Common Sense in Sociology | सामान्यज्ञान म्हणजे काय?
समाजशास्त्र हे ज्या गोष्टींचा अभ्यास करते, त्याबद्दल आपल्याला थोडेसे ज्ञान आहे किंवा आपण ते कधी कधी आपल्या आयुष्यात अनुभवले आहे असे वाटते. या गोष्टीकरिता आवश्यक बुद्धिमता आपल्याला आहे, तर मग समाजशास्त्रचा अभ्यास कश्यासाठी करायचे. ते तर सामन्याज्ञानच आहे. (Many people believe that sociology is just common sense). सामन्याज्ञानद्वारे व्यक्तींकडील आलेले ज्ञान हे काहीवेळा अचूक असले तरी, नेहमीच विश्वासार्ह असेल असे नाही, कारण ते तथ्यांचे पद्धतशीर विश्लेषण करण्याऐवजी सामान्यतः धारण केलेल्या विश्वासांवर अवलंबून असते.
सामान्यज्ञान म्हणजे काय? | What is Common Sense?
आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टी, कृती करण्याकरिता लागणारे ज्ञान, जे सवयीने बनते अथवा मिळते. एखादी गोष्ट करण्याकरिता असणाऱ्या ज्ञानाला सामान्यज्ञान असे वेबर म्हणतो. जेव्हा आपण इतर समाजांचा अभ्यास व आपल्या स्वतःच्या समाजाचा अभ्यास करत असतो तेव्हा कॉमनसेन्स आपल्याला भरकटवू शकते. दिशा भूल करू शकते.
समाजशास्त्रज्ञ हे इतर विषयाच्या शास्त्रप्रमाणे, एखाद्या गोष्टीला सत्य म्हणून स्वीकारत नाहीत, कारण कॅमन्ससेन्सवर आधारलेल्या गोष्टी कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकाला माहित असतेच. त्याऐवजी, माहितीच्या प्रत्येक भागाची चाचणी (fact finding) आणि तपशील ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर इतर डेटाच्या संबंधात विश्लेषण केले पाहिजे. त्यानंतर ते स्वीकारणे समाजशास्त्राला मान्य वाटते. समाजशास्त्र कोणत्याही सामाजिक घटनेचे वर्णन करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि अंदाज लावण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या एकत्रित केलेल्या तथ्यांवर अवलंबून असते.
Some Common Sense examples | कॉमनसेन्सच्या ज्ञानावर वरील उदाहरणे
पृथ्वी सपाट आहे’ ( Common Sense )
उदा. ‘पृथ्वी सपाट आहे’ यावर लोकांचा विश्वास होता. ‘कॉमनसेन्स’ म्हणून लोकांनी ते मान्य हि केले होते. मात्र ग्रीक विचारवंत पायथागोरस आणि अॅरिस्टॉटल या विचारवंतांनी पृथ्वी गोल आहे असे सांगितले. तेव्हा ते लोकांना कळाले. अशा कल्पना आजही आपल्यात आहेत.
समान उंचीवरून मोठ्या वस्तू लहान वस्तूंपेक्षा वेगाने पडतील.
हजारो वर्षे लोकांच्या सामान्यज्ञानाने त्यांना सांगितले होते की, एका विशिष्ट समान उंचीवरील अंतरावरून दोन वेगळ्या वजनाच्या व आकाराच्या वस्तू एकाच वेळी खाली सोडल्या तर मोठ्या वस्तू लहान वस्तूंपेक्षा वेगाने पडतील असे व्यक्तीचा कॉमनसेन्स होता.
विमान आणि पक्षी यांच्या धडक झाली तर, विमानाला काही होऊ शकणार नाही. ( Common Sense )
आकाशात जर, विमान आणि पक्षी यांच्या धडक झाली तर, विमानाला काही होऊ शकणार नाही असे व्यक्तीचा येथे हि कॉमनसेन्स सांगेल. परंतु या दोन्ही घटना आपण समजतो तश्या नाहीत.
पहिल्या घटनेत तथ्य (fact) हे आहे की, हवेमध्ये कोणत्याही गोष्टींचा वेग हा सारखा असतो. सारख्याच उर्जा घेऊन त्या गुरुत्वाकर्षणमुळे खेचल्या जातात.
दुसऱ्या घटनेत जेव्हा विमानाच आकाशात किंवा लँडिंगच्या वेळी विमानाचा वेग खूप वेगवान असतो. या दरम्यान, सामान्य वजनाच्या पक्ष्याची टक्कर होऊनही, पक्ष्याच्या गतीमध्ये झपाट्याने बदल होतो. यामुळे पक्षी आणि विमानाची परस्पर शक्ती वाढते. यामुळे विमानाचे नुकसान होते आणि कधी कधी ते विमान कोसळल्याचे उदारहण आहे. वर्तमानपत्रात या बातम्या वाचतो. व्यक्तीचा यावर विश्वास बसत नाही.
स्त्रिया संवेदनशील असतात, स्त्रियांचे काम फक्त चूल व मुल पुरतेच आहे.
स्त्रिया संवेदनशील असतात, स्त्रियांचे काम फक्त चूल व मुल पुरतेच आहे. ममता फक्त आईमध्येच. मर्द को दर्द नही हो था . पुरुष रडू शकत नाही, अश्या बऱ्याच सामान्यज्ञानावर आधारलेल्या असंख्य गोष्टी या नेहमीच खरे नसतात.
काही लोकप्रिय निरिक्षण खरे असू शकतात परंतु इतर अनेक सामान्यज्ञान हे अनुभवजन्य डेटाद्वारे मान्यता पावलेली नसतात. या प्रचलित गोष्टीमध्ये तथ्यसंगतता नसते. बरेच सामान्यज्ञानाचे निष्कर्ष हे अंदाज, अनुमान, अज्ञान, पूर्वग्रह, चुकीचा अर्थ लावून व व्यवस्थित प्रयोग न करता काढलेले असतात. अश्या सामान्यज्ञानाला आल्फ्रेड शुत्झ हे गृहीत धरलेले ज्ञान समजतात. (Taken for granted Knowledge.) सामान्यःता अश्या ज्ञानाला कोणीही प्रश्न करीत नाहीत.