आनंदी हार्मोन्स जाणून घ्या | Happy hormones in Marathi
सुख आणि दुख हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. जेव्हा व्यक्तीला सुख असते तेव्हा मात्र तो आनंदी असतो. आनंदी असतो ते काही आनंदी हार्मोन्समुळे. ते नेमके काय असते हे आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
आपल्या शरीरात आणि डोक्यामध्ये काही आनंद रस असतात. त्याला शास्त्रीय विज्ञानाच्या भाषेत हार्मोन्स त्याला मराठीत आपण संप्रेरक असे म्हणतो. आनंदी संप्रेरक, ज्याला “फील-गुड हार्मोन्स” देखील म्हणतात, हे शरीरातील रसायनांचे एक समूह आहेत. जे आनंद, सुखद अनुभव आणि हवे हवे असणाऱ्या या भावनांसाठी जबाबदार असतात. हे संप्रेरक मूड, भावना आणि एकूणच मानसिक आरोग्य नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चला तर जाणून घेऊयात आनंदी हार्मोन्स आहेत तरी कोणते ते.
आनंदी हार्मोन्स | Happy hormones | feel-good hormones,
सेरोटोनिन | Serotonin
Serotonin ला सहसा “आनंदी संप्रेरक” म्हणून संबोधले जाते कारण ते आनंद, आरामशीर आणि आरोग्यदायी यांच्या भावनांमध्ये योगदान देते. हे मूड, झोप आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते.
डोपामाइन | Dopamine
Dopamine हे आनंद, बक्षीस, प्रेरणा आणि मजबुती यांच्याशी संबंधित आहे. हे मेंदूच्या बक्षीस प्रणालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि मूड, लक्ष आणि हालचाल नियंत्रित करण्याचे काम करते.
एंडोर्फिन | Endorphins
Endorphins हे शरीराद्वारे तयार होणारे नैसर्गिक वेदनाशामक आहेत. ते व्यायाम, उत्साह आणि हास्य सारख्या गोष्टी घडल्यावर आपल्या शरीरात सोडले जातात. एंडोर्फिन एक उत्साही भावना निर्माण करतात. आणि तणाव कमी करण्यास मदत करते. एंडोर्फिनमुळे व्यक्ती मोठेमोठे दुख पचवतो. तुम्ही एकदम तुटून पडण्याऐवजी सावरता.
निसर्गात वेळ घालवा
ऑक्सिटोसिन | Oxytocin
ऑक्सिटोसिनला लव्ह हार्मोन असे म्हटले जाते कारण ते शारीरिक स्पर्श, सामाजिक बंधन आणि प्रेम, माया आणि जवळिकीमुळे, आपुलकीच्या कृती दरम्यान आपल्या शरीरात सोडले जाते हे विश्वास, कनेक्शन आणि भावनिक बंधनाच्या भावनांना प्रोत्साहन देते.
आनंदी जीवन जगण्यासाठी आनंदी हार्मोन्स कसे वाढवाल.
आनंदी हार्मोन्स रोटोनिन, डोपामाइन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे संप्रेरक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात काम करतात. म्हणून असे हार्मोन्स वाढवले पाहिजे.
तुमच्या शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढवण्याचे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत. येथे काही धोरणे आहेत ज्या तुम्ही प्रयत्न करू शकता.
- नियमित व्यायाम करणे. किमान रोज 30 मिनिटे व्यायाम करीत जा. भरभर चाला.
- दररोज घराबाहेर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहा. सूर्यप्रकाश मेंदूमध्ये सेरोटोनिनचे उत्पादन उत्तेजित करतो.
- आरोग्यदायी आहार घ्यावे. चौरस आहार असुद्या. चिकन, सॅल्मन, अंडी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ घ्या. .
- पुरेशी झोप घ्या दररोज रात्री 7-9 तासांची गुणवत्तापूर्ण झोप घेत चला.
- ताण विरहीत जीवन जगावे. त्यासाठी ध्यान, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग किंवा तुम्हाला आवडणारे छंद आणि गोष्टी करीत जा. .
- नाती जपा. प्रियजनांसोबत वेळ घालावा.
- मसाज आणि बॉडीवर्क करीत चला. मसाज आणि इतर प्रकारच्या बॉडीवर्कमुळे आराम मिळतो आणि सेरोटोनिनची पातळी वाढते.