नेतृत्व | लीडर | Leadership | What is Leader?
नेतृत्व हे एक गुण आहे. इंग्रजीत नेतुत्वला लीडर असे म्हणतात. इतरांवर प्रभाव पाडू शकणारी व्यक्ती म्हणजे नेता होय, अशी एक ढोबळ व्याख्या करण्यात आलेली आहे. विशेष असे गुण, क्षमता तसेच कौशल्य असलेली व्यक्ती म्हणजे लीडर होय.
लीडर मध्ये काय? | नेतृत्व म्हणजे काय? | पुढारीपण म्हणजे काय?
समूह किंवा गटाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याकरिता शिष्यत्व पत्करलेल्या लोकांना एकात्मतेने वागण्यास उत्तेजन देणारी ही एक
वागण्याची पद्धत आहे म्हणजे पुढारीपण होय.
लीडरमध्ये लोकांना प्रभावित करण्याची क्षमता असते. लोकांना खेचून घेणे किंवा लोकांना लीडरचे आकर्षण असते. म्हणून लीडर हा लोकांना जोडून ठेवतो. लोकांवर लीडरची छाप असते. लिडरच्या वागण्याचा-बोलण्याचा, विचारचा लोकांवर प्रभाव पडतो. प्राचीन काळी जेष्ठ किंवा शूरवीर यांना लीडर केले जायचे. असे लोक जे पराक्रमी होते. मनगटाच्या जोरावर लढाई जिंकून ते नेतुत्व करीत असत.
नेतृत्व लीडरशिप किंवा पुढारीपण यामध्ये चार घटक
- नेता
- शिष्य / अनुयायी
- परिस्थिती ( नेता तयार करणारी आणि शिष्य वाढवणारी )
आणि - समूह उद्दिष्ट किंवा कार्य. ( नेता आणि शिष्य यांना प्रेरणा देणारी गोष्ट )
नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची आहे.
- लोकांना एकजूट ठेवणे,
- समूह उद्दिष्ट किंवा कार्य पार पडण्यासाठी कार्यविभागणी करणे,
- सर्व व्यक्तींमध्ये सुसंवाद साधणे व सर्वांचे समाधान करणे यांची जबाबदारी नेतृत्वावर असते.
- संकटकाळी मार्गदर्शन करणे.
- संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना करणे.
- नेता समूहाच्या आकांक्षांकरिता काम करणे.
नेता यांची व्याख्या प्रचलित आहेत,-
इतरांवर प्रभाव पाडू शकणारी व्यक्ती म्हणजे नेता होय, अशी एक ढोबळ व्याख्या करण्यात आलेली आहे. परंतु ही काही सर्वसमावेशक अशी व्याख्या नाही. व्यक्ती अनेक प्रकारे प्रभाव पडत असते. याचा अर्थ ही नेहमी नेता असतेच असे नाही. नेता बनण्यासाठी लोकांची मान्यता असते. लोक हे लीडर म्हणून एखद्या व्यक्तीला स्वीकारतात. नेत्याचे वर्चस्व हे लोकांनी स्वखुशीने स्वीकारलेल असत.
आर्. बी. कॅटेल यांनी केलेली नेता यांची व्याख्या.
‘एकूण समूहाच्या कार्यावर ज्या व्यक्तीचा निर्विवाद प्रभाव असतो, जी समूहामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते, जिच्यामुळे समूहाचे मनोबल व एकंदर समूहशक्ती टिकून राहते आणि जी समूहाच्या अभिवृत्तीमध्ये (व परिणामी वर्तनात) बदल घडवून आणू शकते, ती व्यक्ती म्हणजे त्या समूहाचा नेता होय’.
या व्याख्येशी पुढील व्याख्याही जुळती आहे: ‘नेता म्हणजे गटास त्याच्या उद्दिष्टांकडे नेणारा, त्याकरिता
गटांतील सदस्यांना मार्गदर्शन करणारा, उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गातील अडचणींचे निराकरण करू शकणार व गटांतील सदस्यांकडून योग्य ते कार्य करून घेऊ शकणारा इत्यादी क्षमता असलेली श्रेष्ठ दर्जाची व्यक्ती म्हणजे लीडर होय.
नेतृत्वाचे मुख्यत्वे दोन
(१) हुकूमशाही नेतृत्व
हुकूमशाही नेतृत्व सर्व सत्ता स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचे सर्वश्रेष्ठ स्थान टिकवण्याचा प्रयत्न करतो. धोरणे ठरवताना, योजना आखताना, समूहासाठी त्याने ठरविलेला संपूर्ण कार्यक्रम तो सर्वस्वी उघड करीत नाही व स्वतःच्या बेतांची कल्पना इतरांना देत नाही.
समूहातील महत्त्वाच्या व्यक्तींशी तो स्वतंत्रपणे संबंध ठेवतो. आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध स्वतःच्या स्थानास धोकादायक ठरणार नाहीत, याविषयी तो दक्ष असतो. स्वतःचे महत्त्व अबाधित राहावे म्हणून तो अन्य कुणालाही फार काळपर्यंत महत्त्व लाभू देत नाही. अनुयायांमध्ये मोकळेपणाने मिसळत नाही. धर्म, पक्ष, पंथ, राष्ट्र इ. विषयींच्या लोकांच्या भावनांना आवाहन करून स्वतःचे नेतृत्व टिकवण्याचे प्रयत्नही त्याच्याकडून होतात.
(२) लोकशाही नेतृत्व.
लोकशाही नेतृत्वाची शैली निराळ्या प्रकारची असते. नेता स्वतःच्या हाती सर्व सत्ता केंद्रित करून न ठेवता सत्तेचे वितरण करतो. अधिकाधिक लोकाभिमुख होऊन तो स्वतःचे नेतृत्व टिकवितो. लोकांचे प्रेम व आदर हे लोकशाही नेत्याच्या प्रतिष्ठेचे अधिष्ठान असते. लोकशाही वृत्तीचा नेता समूहाशी वा त्यातील महत्त्वाच्या व्यक्तींशी विचारविनिमय करून व समूहाच्या इच्छा-आकांक्षांचा आदर करून उद्दिष्टे, धोरणे व कार्यक्रम ठरवतो तसेच एकंदर कार्यक्रमाची स्पष्ट व पूर्ण कल्पना लोकांना देतो.
धाकदपटशा व भीती या तंत्रास लोकशाही नेतृत्वात स्थान नसते. समूहातील विविध घटकांत सहकार्याची भावना वाढीस लावली जाते व प्रत्येकाच्या कर्तृत्वास अवसर दिला जातो. समूहातील व्यक्तींना स्वतःचे विचार व भावना व्यक्त करण्यास मुभा असते. नेतृत्वाचे कार्य: समूहाचे प्रयोजन व स्वरूप, समूहातील लोकांचे व्यक्तिमत्त्व आणि त्या त्या वेळचा प्रसंग या तीन गोष्टींवर नेतृत्वाला कराव्या लागणाऱ्या विशिष्ट भूमिका अवलंबून असतात.
अधिकार यांच्या आधारवर निर्माण होणारे नेतृत्वाचे प्रकार
सुप्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ माक्स वेबर यांनी अधिकाराचे तीन प्रकार सांगितले आहे. अशा अधिकाराद्वारे समाजात व्यक्ती नेतुत्व करीत असतात.
- पारंपरिक नेतृत्व व अधिकार
- दैवी किंवा करिष्माई नेतृत्व किंव अधिकार
- कायदेशीर मिळालेले नेतृत्व किंवा अधिकार
पारंपरिक नेतृत्व व अधिकार
समूहाकडून नेतुत्व सोपविताना व्यक्तीचे वय, लिंग, वर्ग किंवा जात, व्यवसाय, सामाजिक स्थान, राजकीय स्थान पाहतात.
दैवी किंवा करिष्माई नेतृत्व किंव अधिकार
अशा नेतृत्वाच्या ठिकाणी सामान्यजनांना अलौकिकत्व व दिव्यत्वाचे दर्शन होते व त्यांची गणना ईश्वरी अवतार किंवा प्रेषित म्हणून होऊ लागते. या प्रकारच्या नेतृत्वास वेबरने ‘दैविक नेतृत्व’ ही संज्ञा दिली. हे नेतृत्व चिरकाल नसते व सातत्याने टिकणारे नसते.
कायदेशीर मिळालेले नेतृत्व किंवा अधिकार
हे नेतृत्व व्यक्तीला कायद्याने मिळते. व्यक्ती भूषवित असलेल्या पदामुळे हे नेतृत्व व्यक्तीला मिळते. जो पर्यत व्यक्ती पदावर असते तो पर्यत त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. एकदा का पदावर वरून पायउतार झाले लोक अशा नेतुत्वास विचार नाही.
मार्टिन कॉनवे याने नेतृत्वाचे वर्गीकरण पुढील प्रकारे केले आहे:
- लोकांच्या आकांक्षा समजून घेऊन त्यांना वाचा फोडणारे नेतृत्व,
- समूहाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करणारे नेतृत्व,
- समूहाच्या इच्छांबरोबरच समूहाच्या हिताचा विचार करणारे आणि त्या दृष्टीने कार्यक्रम आखणारे समूह–संघटक नेतृत्व व
- नवीन विचार प्रसृत करून त्यास अनुसरणारा समूह निर्माण करणारे नेतृत्व.
नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती संदर्भातील महत्वाच्या गोष्टी
- गटाला असे वाटले पाहिजे, की नेता हा त्यांच्यातीलच एक आहे. तो बाहेरचा नाही. नेता ज्या मुल्यांवर विश्वास ठेवतो, त्याच मुल्यांवर गट सुद्धा विश्वास ठेवतो. नेता आणि गट यांच्या अभिवृत्ती यांमध्ये फरक नसतो. नेता हा समूह किंवा गट यांच्या छोट्या मोठ्या सामाजिक जीवनात सहभागी होत असतो. गटांच्या सार्वजनिक कार्यात सहभाग घेतो.
- शिष्य किंवा अनुयायांना ज्यांच्याकडे ते नेता म्हणून पाहतात त्यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण अधिक प्रमाणात आहेत. तो सर्वगुणसंपन्न आहे असे गटांना आणि शिष्याला वाटायला हवे.
- नेत्याचे वागणे हे अनुकरणीय असावे. नेत्याप्रमाणेच बहुतांश गटांतील सदस्य आणि लोक हे त्याला अनुकरण करतात.
- नेत्याने गटांच्या अपेक्षा विचारात घेऊन काम करायला हवे.
नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला पुढील कार्य करावे लागते.
- संयोजन : समूहाच्या तात्कालिक गरजा व उपलब्ध साधने, दूरवरची उद्दिष्टे व त्यांची साधने, या सर्वांचा
विचार करून योजना आखणे, - धोरणे ठरविणे,
- धोरणांची अंमलबजावणी व त्यासाठी कार्यविभागणी करणे,
- तज्ञ या नात्याने साहाय्य करणे,
- समूहाचे प्रतिनिधित्व करणे,
- समूहातील व्यक्तिव्यक्तींतील किंवा समूहांतर्गत गटागटांतील संबंधांवर व त्यांच्या वर्तनावर आवश्यक त्या उपायांचा अवलंब करून नियंत्रण ठेवणे,
- स्वतःचे वर्तन नमुनेदार ठेवून समूहापुढे आदर्श ठेवणे व
- समूहाचा रक्षणकर्ता म्हणून एक प्रकारे पित्याची भूमिका सांभाळणे.
आज लोकांना कोणते नेतुत्व हवे आहे,
- नेतृत्वशील वव्यक्ती ही मित्रत्वाची वृत्ती ठेऊन वागणारी असावी.
- निर्णय घेताना विचारविनिमय व सामुहिक निर्णयास प्रोत्साहन देणारी नेतुत्व हवे असते.
- नेता व्यक्ती गटांतील आणि समूहातील प्रत्येकाच्या कर्तृत्वास आणि गुणांस वाव देणारी हवी.लोकशाही मूल्यवर विश्वास व श्रद्धा असलेल्या नेतृत्वाखालील गटामध्ये समानता, न्याय, स्वावलंबन, सर्जनशीलता, सहकार्यवृत्ती,
ऐक्यभाव आणि एकजूट ही मुल्ये दिसतात.