वर्ग | Class | What is Class system
वर्ग व्यवस्था ही खुल्या स्तरीकरणाचा ( Open stratification ) प्रकार आहे. जाति व्यवस्थेमध्ये व्यक्तीचे स्थान जन्मावरून ठरते आणि त्या जातीचा दर्जा तिला आयुष्यभर बदलता येत नाही, पण वर्गव्यवस्थेचे मात्र असे नसते. एखाद्या वर्गात जन्माला आलेली व्यक्ती आपल्या स्वप्रयत्नाने, कष्टाने उच्च दर्जा प्राप्त करून घेऊन मूळ वगपिक्षा वरच्या वर्गात प्रवेश करू शकते. म्हणूनच वर्गव्यवस्था ही सापेक्षतः खुली स्तरीकरण व्यवस्था ठरते . येथे गतिशीलतेला वाव आहे.
सामाजीक वर्ग का निर्माण होतात ?
प्रामुख्याने संपत्ती , सत्ता , प्रतिष्ठा यांच्या समाजातील विषम वितरणामुळे श्रेष्ठ -कनिष्ठ दर्जाचे आर्थिक-सामाजीक वर्ग निर्माण झालेले आहेत.
सामाजिक वर्ग–व्याख्या | Definitions of class or social class
टीशलेर, व्हायटन आणि हंटर यांच्या मते , “समान संधी, समान आर्थिक आणि व्यावसायिक दर्जा, समान अभिवृत्ती आणि वर्तन प्रकार तसेच समान जीवनपद्धती असणाऱ्या लोकांचा प्रवर्ग म्हणजे सामाजिक वर्ग होय.
According to Tischler, whitten, Hunter “A social class consists of a category of people who share similar opportunities, similar economic and vocational positions, similar life-styles and similar attitudes and behaviour.”
एलि चिनाय – आर्थिक व्यवस्थेत समान स्थान असणाऱ्या व्यक्ती ( A number of persons sharing a common position in the economic order.)
कार्ल मार्क्सची वर्गाची संकल्पना | Karl Marx’s concept of class
मार्क्सप्रणित दृष्टिकोणातून वर्ग म्हणजे असा सामाजिक समूह की, ज्यातील सदस्यांचे उत्पादनाच्या साधनांशी किंवा शक्तींशी सारखेच संबंध असतात . ( A class is a social group whose members share the same relationship to the forces of production)
मार्क्सच्या मते समाजात दोनच प्रमुख क्लास आहेत.
- पहिला वर्ग – बूर्ज्वा ( Bourgeoisie ) म्हणजेच भांडवलदार ( Capitalists ),
- दुसरा वर्ग – प्रॉलेटरियट ( Proletariat ) म्हणजे कामगार किंवा श्रमिकांचा ( Workers or tolling masses )
पहिला वर्ग हा – उत्पादनाच्या साधनांचा मालक असतो. जरी कामगारांच्या श्रमाने उत्पादन होत असले तरी,
दुसरा वर्गाची – उत्पादित वस्तूंवर किंवा उत्पादनाच्या साधनांवर मात्र कामगारांची मालकी नसते .
त्यामुळे पहिला वर्ग ‘अहिरेंचा ’ ( Haves ) तर
दुसरा ‘ नाहीरेंचा ( Have nots ). असतो
मॅक्स वेबरची वर्ग संकल्पना | Max Weber’s Class concept
मॅक्स वेबर यांनीही आर्थिक घटक महत्त्वाचा मानून वर्गाची व्याख्या केली.
“वर्ग म्हणजे व्यक्तींचा असा समूह की , जे बाजारी अर्थव्यवस्थेत समान स्थानावर असतात आणि त्यामुळे त्यांना समान आर्थिक पारितोषिके प्राप्त होतात.” (Class is group of individuals who share a similar position in market economy and by virtue of that fact receive similar economic rewards.)
भाडवलशाही समाजात चार प्रमुख क्लास असतात असे वेबरने म्हटले आहे | According to weber In capitalist society there are mainly four class exist
1) मालमत्ताधारी उच्चवर्ग ( The Propertied Upper Class ) ,
2) मालमत्ता नसणारा पाढरपेशी कामगाराचा क्लास ( The property less white collar workers ) ,
3) छोटे भांडवलदार ( The petty bourgeoisie ) आणि
4) शारीरिक कष्ट करून जगणारा कामगार वर्ग ( The Manual working class)
वेबरच्या मते – समान आर्थिक दर्जा असणाऱ्या लोकांचा एक क्लास class बनतो.
ढोबळ मानाने – असे आर्थिक दर्जावरून तीन प्रमुख वर्ग आहेत आणि या तीन स्तरांतही उपस्तर असतात. असे वेबरचे मत आहेत.
Three Types of Class on economical status /
आर्थिक दर्जावरून वर्गाचे 3 प्रमुख स्तर व 6 उपस्तर
1) उच्चवर्ग ( Upper class ) | 1) उच्च – उच्चवर्ग ( upper upper class ) 2) उच्च कनिष्ठवर्ग (upper lower class ) |
२) मध्यमवर्ग (middle class) | 1) उच्च मध्यमवर्ग (upper middle class ) 2) कनिष्ठ मध्यम वर्ग (lower middle class |
3) कनिष्ठवर्ग ( lower class ) | 1) उच्च कनिष्ठवर्ग (upper lower class ) 2) कनिष्ठ कनिष्ठवर्ग ( lower -lower class ) |
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट येथे वाचा:- वर्गाची वैशिष्ठ्ये | Characteristics of class system