गोबेल्स सिद्धांत | Goebbels’ Principles of Propaganda In Marathi
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जोरदार सर्वत्र प्रचार सुरू आहे. या प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. असे करण्याचे कारण हे प्रचार सिद्धांत आहे. जाणून घ्या हा प्रचार सिद्धांत नेमका काय आहे?
गोबेल्स सिद्धांत किंवा प्रचार सिद्धांत हे जोसेफ गोबेल्स यांच्या प्रचार तंत्राच्या तत्त्वांवर आधारित आहे. जोसेफ गोबेल्स हे हिटलरच्या नाझी जर्मनीच्या प्रचार मंत्री होते. त्यांनी प्रचार आणि माहिती नियंत्रणाचे तंत्र असे तयार केले की, ते सामान्य जनतेच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करत असे. हा सिद्धांत समाजातील मोठ्या गटाच्या विचारसरणीला नियंत्रित करण्यासाठी प्रभावी मानला जातो.
गोबेल्स सिद्धांताचे काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
खोटं वारंवार सांगणे
हा सिद्धांत असा म्हणतो की, जर एक खोटं अनेकदा सांगितलं गेलं तर लोक त्यावर विश्वास ठेवायला लागतात. गोबेल्स म्हणत असत की, “खोटं एवढं मोठं करा आणि ते एवढं वारंवार सांगितलं पाहिजे की लोकांना ते सत्य वाटायला लागेल.” याचा उपयोग विशेषतः लोकांच्या मनात विशिष्ट विचार किंवा मत रुजवण्यासाठी केला जातो
विरोधकांचा निषेध
गोबेल्सचा विचार होता की, लोकांचा विरोधकांबद्दलचा राग वाढवण्यासाठी, त्यांना दुश्मन किंवा अपवित्र म्हणून दाखवायला हवं. नाझी प्रचारात विरोधकांना “राष्ट्रविरोधक” म्हणून ब्रांड केलं जाई. त्यामुळे लोक स्वतःहून विरोधकांविरुद्ध वागू लागायचे.
भावनिक प्रभाव
गोबेल्सचा प्रचार हा फक्त तथ्यांवर आधारित नव्हता, तर तो भावनांना उद्दीपित करायला तयार केला जात असे. लोकांच्या भावनांवर प्रभाव पाडण्यासाठी खोटं असं रंगवून सांगितलं जात असे की, त्यात सत्य काय आहे यावर लोकांचा विश्वास बसावा. यासाठी भीती, राग, अभिमान इत्यादी भावना वापरल्या जात.
अर्धसत्य किंवा संदर्भबाह्य माहितीचा वापर
गोबेल्सने पूर्ण खोटं सांगण्यापेक्षा, सत्याचा काही भाग घेऊन त्याचा चुकीचा अर्थ लावण्याचा वापर केला. उदाहरणार्थ, एका घटनेतील काही तथ्ये घेऊन ती खोटी रूपं दिली जात असे, ज्यामुळे लोकांना ते खरे वाटायचे पण प्रत्यक्षात त्यात आंशिक सत्यच असे.
भव्यतेचा आभास
गोबेल्स लोकांच्या मनात एका विशिष्ट विचारसरणीबद्दल आदर किंवा महत्त्व निर्माण करण्यासाठी मोठ्या सभा, भव्य जाहिराती आणि मोठ्या प्रमाणात प्रचार केला. नाझी विचारसरणीला महान आणि राष्ट्रहिताची म्हणून दाखवले जाई, ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये ती लोकप्रिय होत असे.
माध्यमांचा पूर्ण नियंत्रण
गोबेल्सने सर्व प्रकारच्या माध्यमांवर पूर्ण नियंत्रण ठेवले होते. वर्तमानपत्रे, रेडिओ, चित्रपट इत्यादी माध्यमांतून केवळ नाझी विचारसरणीच प्रचारित केली जाई. विरोधी आवाज दडपले जात आणि माध्यमांचा वापर एकच संदेश पुन्हा पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात असे.
सरळ भाषेत प्रचार
गोबेल्सचा विचार होता की, प्रचार असा असावा जो प्रत्येक सामान्य व्यक्ती सहजपणे समजू शकेल. म्हणून, संदेश नेहमी सोपा आणि लक्षात राहणारा असावा. यामुळे लोकांना तो पटकन समजेल आणि त्यावर त्यांचा विश्वास बसेल.
सिद्धांताचा परिणाम
गोबेल्स सिद्धांताचा वापर समाजाच्या विचारसरणीवर खोलवर प्रभाव पाडण्यासाठी केला जातो. हा सिद्धांत केवळ नाझी जर्मनीपुरता मर्यादित राहिला नाही; त्याचा उपयोग आजही काही प्रसंगी राजकीय आणि सामाजिक प्रचारात दिसून येतो, जिथे लोकांमध्ये विचारप्रवणता निर्माण करून त्यांना एका ठराविक विचारसरणीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.
गोबेल्स सिद्धांताचा वापर चुकीच्या माहितीचा प्रचार, समाजातील गटांमध्ये फूट पाडणे आणि लोकांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. या सिद्धांतामुळे समाजावर खोट्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे लोक सत्यापासून दूर राहू शकतात.
साध्य, सगळीकडे या सिद्धांताचा प्रत्यय येतोय. आज पुण्यामध्ये होणाऱ्याही सभेत या सिद्धांताचा प्रत्यय येईल हे नक्कीच.