स्टेजेस ऑफ चेंज मॉडेल (Stages of Change Model)
मानवी वर्तन हे गतिशील असते आणि कालांतराने बदलत असते. आपण सगळेच एखादे ना एखादे बदल करत असतो. हा बदल लहान असू शकतो किंवा मोठा असू शकतो. या बदलाची प्रक्रिया कशी होते, हे समजून घेण्यासाठी अनेक सिद्धांत विकसित करण्यात आले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा सिद्धांत म्हणजे “स्टेजेस ऑफ चेंज” मॉडेल. हा मॉडेल आपल्याला हे समजावून देतो की, जेव्हा आपण एखादा बदल करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो बदल लगेच होत नाही. या बदलासाठी आपण काही विशिष्ट टप्प्यातून जातो.
सामाजिक आणि वैयक्तिक वर्तनातील बदलांवर अनेक सिद्धत आहेत. लोकांच्या विचारधारा आणि वर्तनात परिवर्तन घडवून आणण्याबाबत काही महत्त्वाचे मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. त्यातील एक सिद्धांत म्हणजे स्टेजेस ऑफ चेंज मॉडेल. “स्टेजेस ऑफ चेंज” म्हणजेच “बदलाचे टप्पे.
“स्टेजेस ऑफ चेंज” मॉडेल, ज्याला “ट्रांसथिऑरेटिकल मॉडेल” असंही म्हणतात, हे लोक कसे बदलतात हे समजून घेण्यासाठी बनवलेले आहे. जेव्हा लोक त्यांचे वर्तन बदलायचं ठरवतात, तेव्हा हे लगेच होत नाही. यासाठी वेळ लागतो आणि लोक वेगवेगळ्या टप्प्यांतून (स्टेजेस) जातात. हे मॉडेल सहा मुख्य टप्प्यांत विभागलेले आहे:
प्री-कॉन्टेम्प्लेशन (Pre-Contemplation) – विचार न करणे
या टप्प्यात व्यक्तीला बदल करण्याचा विचारही आलेला नसतो. त्यांना वाटतं की त्यांचं सध्याचं वर्तन ठीक आहे, आणि बदलाची आवश्यकता नाही. उदा. धूम्रपान व व्यसनाधीनता करणाऱ्या व्यक्तीला ते जेकाही करत आहे ते सोडण्याची गरज वाटत नाही, कारण त्यांना त्याचे तोटे दिसत नाहीत. एखादी परंपरा असते, देवदेव करणे (पशु बळी) हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचेच आहे असे वाटते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालवते समजत नाही.
कॉन्टेम्प्लेशन (Contemplation) – विचार करणे (स्टेजेस ऑफ चेंज मॉडेल.)
या टप्प्यात व्यक्तीला बदल करण्याची गरज जाणवते, पण ते अजूनही ठोस निर्णय घेत नाहीत. त्यांना माहित असतं की त्यांचा काहीतरी बदल होणे आवश्यक आहे, परंतु त्यांना अजून निर्णय घेण्यात अडचण येते. उदाहरणार्थ, एखाद्याला धूम्रपान वा व्यसन सोडायचं वाटतंय, पण त्यासाठी अजून कोणतंही ठराविक पाऊल उचललं नाहीये.
प्रिपरेशन (Preparation) – तयारी करणे
या टप्प्यात व्यक्तीने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यासाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. या स्टेजमध्ये ते लहान-लहान पावलं उचलतात आणि एका ठराविक वेळेनंतर (साधारणपणे काही आठवडे किंवा महिने) बदल करायचा ठरवतात. उदाहरणार्थ, धूम्रपान वा व्यसन करणारी व्यक्ती आता कमी प्रमाणात सिगारेट, गुटका, तंबाकू, खर्रा किंवा दारू पिणं सुरू करते किंवा हे बंद करण्यासाठी प्रयत्नशील राहते. त्यासाठी मदत घेतो व माहिती शोधते.
अक्शन (Action) – कृती करणे
या टप्प्यात व्यक्ती प्रत्यक्षात बदल करण्यासाठी ठोस पावलं उचलते. हा टप्पा खूप मेहनतीचं असतं कारण त्यांना त्यांच्या जुन्या सवयी सोडून नवीन सवयी स्वीकारायच्या असतात. धूम्रपान किंवा इतर व्यसन सोडलेला माणूस या टप्प्यात सर्व पूर्णपणे थांबवतो.
मेन्टेनन्स (Maintenance) – टिकवून ठेवणे ( स्टेजेस ऑफ चेंज मॉडेल.)
बदल केल्यानंतर, त्याला टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या टप्प्यात व्यक्तीने त्यांचं नवं वर्तन रोजच्या आयुष्यात नित्यनेमाने आणलेलं असतं. जुनी सवय परत येऊ नये म्हणून ते सतर्क राहतात. उदाहरणार्थ, धूम्रपान सोडणारी व्यक्ती आता सिगारेट, गुटका, तंबाकू, खर्रा पासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करीत राहते.
रिलॅप्स (Relapse) – पुन्हा जुन्या वर्तनाकडे परत जाणं
कधी कधी, प्रयत्न करूनही व्यक्ती परत जुन्या वर्तनाकडे जातात. उदाहरणार्थ, धूम्रपान व दारू सोडलेली व्यक्ती तणावाखाली परत सगळे पहिल्या सारखे करायला लागते. पिते. रिलॅप्स होणं सामान्य आहे आणि हा मॉडेलचा भाग आहे. यातून व्यक्ती परत उभं राहून आपल्या ध्येयाकडे परत प्रयत्न करू शकते.
“स्टेजेस ऑफ चेंज मॉडेल” हे सांगतं की बदल एकदम होत नाही; लोक एक टप्पा सोडून दुसऱ्या टप्प्यातून पुढे जातात. बदल टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक असतात.