कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना | Classical thinker Karl Marx’s Class concept ?
वर्ग किंवा वर्गव्यवस्था ही संकल्पना जातिव्यवस्थेच्या उलटी आहे. जात ही जन्माने मिळते आणि ती बदलता येत नाही. त्यामुळे गतिशीलतेला म्हणजे प्रगतीला वाव नसते.जात बंद स्तरीकरणाच्या ( Close Stratification ) प्रकारात मोडते. वर्गव्यवस्था ही जातीव्यवस्थापेक्षा वेगळी आहे. एका विशिष्ट वर्गात जन्मलेल्या व्यक्ती, कठोर परिश्रम आणि यशाद्वारे, उच्च वर्गात जाऊ शकतात. या वैशिष्ट्यामुळे वर्ग वर्गव्यवस्था तुलनेने खुली स्तरीकरण ( Open Stratification ) प्रकारात येते. ज्यामुळे सामाजिक गतिशीलता घडून येण्यास मदत होते. व्यक्तीची प्रगती घडून येते. असे असले तरी वर्गव्यवस्थेमध्ये सुद्धा बंद स्तरीकरणाचा अनुभव येऊ शकते याबाबत कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना कडे कसे बघतात हे या पोस्ट मध्ये आपण पाहूयात.
कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना | यांनी वर्ग संकल्पनेबद्दल काय म्हटले?
मार्क्सवादी दृष्टीकोनातून, एक वर्ग हा एक सामाजिक गट आहे. असा सामाजिक समूह की, ज्यातील सदस्यांचे उत्पादनाच्या साधनांशी किंवा शक्तींशी सारखेच संबंध असतात. त्यांनी उत्पादनाच्या साधनांच्या संबंधावर आधारित वर्गांची व्याख्या केली.
कार्ल मार्क्स वर्ग संकल्पना मध्ये समाजात दोन प्रमुख वर्ग सांगितले.
पहिला वर्ग म्हणजे बुर्जुआ– म्हणजे भांडवलदार वर्ग, ज्याच्याकडे उत्पादनाची साधने आहेत.
दुसरा वर्ग म्हणजे सर्वहारा वर्ग: म्हणजे कामगार वर्ग, ज्याच्याकडे उत्पादनाचे साधन नसून उत्पादनासाठी मजूर पुरवतो.
आहेरे ( भांडवलदार) पैसा, कारखाने, जमीन, यंत्रे – संपत्ती निर्माण करणारी साधने अश्यांना त्यांनी भांडवलदार म्हटले आहे. यांना अर्थव्यवस्थेचे इंजिन ते समजतात.
नाहीरे -स्वतःच्या श्रमाशिवाय काहीही त्यांचे कडे नसते. ते आपली कौशल्ये आणि घाम बुर्जुआ वर्गाला विकतात, त्याबदल्यात वेतन त्यांना मिळते.
मार्क्सच्या मते, भांडवलदार आणि कामगार मालकीतील हा मूलभूत फरक त्यांच्या जीवनात तीव्र विरोधाभास निर्माण करतो.
बुर्जुआ वर्ग विशेषाधिकार, संपत्ती आणि सत्ता उपभोगतात.
सर्वहारा वर्गाला त्रास, शोषण आणि स्वतःच्या नशिबावर मर्यादित नियंत्रणाचा सामना करावा लागतो.