कविता- स्वार्थी माणूसाचे रूप | Selfish Man
माणसा रे माणसा तू आहेस तरी कसा.
मनात एक, तोंडात एक ठेवून बोलतो तरी कसा.
खातो पितो छान, मग होतो का बेभान. तुझ्याच हाताने का करत असतो तू घाण.
माणसा रे माणसा तू आहेस तरी कसा.
नाही थांगपत्ता लागे तुझ्या या मनाचे, काट्यानेच काटा काढून का करतो तू समाधान.
नको मनी विष, राग लोभ द्वेष, त्याने होते फक्त स्वतःचेच नास.
होऊन अविचारी का करतो बर पाप, प्रेम तुला समजे का नाही होत उदार.
माणसा रे माणसा तू आहेस तरी कसा.
सृष्टीचा विश्वास तुझ्यावर, तरी करतो तिचा तू नाश, स्वार्थी लोभी वृत्तीने होईल तुझाच विनाश…..
माणसा रे माणसा तू आहेस तरी कसा.