निघून जातात. फोटो पण जातात.
5 स्टेप
यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण होताच, आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. 2-3 मिनिटाच्या प्रतीक्षेत केल्यानंतर तुमचा मोबाइल फोन पुन्हा पॉवर बटण दाबून चालू करा. तो पासवर्डशिवाय उघडेल.