विपश्यना | What is Vipassana| Vipassana in Marathi
विपश्यना ही एक साधना विधी आहे. जी 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्ध यांनी शोधून काढली होती.
विपश्यनाचा अर्थ
विपश्यनाचा अर्थ एखादी गोष्ट “जशी आहे तशी समजून घेणे” . विपश्यनामध्ये शरीरामध्ये सुरू असणाऱ्या नैसर्गिक पद्धतीने श्वासोश्वास (श्वास घेणे आणि सोडणे) या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम लक्ष केंद्रित केलं जातं, म्हणजेच मनाला शरीरात येणाऱ्या श्वास आणि जाणाऱ्या श्वास वर लक्ष ठेवण्यास सांगितले जाते. या क्रियेमुळे आपले लक्ष विचलित राहत नाही.
श्वासाद्वारे मनाला एकाग्र केले जाते
जर प्रत्येक येणाऱ्या श्वासावरती आणि जाणाऱ्या श्वास वरती जर आपलं मन असेल, मनाला त्याची जाणीव होत असेल तर आपलं एकाग्र आहे , मन कुठे विचलित नाही समजायला हरकत नाही. असे करताना तुम्हाला एक अनुभव येईल की, आपण पूर्ण आपलं मन नाकावाटे शरीरात जाणाऱ्या श्वास व व नंतर न सोडलेला श्वास या क्रियेमध्ये गुंतवतो परंतु मन आपलं भटकत असते. हे मन एकतर भूतकाळात जाते किंवा भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट अशी करू?, तशी करू? अशा पद्धतीने आपले मन काल्पनिक गोष्टी रंगत असते. लगेच आपल्याला जाणीव होते की, माझं मन भटकलेला आहे, असं म्हणतात क्षणी, तो परत श्वास घेणे आणि सोडण्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करते. परत हा खेळ सुरू होते, बंद होते.
मन सतत भटकत असल्याची जाणीव होते
एक दोन मिनिट आपण आपल्या नाकावाटे घेणाऱ्या शासनावरती लक्ष केंद्रित करतो, परत आपलं मन भटकते. परत श्वासावर येते. परत भटकते. जेव्हाही भटकते. तुम्ही एक गोष्टीचा अनुभव कराल की, मन हा एकतर भुतकाळात घडून गेलेल्या प्रिय व अप्रिय गोष्टीमध्ये गुंतून जाते आणि या घटनेच्या संदर्भात भविष्यात कोणत्या पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया देण्याबाबतची नियोजन करत असते. हे सर्व काल्पनिक परिस्थिती निर्माण करतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनेला जोडून तो वेगवेगळ्या कल्पना करत राहतो, असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं होईल. भटकण्याची आणि झाल्यानंतर श्वास वर येतो. जर तुम्ही सतत तुमच्या शरीरात जाणाऱ्या प्रत्येक घेणाऱ्या आणि सोडणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करून असाल, अजिबात विचलित होत नसाल, दिवसभर तुम्ही हे करताय आणि तुमचा अजिबात मन विचलित होत नाहीये. तर तुम्ही समजायला हरकत नाही की, तुम्ही तुमचं मन खूप एकाग्र दिले आहात.
दहा दिवसाच्या विपश्यना कोर्ससाठी आपल्याला नोंदणी करावी लागेल.
जर वारंवार तुमचं मन भटकत असेल, तर विपश्यना साधनाही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची राहील. तुमच्यासाठी खूप वरदान ठरणार आहे. या साधनाचे खूप फायदे आहेत. हजारो, लाखो-करोडो लोकांनी ही विपश्यना करून त्यांचे आयुष्य बदललेले आहे. तुम्हीही तुमचा आयुष्य बदलू शकता. याच्यासाठी यासाठी तुम्ही विविध विपश्यना केंद्र नोंदणी करू शकता. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विपश्यना सेंटर आहे कुठेही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता आणि हा दहा दिवसाचा विपश्यना कोर्स असतो. हा कोर्स केल्यानंतर अद्भुत अतुलनीय असं अनुभव तर तुम्ही नक्कीच घ्याल, सोबत एक नवीन जीवनदृष्टीकोन तुमच्या जवळ असेल, एक नवीन धर्म तुम्ही धारण केलेला असेल आणि तुम्ही एक सदाचार अशा वाटेने तुमची जीवनाची पदक्रांता सुरू कराल.
मन निर्मळ करण्याची ही साधना आहे.
विपश्यना आपल्या मनातील विकार काढून टाकण्याचं काम करण्यास सहाय्य करते. आपल्या मनाला निर्मळ करण्याचं काम करते विपश्यना करते. ही साधना अंधश्रद्धा वर आधारित नसून ती एक वैज्ञानिक पद्धतीवर अवलंबून आहे. सगळ्यात हजारो लोकांनी आजमावून पाहिलेले आहेत. या विपश्यनेनंतर लोकांच्या आयुष्यामध्ये खरोखर बदल झालेला आहे.
भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले पाच शील
विपश्यनेमध्ये पाच शीलांचं आचरण आपल्याला करावा लागतो.
१) चोरी करू नये.
२) हिंसा करू नये.
३) शिवीगाळ करू नये.
४) व्यसन करू नये आणि
५) व्याभिचार करू नये.