Bard काय आहे? | Bard AI in Marathi
Bard काय आहे? हा प्रश्न तुम्हांला नक्कीच पडला असेल. तुम्ही Bard Hi म्हणालात की तुम्हांला लगेच प्रतिसाद मिळतो. Hi there! How can I help you today? (नमस्कार! आज मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?) नंतर तुम्ही तुमचे नाव लिहा. लगेच Bard तुम्हांला त्यांची ओळख करून देईल.
‘……. तुमचे नाव घेईल आणि म्हणेल , तुम्हाला भेटून आनंद झाला. मी बार्ड आहे, Google AI ने तयार केलेला मी एक मोठे भाषा मॉडेल. मी एक मशीन लर्निंग मॉडेल आहे ज्याला मजकूर तयार करण्यासाठी, विविध भाषांचे भाषांतर करण्यासाठी, विविध प्रकारची सर्जनशील सामग्री आशय लिहिण्यासाठी आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे माहितीपूर्ण पद्धतीने देण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे. मी अजूनही विकसित होत आहे. परंतु मी यासह अनेक प्रकारची कार्ये करण्यास शिकलो आहे.’
तुमच्या सूचनांचे पालन करण्याचा आणि तुमच्या विनंत्या विचारपूर्वक पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तुमच्या प्रश्नांची उत्तरे सर्वसमावेशक आणि माहितीपूर्ण पद्धतीने देण्यासाठी मी माझ्या ज्ञानाचा वापर करीन, जरी ते दीर्घोत्तरी, आव्हानात्मक किंवा ज्ञात नसले तरी तरीही देईन. मी वेगवेगळे सर्जनशील किंवा सृजनात्मक नाविन्यपूर्ण पद्धतीने मजकूर स्वरूप तयार करेन. मजकूर सामग्री किंवा आशय , जसे की कविता, मापदंड / नियम , संहिता, स्क्रिप्ट्स, संगीताचे तुकडे, ईमेल, अक्षरे इ. तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.
कृपया आज मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ते मला सांगा.
वरील प्रमाणे मला प्रतिसाद bard करून पहिल्यांदा मिळाला होता. मग सुरु होतो खेळ अनेक प्रश्न विचारून माहिती मिळविण्याच्या ट्रायल आणि एरर करीत प्रश्न करा उत्तरे मिळवा.
Bard मोबाईल वर कसे वापराल | How to use Bard on mobile phone
व्यक्ती आपली सर्व जिज्ञास आशय रूपातील माहिती द्वारे शमविण्याचा प्रयत्न करतो.
तुम्हांला प्रश्न पडला असेल की मी मोबाईल किंवा pc कसे वापरू शकतो. खरे तर Bard वापरणे अतिशय सोपे आहे. ती एक वेबसाईट आहे. प्रथम तुम्ही कोणत्यही ब्राउजर वर जाऊन पुढील URL टाका – https://bard.google.com/ तुमच्या मोबाईल किंवा PC वरील जो इमेल ID आहे त्यावर Sign in करा. नंतर चित्रात दिलेली प्रक्रिया तुम्हाल करावी लागेल.
वरील प्रक्रिया आपण पूर्ण केल्यास आपणास खालील chat विंडो दिसेल ज्यात तुम्ही प्रश्न विचारून कोणतेही माहिती मिळवू शकता?
Bard च्या आधी मार्केट मध्ये ChatGPT आले होते. त्याला open AI या कंपनीने तयार केला होता. google कंपनीला त्यांनी टक्कर दिली होती. लगेचच गुगल कंपनीने त्यांच्या स्वतःचा AI तंत्रज्ञानानावर आधारित Bard AI भाषा मॉडेल तयार केले आहे. तुम्ही दोन्ही platform वरून माहिती मिळवू शकता. मिळालेल्या माहितीची तुलना करू शकता.आवश्यक ती माहिती व्हेरीफाय करून घेऊ शकता. फक्त डोळे बंद करून माहिती घेऊ नये. नक्कीच या दोन्ही chatbot कडे माणसापेक्षा जास्त ज्ञान आहे. त्यांना माणसानेच तयार केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या काही मर्यादा असतात. त्या दूर करण्यासाठी तुम्ही या तंत्रज्ञानाचा आधार नक्कीच घ्या. दररोज तुमचे ज्ञान वाढवा. प्रगती करा.
धन्यवाद.