सत्ता म्हणजे काय ? | Satta mhaje kay ?
सत्ता ही प्रत्येकालाच हवी असते. ती राजकीय मिळवण्यासाठी आज अनेक राजकीय पक्ष नाना प्रकारचे प्रयत्न आणि आश्वासने लोकांना देत असतात. सत्तेचे इतकी आस कशी काय लोकांना असते? नेमके power म्हणजे काय ते आपण या पोस्ट मध्ये पाहूयात.
विचारवंतानी सत्तेची केलेली व्याख्या | Definition of power ?
खरेतर अनेक विचारवंतानी सत्तेची व्याख्या केलेल्या आहेत.
एरीक रो यांच्या मते, “ज्यास जनतेचे समर्थन किंवा स्वीकृती प्राप्त असते व जीचा वापर करून सरकार व सरकारी कर्मचारी जनतेचे नेतृत्व करतात त्या शक्तीला सत्ता म्हणतात.”
मॅकाइवर त्यांच्या मते “दुसऱ्याकडून आदेशाचे पालन करवून घेण्याची शक्ती म्हणजे सत्ता होय.” त्यांनी सत्तेची व्याख्या शक्तीच्या रूपात केली जाते.
“आपल्या उद्देश्याला दुसऱ्याकडून स्वीकृत करवून घेण्याची शक्ती म्हणजे सत्ता होय.” अशी व्याख्या जोवनल यांनी केली आहे .
बिच यांच्या मते,“दुसर्याच्या कार्याला अधिमान्य अधिकाराद्वारे निर्देशित किंवा प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता होय.”
७ युनोस्कोच्या १९५५ च्या अहवालानुसार, “स्वीकृत, सन्मानीत ज्ञान व अधिमान्यता पूर्ण शक्ती म्हणजे सत्ता होय.”
थोडक्यात Satta ही विधिमान्य व अधिमान्यता स्वरूपात वापरली जाणारी शक्ती आहे व सत्ताधारकाकडून आधिनस्थांवर सत्तेचा वापर केला जातो.
सत्तेची वैशिष्टे/स्वरूप
आपण सत्तेची वैशिष्टे/स्वरूप आपल्या दैनंदिन जीवनातील दिवसभरातील उदाहरणाद्वारे समजून घेऊयात.
सत्ता ही संबंधात्मक स्वरुपात असते
घरातील प्रमुख (उदा. आई/वडील) सकाळी कुटुंबातील सदस्यांना काय काय करावे, कधी उठावे असे सांगतात. हे सत्तेचे संबंधात्मक स्वरूप दर्शवते.
पदाशी संबंधीत
शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी आणि शिकवण्यासाठी सत्तेचा वापर करतात. हे पदाशी संबंधीत सत्तेचे उदाहरण आहे.
उद्देश्यात्मक
दुपारच्या जेवणासाठी कोणते पदार्थ बनवायचे यावर कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. शेवटी, सर्वसम्मतीने निर्णय घेतला जातो. हे सत्तेचे उद्देश्यात्मक स्वरूप दर्शवते.
दुसऱ्याच्या व्यवहाराला प्रभावित करण्याची क्षमता
ऑफिसमध्ये बॉस कर्मचाऱ्यांना काय काय काम करावे असे निर्देश देतात. हे सत्तेचे दुसऱ्याच्या व्यवहाराला प्रभावित करण्याची क्षमता दर्शवते.
वैधानिक मान्यता
मतदानाच्या माध्यमातून नागरिक सरकार निवडतात आणि सरकारला कायदे बनवण्याची आणि अंमलात आणण्याची सत्ता प्रदान करतात. हे सत्तेला वैधानिक मान्यता प्रदान करते.
मर्यादित वापर
सरकार कायदे बनवून आणि अंमलात आणून नागरिकांवर नियंत्रण ठेवते, परंतु हे नियंत्रण कायद्याच्या चौकटीतच असते. हे सत्तेच्या मर्यादित वापराचे उदाहरण आहे
सत्ताधारकाचे स्वरूप स्पष्ट असते
सरकारमध्ये मंत्री, आमदार, खासदार सारखे सत्ताधारी असतात आणि त्यांचे स्वरूप स्पष्ट असते.
अमुर्त स्वरूप
सत्ता ही एक अमूर्त संकल्पना आहे जी स्पर्श किंवा दृष्टीने अनुभवता येत नाही.
सापेक्षिक स्वरूप
Satta ही सापेक्ष आहे कारण ती परिस्थितीनुसार बदलू शकते.
अधिमान्य व स्वीकृतीयुक्त
सत्ता ही लोकांनी स्वीकारलेली आणि मान्य केलेली असते.
जबाबदारी युक्त
सत्ताधारकांना त्यांच्या कृतीसाठी आणि निर्णयासाठी लोकांना जबाब द्यावा लागतो.
सत्तेचे स्रोत समजून घेण्यसाठी पुढील लिंक वर लिंक करावे. सत्तेचे स्त्रोत कोणते आहेत | What Is Source Of Power ?