आचारसंहिता म्हणजे काय? | Model Code of Conduct of Violations?
आचारसंहिता हे निवडणूक आयोग लागू करते. आपल्याकडे केंद्र आणि राज्य निवडणूक आयोग आहे. जेव्हा केंद्र आणि राज्यांचे इलेक्शन असते त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग हे आचार संहिता जाहीर करते. जेव्हा पंचायत राज व्यवस्थेचे निवडणूक असते तेव्हा त्यात राज्याच्या निवडणूक आयोग हे आचारसंहिता आणते. आचारसंहिता ही एक मार्गदर्शिका असते. राजकीय पक्ष आणि सत्तेमध्ये असणाऱ्या राजकीय पक्षाना लागू होते. थोडक्यात काय करावे आणि काय करू नये.
आचारसंहिता म्हणजे काय?
निवडणूक आयोगाकडून कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली जाते. त्यावेळी तारखा जाहीर करताच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती कायम राहते.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या त्या राज्यांमध्ये, तसेच पंचायत राज व्यवस्थेचे निवडणूक असते तेव्हा आचारसंहिता लागू केली जाते.
आदर्श आचारसंहितेमध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार, सभा, मिरवणुकांचे नियोजन कसे करावं, त्यासाठी काय नियम आहेत याचा एक आराखडा आचारसंहितेत नमूद असतो.
निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही पक्ष किंवा उमेदवाराने समाजात द्वेष पसरेल किंवा त्याच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध जाती आणि समूदायामध्ये धार्मिक किवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कृती करू नये.
अधिकची माहितीसाठी खालील pdf वाचू शकता.