सामाजिक चळवळी | What Social movement?
सामाजिक चळवळीत एखाद्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी लोक एकत्र येतात. सामुहिकरित्या परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. लोकांचे एकत्र येणे हे हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक असते. विशिष्ठ बदल घडवून आणण्यासाठी एकच ध्येयाने सर्वजण प्रेरित असतात.
उदा.- आपण मागील १-२ वर्षात घडलेली काही आंदोलन व चळवळी पाहूयात. संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्रातील एस.टी.कर्मचार्यांचे आंदोलन.
सामाजिक चळवळीच्या विविध व्याख्या| Definition of Social movement
सामाजिक चळवळी हा एक विशिष्ट प्रकारचा सामुहिक वर्तन प्रकार आहे. विविध चळवळीतील सामुहिक वर्तनाची वैशिठ्ये लक्षात घेऊन अनेकांनी सामाजिक चळवळीच्या व्याख्या केलेल्या आहेत.
येथे आपण एक सोपी व्याख्या पाहूया.
ड्रेसलर आणि विलिस यांनी केलेली सामाजिक चळवळी व्याख्या | Dressler and Willis the definition of Social movement
अनेक लोक हेतूपूर्वक आणि सामूहिकरीत्या परिवर्तन घडवून आणण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात.
सामाजिक चळवळीचे स्वरूप
१. समाजात लोक लोकहिताच्या विरुद्ध असणाऱ्या परिस्थितीत किंवा परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने लोक जाणीवपूर्वक एकत्र येऊन कृती करतात. उदा.- सन २०१२ साली भारतात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता. म्हणून समाजसेवक अन्न हजारे व अरविद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारविरोधी लोकपाल आंदोलन करून तत्कालीन सरकार विरुद्ध आवाज उठवला.
येथे आपल्याला असे म्हणता येईल कि सामाजिक जीवनाची नवीन व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक चळवळीत सामुहिक प्रयत्न होतो.
२. सामाजिक चळवळी या असंघटीत असतात, उत्तरोत्तर त्या संघटीत होत जातात. .सामाजिक चळवळीत संघटीत प्रयत्न होत असतात.
३. सामाजिक चळवळीला विशिष्ट विचारधारा असते.
४. सामाजिक चळवळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती काही साधनांचा व मार्गाचा वापर करतात उदा-.अहिसंक मार्गाने लढा लढला जातो. त्यामध्ये-निवेदन, निषेध, नारेबाजी, घोषणा, मोर्चा, उपोषण, सत्याग्रह, संप, हडताल, रस्ता रोको इत्यादी.
५. सामाजिक चळवळीला नेता असतो. जी त्या चळवळीतून बनते. नेता चळवळीला दिशा देण्याचे काम करतो.
६. सामाजिक चळवळीत प्रस्थापित नको असणाऱ्या गोष्टीना विरोध केला जातो. प्रस्थापित स्थिती मध्ये बदलासाठी प्रतिकार केला जातो.
सामाजिक चळवळीचे प्रकार | Types of Social Movement
सुधारणा चळवळी | Reform Movement
समाजात सुधारणा घडून आणण्याच्या उद्देशाने केलेली चळवळ. उदा. ब्राम्हो समाज, सती बंदी चळवळ, विधवा पुनर्विवाह,
क्रांतीकारक चळवळी | Revolutionary Movement
यामध्ये संपूर्ण सामाजिक व्यवस्थे मध्ये बदल हवे असते. हिंसक मार्गाचा वापर केला जातो. संपूर्ण व्यवस्थाच पालटून टाकणे अश्या प्रकारच्या चळवळीत अपेक्षित असते.
उदा. क्रांतीकारक चळवळ, फ्रेंच राज्यक्रांती
प्रतिकार चळवळी | Resistance Movement
या प्रकारच्या चळवळीत बदलला व परिवर्तनास विरोध केला जातो.
उदा.- सोलोगामी होणारा विरोध ( स्वतः स्वतःशी विवाह करण्यास हिंदू धर्मातील काही लोकांचा विरोध आहे. ), गे व लेस्बियन यांना आपला समाज मान्यता देत नाही.
अभिव्यक्ती चळवळी | Expressive Movement
भावनिक कोंडमारा पासून सुटका करण्यासाठी आणि व्यक्तिगत समाधान व शांती साठी हि चळवळ चालवली जाते.
व्यक्तीला त्यांचे असंतोष व्यक्ती करण्यासाठी अशी चळवळ चालवली जाते.
उदा.- Me-too चळवळ.
आदर्श समाजवादी चळवळी | Utopian Movement
आदर्श समाज निर्माण करण्यासाठी चालवली जाणारी चळवळी.
उदा. समाजवादी समाज, समानता आधारित समाज
स्थलांतर चळवळी | Migratory Movement
जेव्हा लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्धार करून तिकडे स्थलांतर करतात तेव्ह त्याला स्थलांतर चळवळ असे म्हणतात.