फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | फ्रेंच राज्यक्रांती भाग -4 | French Revolution Part-4
फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत यांची भूमिका हे फ्रेंच राज्यक्रांती भाग-3 या पोस्ट मध्ये पहिले आहे. या पोस्टद्वारे आपण फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे समजून घेऊयात.
फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | french Rajyakrantichi rajakiya karanae
१६ लुईने जानेवारी-१७८९ मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (General Estate election) घेतले.
फ्रान्सची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोकांच्या आणि विचारवंतांच्या दबावाने १६ लुईने जानेवारी-१७८९ मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (General Estate election) घेण्यात आले होते. त्यानंतर ५ में-१७८९ व्हर्सायच्या राजवाड्यात लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले. हा दिवस फ्रान्सच्या इतिहासात अतिशय महत्वाचा समाजाला जातो. कारण १४ व १५ लुई यांनी अशा प्रकारची निवडणूकीचे आयोजन केलेले नव्हते. १६ लुई यांनी ते केले होते, हे एक चांगले काम त्यांनी केले आपल्याला म्हणावे लागेल.
Kings Political body ( राजाचे राजकीय मंडळ)
1st Estate (यांची लोकसंख्या 1%) | 300 सभासद |
2nd Estate (यांची लोकसंख्या 1%) | 300 सभासद |
3rd Estate (यांची लोकसंख्या 97%) | 300 सभासद |
1st आणि 2nd Estate वर्गातील प्रतिनिधींना मान, सन्मान आणि विशेष अधिकार
वरील दोन वर्गातील प्रतिनिधींना मान, सन्मान आणि विशेष अधिकार त्यांच्यासाठी नाष्टा, जेवण आणि बसायला खुर्ची आणि तिसऱ्या वर्गातील प्रतिनिधीना काहीच नव्हते. तिसऱ्या वर्गातील काही प्रतिनिधी मान, सन्मान मिळाला नाही म्हणून त्यांनी सभा त्याग केला होता. तिसऱ्या वर्गातील प्रतिनिधीकडून शेतकरी, कामगार व महिला यांच्याकडून त्यांच्या समस्यांबाबतचे जवळपास ४०००० पत्रे राजा यांना पाठविण्यात आले होते. पहिल्या दोन वर्गांची लोकसंख्या फक्त २-३ टक्के होती आणि त्यांचे प्रतिनिधी ६०० इतके होते. याउलट ज्या वर्गाची लोकसंख्या ९७-९८ टक्के इतकी होती त्यांचे प्रतिनिधी मात्र ३०० इतकी होती. यातूनच आपल्यला फ्रान्समध्ये मध्ये असणाऱ्या विषमतेचे मूळ दिसते.
तिन्हीही वर्गाच्या सभासदांचे संयुक्त सभागृह असावे याला राजासह 1st आणि 2nd Estate वर्गातील प्रतिनिधींचा विरोध
तिन्हीही वर्गाच्या सभासदांचे संयुक्त सभागृह असावे असे थर्ड इस्टेट मधील प्रतिनीधींना वाटते होते. पण बाकीच्या दोन गटांचे त्याला विरोध होता. राजाचा ही विरोध होता.
फ्रान्सच्या इतिहासातील ‘टेनिस कोर्ट ओथ’
या संदर्भात आणि यावर तोडगा म्हणून मिरब्यु आणि अबेसियेस यांच्या पुढाकाराने तिन्ही वर्गातील आणि राजा बरोबर एका टेनिस कोर्टवर चर्चा व भाषणे झाली आणि ठरविले की जोपर्यत फ्रान्स साठी लेखी घटना तयार होत नाही तोपर्यत कोणीही विभक्त न होण्याची शपथ घेतली गेली. ही घटना २७ जून-१७७९ घडली होती ती फ्रान्सच्या इतिहासात ‘टेनिस कोर्ट ओथ’ या नावाने प्रसिद्ध आहे.
१६ लुई यांनी तीन वर्गाच्या प्रतिनिधींना एकाच सभागृहात संयुक्तरीत्या बोलावून घेतली राष्ट्रीय सभा
यामुळे नाईलाजाने १६ लुई यांनी या घटने नंतर तीन वर्गाच्या प्रतिनिधींना एकाच सभागृहात संयुक्तरीत्या बोलावले. या बैठकीला राष्ट्रीय सभा असे संबोधले गेले. या सभेने नंतर घटना तयार करण्याचे काम सुरु केले. म्हणून तिला नंतर घटना समिती असे नाव पडले. यात तिन्ही वर्गांचे प्रतिनिधी होते.
राष्ट्रीय सभा चिरडून टाकण्याचा प्रयत्न १६ लुई यांच्याकडून झाला.
सामान्य लोकांचा पाठींबा असलेली राष्ट्रीय सभा चिरडून टाकण्याचा प्रयत्न १६ लुई यांच्याकडून होत होता. त्याचवेळी राजाकडून नेकर या विचारवंत यांची फ्रान्स मधून हकालपट्टी केली गेली. यामुळे जनतेमध्ये चिडलेली संतापलेली होती आणि प्रचंड प्रमाणत खवळलेली होती.
१४ -जुलै-१७८९ हा फ्रान्साचा राष्ट्रीय दिवस जाहीर
त्याचाच परिणाम असा झाली की, मॅराट आणि डेस्मोलिन्स यांच्या नेतृत्वाखाली १४ जुलै-१७८९ रोजी पॅरिसच्या पूर्वेकडील किल्यामधील बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. म्हणून तो जुलमी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याच्या भावनेचा तो विजय होता म्हणून १४ -जुलै-१७८९ हा फ्रान्साचा राष्ट्रीय दिवस जाहीर करण्यात आला आहे.
4 -ऑगस्टचा ठराव झाला
बॅस्टिल तुरुंगावरील हल्ल्यामुळे जुनी राजवट कोलमडून पडली फ्रान्स मधील सरंजामदार / उमराव जे दुसऱ्या वर्गात मोडत होते यासर्वांची सत्ता संपुष्टात आली. 4 ऑगस्ट -१७७९ रोजी तिसऱ्या वर्गातील प्रतिनिधी व बाकीच्या दोन वर्गातील प्रतिनिधी सोबत सभा भरली. या सभेत पहिल्या दोन वर्गाकडून लादलेले सर्व कर यापुढे रद्द केल्याचे जाहीर केले गेले. आणि आणखीन ३० ठराव या सभेत पास करण्यात आले म्हणून त्याला 4 ऑगस्टचे ठराव असे म्हणतात. या ठरावानुसार बिगारी पद्धत, पहिल्या दोन वर्गातील लोकांचे कर रद्द करण्यात आले. नोकरीत सर्वाना समान संधी देण्याचे ठरले. सर्व सामाजिक भेदभाव नष्ट केले गेले. स्वतंत्र, समता व बंधुता ही फ्रासाच्या भविष्यातील सरकारचे आधारभूत तत्वे राहतील असे सभेत सांगण्यात आले.
राष्ट्रीय सभेच्या घटना समितीने १२ ऑगस्ट १७८९ रोजी मानवी हक्कांचा जाहीरनामा सादर केला.
एकीकडे राष्ट्रीय सभेच्या घटना समितीचे घटना तयार करण्याचे काम चालू होते. हे काम चालू असताना या समितीने मात्र १२ ऑगस्ट १७८९ रोजी मानवी हक्कांचा जाहीरनामा सादर केला. या जाहीनाम्यात
१. लोकांचे स्वातंत्र्य, समानता, सार्वभौम मान्य करण्यात आले.
२. सर्वसमावेशक कायदा मान्य करण्यात आला.
३. न्यायाची संधी देण्यात आली.
४. लोकांना खाजगी मालमत्तेचा अधिकार मान्य देण्यात आले.
५. जन्माधिष्टीतविषमता नष्ट करण्यात आले.
६. लोकांना भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, शांतते एकत्र येऊन संघटना बांधणीचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य मान्य करण्यात आले
७. त्याचबरोबर जीवित आणि वित्त हक्क हे सर्वोच आणि पायाभूत मानण्यात आले.
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट वाचा :- फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम | फ्रेंच राज्यक्रांती भाग -5 | French Revolution Part-5
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट वाचा :- फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत यांची भूमिका | Role of philosophers in French Revolution | French Revolution Part-3