सामाजिक भूमिका व्याख्या व अर्थ | Definition & Meaning Of Social Role
सामाजिक भूमिका व्याख्या
राल्फ लिंटन यांच्या मते, “ सामाजिक भूमिका म्हणजे स्थानाचा गतिशील पैलू होय.” (” A role represents the dynamic aspect of position – Ralph Linton )
2) टॉलकॉट पार्सन्स यांच्या मतानुसार, “कृतीत रूपांतर झालेल्या दर्जाला भूमिका.”
(“The role is status translated into action” Talcott Parsons )
3) एलि चिनॉय यांच्या मते, “भूमिका म्हणजे विशिष्ट दर्जा धारण करणाऱ्या व्यक्तींना करावे लागणारे किंवा त्यांच्याकडून अपेक्षित असलेले वर्तन होय. ”
(“Role is the pattern of behavior expected or required of persons who occupy a particular status – Ely Chinoy )
भूमिका या संज्ञेचा अर्थ
समूहातील वा समाजातील त्या त्या दर्जावर असलेल्या व्यक्तींनी संबंधित दर्जाशी निगडित अशा हक्कांप्रमाणे आणि कर्तव्यांप्रमाणे व्यक्तींनी वागावे अशी समाजाची अपेक्षा असा भूमिका या संज्ञेचा अर्थ वरील व्याख्यांवरून स्पष्ट होतो.
दुसऱ्या शब्दात, भूमिका हा दर्जाचा कृतिशील पैलू आहे. अर्थात समाजाच्या अपेक्षेप्रमाणे, म्हणजेच भूमिकेप्रमाणे व्यक्तीचे वर्तन व्हावे असे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात अगदी तंतोतंत असे घडतेच असे नाही. उदा. शिक्षकाने जसे बागावे अशी अपेक्षा असते, अगदी त्याबरहुकूम प्रत्येक शिक्षक प्रत्यक्षात वागतोच असे नाही.
भूमिका बठविणे म्हणजे काय ? ( Role playing )
प्रत्येक व्यक्ती आपापल्या भूमिकेप्रमाणे वागण्याचा जो प्रयत्न करते त्याला “भूमिका बठविणे” ( Role playing ) असे म्हणतात
भूमिका-वर्तन म्हणजे काय ( Role Performance )
भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वर्तनाचा निर्देश करण्यासाठी “भूमिका -वर्तन” ( Role Performance किंवा Role – Behavior ) असा शब्दप्रयोग करण्यात येतो.
भूमिका-संच म्हणजे काय ( Role- set )
प्रत्येक दर्जाशी संबंधित अशा अनेक भूमिका असू शकतात. एकाच सामाजिक स्थानाशी किंवा एकाच दर्जाशी संरचनात्मकरीत्या संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा एकत्रितरीत्या निर्देश करण्यासाठी “भूमिका -संच” ( Role – set ) ही संकल्पना समाजशास्त्रज्ञ वापरतात
बहुविध भूमिका ( Multiple roles ), दर्जा -संच” ( Status set )&भूमिका प्रबलीकरण ( Role reinforcement )
व्यक्ती जी निरनिराळी सामाजिक स्थाने भूषवित असते. त्या सर्वांचा एकत्रितरीत्या निर्देश करण्यासाठी “दर्जा -संच” ( Status set ) ही संज्ञा वापरली जाते, त्या त्या स्थानानुरूप ज्या विविध भूमिका पार पाडीत असते. त्यांचा एकत्रितरीत्या निर्देश करण्यासाठी “बहुविध भूमिका” ( Multiple roles ) ही संज्ञा वापरली जाते. अशा बहुविष भूमिकांपैकी एक भूमिका वठविताना दुसन्या भूमिकेची मदत होऊ शकते. यास उद्देशून “भूमिका प्रबलीकरण” ( Role reinforcement ) असे म्हणतात. पण सर्वच वेळा असे घडत नाही. त्यामुळे तर काही वेळा अपेक्षेप्रमाणे भूमिका वठविण्यात अडचणी येतात.
भूमिका-तणाव म्हणजे काय ( Role strain )
जेव्हा एकाच भूमिकेत संघर्ष निर्माण करणाऱ्या परस्परविरोधी अशा अपेक्षा असतात तेव्हा ती भूमिका पार पाडताना व्यक्तीला ज्या तणावाला तोंड द्यावे लागते त्याचे वर्णन करण्यासाग्ठी “भूमिका-तणाव” ( Role strain ) अशी संज्ञा वापरली जाते.
उदा. जेव्हा सुरक्षितपणे प्रवास करता येतो, तेव्हाच आगबोटीचा समुद्रप्रवास सुरू ठेवावा अशी बोटीच्या कप्तानाकडून अपेक्षा असते. पण त्याच वेळी कप्तानाने ठरलेल्या दिवशी उरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी किनाच्यावर बोटीतील माल पोहोचता करावा अशीही अपेक्षा असते. कारण असे झाले नाही तर कंपनीला हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असते. बोटीच्या रडार यंत्रणेत बिघाड झाल्याचे जेव्हा कप्तानाला सांगण्यात येते, तेव्हा मात्र वर उल्लेखिलेल्या दोन परस्परविरोधी अपेक्षांमुळे कप्तानाच्या मनाची दोलायमान अवस्था होते. अशा परिस्थितीत कप्तानाला जो ताण–तणाव सहन करावा लागतो. तो त्याच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित नसतो, तर त्याच्या भूमिकाविषयक परस्परविरोधी अपेक्षामुळे निर्माण झालेला असतो. म्हणून समाजशास्त्रज्ञ अशा तणावाचे वर्णन ” भूमिका तणाव ” असे करतात.
भूमिका संघर्ष म्हणजे काय ( Role Conflict )
एकाच वेळी जेव्हा व्यक्ती एकाहून अधिक दर्जे धारण करीत असते. आणि अन्य दर्जाशी संबंधित अशा भूमिकाविषयक अपेक्षांचे उल्लंघन केल्याखेरीज तिला जेव्हा एखादी भूमिका वठविणे अशक्य होऊन बसते तेव्हा त्या परिस्थितीचा निर्देश ” भूमिका संघर्ष ” ( Role Conflict ) या संज्ञेने समाजशास्त्रज्ञ करतात