जाणून घ्या, टू व्हीलर सर्विसिंग ची प्रक्रिया | Procedure to be done during two wheeler servicing
आजकाल प्रत्येकाच्या घरी एक तरी मोटारसायकल असते. सर्व जण त्यांचा वापरही करतात. कधीतरी आपण वापरत असलेली टू व्हीलर सर्विसिंग घेऊन जावे लागते. मग प्रश्न पडतो, टू व्हीलर सर्विसिंग करताना कोणत्या गोष्टी पहिल्या पाहिजेत. कोणती काळजी घ्यावे.
नवीन टू व्हीलर घेतली असेल तर, ज्या शोरूममधून आपण खरेदी केली आहे, त्यांच्या सर्विस सेंटर मधून काही फ्री सर्विसिंग केली जाते. बऱ्याचदा शोरूमचे सर्विस सेंटर आपल्या घरापासून बरेच लांब असते. तिथे गेल्यावर लगेच आपल्या गाडीचे सर्विसिंग करून मिळेल यांची शाश्वती नसते. त्यासाठी संपूर्ण दिवस घेतात. सकाळी गाडी लावायला सांगतात आणि सायंकाळी घेऊन जाण्यास सांगितले जाते. अशा वेळी आपण खाजगी सर्विसिंग करणारे जवळचे सर्विस सेंटर पाहतो आणि सर्विसिंग करून घेतो. तास दीडतासत आपली गाडीची सर्विसिंग करून देतात. तेही आपल्या समोर.
स्टेप बाय स्टेप टू व्हीलर सर्विसिंग करताना होणारी प्रक्रिया.
- प्रथम सर्विसिंग करणारी व्यक्ती तुमच्या गाडीची एक 50 ते 10 मीटरची राईड करेल. ज्यातून बऱ्याच गोष्टी मेकॅनिकच्या लक्षात येते.
- केलेल्या राईडच्या आधार मेकॅनिक आपणस काय -काय करावे लागेल हे सांगतो.
- एक कोटेशन तयार करून अंदाजे होणारा खर्च सांगतो.
- गाडीचा एखादा नवीन पार्ट खराब झाला असेल तर त्यासाठी येणार खर्च ही ते आपणास सांगतो.
- आपल्या सहमती नंतरच गाडी सर्विसिंग करण्यास हाती घेतो.
- प्रत्यक्षात गाडीचे सर्विसिंग काम चालू असताना काही खराब झालेल्या गोष्टी मेकॅनिक सांगतो , जर आपण ते बदला म्हटलात तरच ते बदलले जाते अन्यथा ते तसेच ठेवले जाते. मेकॅनिक प्रामाणिक मात्र सांगण्याचे काम करतो.
टू व्हीलर सर्विसिंगच्या जनरल चेक अपमध्ये खालील गोष्टी केल्या जातात.
- प्रथम गाडीचे एअर फिल्टर पहिले जाते,
- ब्रेक चेक केले जाते.
- कार्बोरेटर क्लीन करणे- कार्बोरेटर स्वच्छ करण्यासाठी गाडीतील पेट्रोल वापरले जाते. साधारण 50 ते 100 ml पर्यत.
- ड्रेन स्क्रू पहिले जाते.
- ड्रेन करणे,
- फ्रंट ब्रेक केबल चेक केले जाते.
- एक्सलेटर केबल ओयलिंग करणे
- क्लज केबल ओयलिंग करणे
- इंजिन ऑइल चेंज करणे, ऑइल सोडताना ड्रेन बोल्ड लचा वॉशर चेक करणे. खराब असेल तर चेंज करणे
- हॉर्न, इंडिकेटर, स्टार्टर, हेडलाईन, टेलर इंडिकेटर इतर वस्तू चेक करणे
- गाडी वाशिंग करून ऑइलिंग ग्रेसिंग करणे टायमिंग ची सेटिंग पण करतात जेणे करून गाडी बंद होऊ नये. हे काम वॉशिंग नंतर अंतिम टप्यात केले जाते.हवा चेक करणे
- आवश्यक असल्यास (शक्यतो पावसाळ्यात) चैन सॉकेट स्वच्छ केला जातो व त्यातील अडकलेली माती काढतात.
टू व्हीलर सर्विसिंग नियमित केल्याचे फायदे.
- बाईकचे आयुष्य वाढते.
- बाईक खर्च कमी काढते.
- अचानक बंद पडणे कमी होते.
- गाडी मेंटेनन्स मध्ये राहते.
- विकायची झाल्यास दाम चांगले मिळू शकते.
- अपघाताचे प्रमाणे कमी होते.
- गाडी चालविताना मजा येते आणि आपला आत्मविश्वास ही वाढते. एक साठी म्हणून टू व्हीलर तुमच्या सोबत आयुष्भर राहत असते.
- गाडी कधी आपणास धोका देत नाही.
बाईक चालविता नियमित या गोष्टी करा.
- ब्रेक चेक करणे.
- हवा चेक करणे.
- पेट्रोल चेक करणे.
- चेनला ऑईल आहे की नाही ते पाहणे
गाडी बंद पडली तर काय कराल.
- गाडीत पेट्रोल आहे ते पहा. नसेल प्रथम पेट्रोल भरा.
- गाडीचे करंट चेक करा.स्पार्क प्लग काढून तारेने गाडी चालू करून घासून पाहणे. आगीचा ठिणगी दिसली तर करंट आहे समजावे. नाहीतर थोडे स्पार्क प्लग तारेने घासावे. स्पार्क प्लग खराब असेल तर गाडी कधीकधी बंद पडते.
टू व्हीलर सर्विसिंग कोठे कराल.
तुमच्या जवळच्या ठिकाणी सर्विसिंग करावे. जेणेकरून कधीही अडचण आली तर बाईक आपल्याला दाखवता यायला हवे. एकाच ठिकाणी सर्विसिंग करीत जावे. एकाच ठिकाणी केल्यामुळे टू व्हीलरचे जे काही केलेलं काम आहे ते मेकॅनिक माहिती असते. पुढच्या वेळेस गाडीचं काय काम करायचं हेही त्यांच्या लक्षात येतं. एक प्रकारे आपल्या गाडीचा फॅमिली डॉक्टर असतो तो.
जर आपण हडपसर भागात राहत असला तर Swami Auto Service या ठिकाणी सर्विसिंग करा वर नमूद केलेल्या सर्व स्टेप येते फालो केले जाते.
जर या ठिकाणी आपण सर्विसिंग केले, तर अतिशय काळजीने गाडीची सर्विसिंग केली जाते. तेही तुमच्या समोर, गाडीतील खराब असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हांला दाखवली जाते. गाडीची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती दिली जाते. काय चांगले आहे. काय बिघडले हे सांगितले जाते. काम झाल्यावर आपणास व्यवस्थित Invoice ही दिले जाते. कोणताही अतिरिक्त चार्ज लावत नाही. अतिशय माफक दर मध्ये सर्विसिंग सेवा दिली जाते. त्यांची होम सर्विस सुद्धा आहे.