विषमता किंवा असमानता | QUIZ on inequality
असमानता किंवा विषमता | QUIZ on inequality पोस्ट मध्ये असमानता म्हणजे काय? असमानतेची व्याख्या, नाहीरे व आहेरे वर्ग म्हणजे काय ? तसेच सामाजिक स्थाने व दर्जा यांच्या आधारावर सामाजिक असमानता कशी आढळून येते. इत्यादी प्रश्नाची उत्तरे आपणास FAQ स्वरुपात मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. FAQ QUIZ on inequality
असमानता किंवा विषमता या वरील प्रश्ने आणि उत्तरे
समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे विषम पद्धतीने वितरण झालेले असते. त्यामुळे समाजातील व्यक्ती, समूहात व समाजात असमानता निर्माण होते.
असमानता म्हणजे विषमता होय.
थोडक्यात आपण म्हणू शकतो की,
- सत्ता,
- संपत्ती,
- प्रतिष्ठा,
- धर्म,
- जात,
- वर्ग,
- वंश,
- वर्ग,
- संपती,
- लिंग,
- स्थान
आहेरे म्हणजे ज्याच्याकडे सर्व काही आहे. गरज नसतानाही त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात संपत्ती व संसाधने असतात.
समाजातील अशी व्यक्ती किंवा समूह ज्याकडे काहीच नाही श्रम करून जगणारी. जीवनावश्यक मुलभूत गोष्टीचा त्यांच्या कडे अभाव असतो. कोणत्याही प्रकारचे संपती व संसाधनाचा अभाव त्यांच्याकडे असतो.
सामाजिक विषमता ( Social inequality ) म्हणजे समाजातील व्यक्ति - व्यक्ती वा समूहा - समूहात विशेषाधिकार, भौतिक पारितोषिके, संधी, सत्ता, प्रतिष्ठा , प्रभाव यांचे होणारे विषम वितरण होय.
टिशलेर , व्हायटन आणि हंटर यांनी केलेली सामाजिक असमानता यांची व्याख्या
सामजिक विषमता जेव्हा समाज - संरचनेचा भाग बनते तेव्हा सामाजिक स्तरीकरण अस्तित्वात येते . समाजातील विविध सामाजिक संस्थांद्वारा मग अस्तित्वात आलेली स्तरीकरण व्यवस्था टिकवून ठेवली जाते.
सामाजिक असमानतामुळे विविध सामाजिक स्थाने व दर्जा असलेले व्यक्ती व समूह बनतात.
समाजात व्यक्तीला दोन पद्धतीने स्थान मिळत असते.
- एक जन्माने तर
- दुसरे हे स्वकष्टाने.