चुकीच्या UPI पत्यावर पेमेंट गेल्यावर परत पैसे कसे मिळवाल
UPI अड्रेस अथवा QR कोड द्वारे जर चुकीच्याच व्यक्तीला जर पैसे ट्रान्स्फर झाले असेल तर काय कराल. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की चुकीच्या व्यक्तीला किंवा पार्टीला जर पैसे गेले असतील तर प्रथम खाली सांगितलेल्या गोष्टी करा.
चुकीच्या UPI पत्यावर पेमेंट गेल्यावर करावयाच्या कृती
- तत्काळ तुम्ही ज्या app वरून उदा. Paytm Phone पे, G-Pay वर इतर कोणत्याही Platform वरून पैसे गेले आहे त्या अधिकृत app वर जा.
- ज्या app वरून हे घडले त्या app वरील तुमच्या account वरील help & Customer support या पर्यायवर जावा.
- आणि आपली तक्रार दाखल करा. तक्रार करताना कोणत्या पार्टीला पैसे गेले आहे. त्यांचा उल्लेख करा.
- वेळ आणि किती रक्कम तुमची गेली आहे हे जेही डिजिटल proof तुमच्याकडील असतील हे पेमेंट history मध्ये या सर्व गोष्टी मिळतील.
- 30 दिवसाच्या आत आपल्या तक्राराची दखल ही संबंधित सर्विस प्रोव्हायडर (Paytm, Phone पे, G-Pay ) यांच्याकडून घेण्यात येते.
- सर्विस प्रोव्हायडर (Paytm, Phone पे, G-Pay ) यांच्याकडून ज्यांना पार्टीला पैसे गेले आहे. त्या मर्चंटला पेमेंट गेल्याबाबतची खात्री केली जाते. पैसे परत करण्याची विनंती केली जाते.
- जर मर्चंटने पैसेच्या बदल्यात सेवा दिली म्हणून जर सर्विस प्रोव्हायडर कळविले असेल तर सर्विस प्रोव्हायडर तुमच्या तक्रार निकाली काढतो.
- Issue Solved असा संदेश तुम्ही जिथे तक्रार केली असेल तेथे येईल. हे सगळे एक महिन्याच्या आत घडते.
- तुमचे खरोखरच पैसे गेले आहे. ज्याला गेले आहे त्याला तुम्ही फोन करून मागता तो तुम्हांला पैसे देण्यास नाकारतो. सरळ नाकारत नाही. काहीतरी कारण सांगतो. जसे की ज्या बँकेत पैसे गेलेत तो बंद आहे. मायनस मध्ये आहे. ज्या बँकेत पैसे आले आहेत त्यावर माझे फायन्यास आहे वैगेरे.
- येथे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. माझे पैसे एक फळ विक्रेताला गेले होते. 1400 रुपये गेले होते. त्यावेळी ज्याला माझे पैसे गेले होते त्यांनी सांगितले आहे त्यांच्या बँकेतील पैसे ही मायनस मध्ये आहे म्हणून.
आरबीआय (RBI ) च्या लोकपालकडे तक्रार कसे कराल.
- जेव्हा तुम्हांला तुमचा सर्विस प्रोव्हायडर किंवा मर्चंट किंवा ज्याला पैसे गेले आहे ती व्यक्तीकडून पैसे मिळत नाही. त्यानंतरच तुम्ही आरबीआय लोकपालकडे तक्रार करू शकता.
- आरबीआय (RBI ) लोकपालकडे तक्रार नोंदवण्याविषयी माहितीसाठी आणि आपण केलेल्या तक्रारीविषयी अद्यावत तपशील मिळवण्यासाठी 14448 वर कॉल करून माहिती मिळवू शकता.
- RB-एकत्रित लोकपाल योजनेच्या अंतर्गत कोणत्याही बँक, एनबीएफसी किंवा पेमेंट व्यवस्थेच्या सहभागींविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.
- नोंदविण्यापूर्वी तुम्ही 14448 या टोल फ्री नं call करू करून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकता.
- तुम्ही RBI तेव्हाच तक्रार करू शकत जेव्हा तुमचा सर्विस प्रोव्हायडर तुमचे पैसे मिळवून देण्यात असमर्थ ठरला तर.
RBI कसे तक्रार केल्यावर कंप्लेंट नं कसे मिळेल.
- RBI तक्रार करण्याचे तुमचे पक्के झाले असेल तर पुढील RBI च्या website वर जावे. https://cms.rbi.org.in
- तुमचे नाव, मोबाईल नं टाकून OTP मिळवा, त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा आणि पिन इमेल टाका,
- ज्या सर्विस प्रोव्हायडर ( Paytm, phone pe, G-Pay, बँक, एनबीएफसी किंवा पेमेंट व्यवस्थेच्या सहभागींविरुद्ध तक्रार करायचे आहे त्यांचे नाव अल्फाबेट प्रमाणे ते तुम्हांला RBI लिस्ट मध्ये दिसेल ते निवडा. ( विशेष सूचना मोबाईल वर ही तक्रार न करता PC laptop वर करा , मोबाईल वर यादी हाताळण्यास अवघड गेले आहे. )
- तक्रार दाखल होईल. तक्रार दाखल झाल्यावर एक कंप्लेंट नं आपणास मिळेल. हा कंप्लेंट नं पुढील कोणत्याही संदर्भासाठी वापरता येईल. पुढील तीस दिवसाच्या आत आपल्याला आपले पैसे परत मिळतील.