जाती आणि वर्ग फरक | Differentiation of caste and class
जातीव्यवस्था आणि वर्गव्यवस्था याकडे सामाजिक स्तरीकरणाचा व सामाजिक असमानातेचा आधार म्हणून पहिले जाते. या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. या दोन्ही संकल्पनांना आपण या पोस्ट मध्ये तुलनात्मक पद्धतीने फरक पाहणार आहोत. मॅसिव्हर , डेव्हिस आणि बॉटोमोर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये असेन सांगितले आहे की, वर्ग आणि जाती या जसे दक्षिण आणि उत्तर ध्रुव आहेत तसे एकमेकांच्या विरोधी आहेत. ‘वर्ग’ हा समानतेच्या संधी असलेल्या ‘लोकशाही समाजाचे’ प्रतिनिधित्व करतो, तर ‘जात’ याच्या उलट आहे. ,म्हणजेच समानतेच्या संधी नसणाऱ्या, दुभागलेल्या व असमानता असणाऱ्या समाजाचे आणि विशिष्ठ जातीचेच वर्चस्व असलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो.
जाती आणि वर्ग व्यवस्था यांतील फरक | Differences between caste and class
संकल्पना concept | जाती ( Caste ) | वर्ग ( Class ) |
व्याख्या Definition | मुजुमदार आणि मदन यांनी केलेली जातीची व्याख्या “जाती म्हणजे एक बंद वर्ग होय” (Caste is a closed class ) डॉ . इरावती कर्वे यांनी केलेली जाती ची व्याख्या “जाती म्हणजे एक विस्तारित कुटुंब होय” (Caste is an extended family) | एलि चिनाय – आर्थिक व्यवस्थेत समान स्थान असणाऱ्या व्यक्ती ( A number of persons sharing a common position in the economic order.) मॅक्स वेबर यांनीही आर्थिक घटक महत्त्वाचा मानून वर्गाची व्याख्या केली. “वर्ग म्हणजे व्यक्तींचा असा समूह की, जे बाजारी अर्थव्यवस्थेत समान स्थानावर असतात आणि त्यामुळे त्यांना समान आर्थिक पारितोषिके प्राप्त होतात.” (Class is group of individuals who share a similar position in market economy and by virtue of that fact receive similar economic rewards.) |
स्तरीकरणाचा प्रकार | जाति-व्यवस्था हा बंद स्तरीकरणाचा ( Closed stratification ) प्रकार आहे. | वर्गव्यवस्था हे खुले स्तरीकरणा ( Open system ) प्रकार आहे. |
दर्जा Status | अर्पित दर्जा ( Ascribed Status) – गोष्टी जन्माने मिळतात. | अर्जित दर्जा (Achieved Status) -व्यक्तीला जन्मजात कोणत्याही ती मिळत नाही. तर त्या जाणीवपूर्वक कष्ट करून प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. |
गतिशीलता Mobility | गतीशिलातेचा अभाव असतो, गोष्टी बदलता येत नाहीत. | गतीशिलातेला वाव असतो, गोष्टी बदलता येतात. |
संधी opportunity | नसते | असते |
समानता Equality | नसते | असते |
कुठे आढळते found in | जाती फक्त भारतीय उपखंडातच आढळतात, विशेषतः भारतात, तर वर्ग जवळपास सर्वत्र आढळतात. | वर्ग जवळपास सर्वत्र आढळतात. वर्ग हे विशेषतः युरोपमधील औद्योगिक समाजांचे वैशिष्ट्य आहे आणि |
आधार base | जातिव्यवस्थेमध्ये धर्माचा प्रभाव [कर्म, पुनर्जन्म आणि कर्मकांडाचा सिद्धांत (शुद्धता – अशुद्ध ) } सारखे गैर-आर्थिक घटक असतात. | वर्ग मुख्यतः व्यक्तींच्या गटांमधील आर्थिक फरकांवर अवलंबून असतात – भौतिक संसाधनांच्या ताब्यात असमानता आणि नियंत्रण |
वर्गाची आणि जातीची वैशिष्ट्ये | characteristics of class and caste
जाती ( Caste ) | वर्ग ( Class ) |
1.समाजाचे खंडात्मक विभाजन ( Segmental Division of Society ) 2. श्रेणी रचना ( Hierarchy ) 3.सामाजिक संबंधावर नियंत्रण ( Control on Social relationship ) 4.धार्मिक बंधने ( Restrictions of religion ) 5.व्यवसाय निवडीवर मर्यादा (Limitations on selection of occupation) 6.आतंर विवाही गट ( Endogamous groups ) | जन्माचा आधार नाही. ( No base of birth.) सामाजिक व्यवहारावर निर्बंध नसतात. (There are no restrictions on social interaction.) व्यवसाय निवडीचे स्वतंत्र असते. (Business is independent of choice.) विवाहाचे जोडीदार निवडण्यावर निर्बंध नसतात. (There are no restrictions on choosing a marriage partner.) समान संधी आणि अधिकार ( Equal opportunities and rights) अर्जित दर्जा महत्वचा असतो. ( Achieved Status is important.) गुणांना वाव ( scope for Skills ) |
जातीव्यवस्था बाबत अधिक माहिती येथे वाचा :-जाती | What is Caste | जातीव्यवस्था म्हणजे काय
वर्गव्यवस्था बाबतची अधिक माहिती येथे वाचा :- वर्ग | Class | What is Class system