टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | मुदत विमा | Term insurance in Marathi
टर्म इन्शुरन्स ला मराठी मध्ये मुदत विमा असे म्हणतात. हा एक जीवन विम्याचा प्रकार आहे. आजच्या तारखेला अनेक जीवन सुरक्षा देणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसि आहे. अश्या विमाच्या मुख्य उद्देश हा असतो की, जेव्हा घरातील कमावत्या व्यक्तीवर संकटआल्यावर त्या कुटुंबाला सर्वसमावेशक आर्थिक संरक्षण प्रदान करणे.
तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात किती रुपयाचे आर्थिक संरक्षण हवे आहे. हे तुमचे आताचे उत्पन्न आणि तुम्ही खरेदी केलेल्या मुदतीच्या विमा योजनेवर अवलंबून असते. पॉलिसीच्या मुदती दरम्यान जर तुमचा अकाली मृत्यू झाल्यास काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून तुमच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते. तुमच्या अनुपस्थितीत मिळालेले हे पैसे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी आणि त्याच्या जीवनाला पुढील आधार म्हणून मदत करते.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | What is Term insurance ?
जेव्हा तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करता, तेव्हा टर्म इन्शुरन्सचा अर्थ जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासोबतच तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी कोणती योजना योग्य असेल हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
टर्म इन्शुरन्स म्हणजे कमावत्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात केले जाणारे आर्थिक नियोजन होय.
उदाहरणार्थ:-
तुम्ही निवडलेल्या टर्म इन्शुरन्सचे लाइफ कव्हर हे तुमच्या कुटुंबाच्या नियमित खर्चासाठी, मुलांचे शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्यांसाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे असावे.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असाल, तर टर्म इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या अनपेक्षित दुर्दैवी होणाऱ्या मृत्यूच्या घटनेला सामोरे जाण्यास मदत करू शकते. आणि तुम्ही हयात नसतानाही तुमचे कुटुंब व्यवस्थित जगू शकेल यांची हमी देते.
टर्म इन्शुरन्स कुठे आणि कोणते घ्यावे, जाणून घ्या -स्टेप बाय स्टेप प्रकिया.
प्रथम www.policybazaar.com च्या website वर जावे. तेथे गेल्यावर तुम्हांला डाव्याबाजूला दिसणारी फिल्ड दिसेल. तेथे विचारल्याप्रमाणे माहिती भरा.
विशेष सूचना:- संपूर्ण खरी माहिती द्या. आरोग्याबाबत कोणतीही माहिती लपवू नका.
View Free Quotes वर क्लिक केल्यावर इतर बेसिक माहिती जसे की तुमचे पेमेंट etc. विचारण्यात येईल ती माहिती आपणास भरावे लागेल. एकूणच तुमच्या कुटुंबाची गरज, तुमचे पेमेंट विचारात घेऊन तुम्हांला Insurance Cover निवडावे लागेल.
जर तुमचे वय हे बत्तीस असेल आणि आणि तुम्हांला 50 लाखाचे कव्हर हवे असेल तर insurance cover 50 लाख निवडा. तुम्हांला कोणत्या कंपनीचे insurance हवे ते निवडा. तुम्हांला किती प्रीमियम बसणार हे दिसेल. 865 प्रीमियम तुम्हांला दिसेल.
दिसणाऱ्या मिळ प्रीमियम मध्ये काही add on करणार असाल तर add on करू शकता. वरील टर्म insurance बरोबर तुम्ही अपघात विमा, गंभीर आजारपणातील उपचार अश्या काही गोष्टी जर तुम्ही या insurance add करणार असेल तर प्रीमियमची मूळ रक्कम तुमची वाढेल. ते दिसेल ही. काही बऱ्याच कंपन्या या पहिल्या वर्षीच्या प्रीमियममध्ये 5% सवलत/ सूट देतात. मात्र दुसऱ्या वर्षापासून सवलत मिळत नाही. तुम्हांला पूर्ण रक्कम भरावी लागते.
इन्शुरन्स कंपनीस प्रपोजल देताना लागतात खालील दस्तावेज
- वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड
- जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा लायसन्स
- PAN कार्ड
- पासपोर्ट साईज चे फोटो
- तुम्ही ज्या संस्थेस वा कंपनीत काम काम करीत आहात त्यांचे मागील तीन महिन्याचे पेमेंट स्लीप इत्यादी गोष्टी अपलोड कराव्या लागतात.
चालू वर्षाचे प्रीमियम ऑफर प्रथम भरा. पैसे भरल्यानंतर तुमचे कंपनीकडे प्रपोसल जाते. याकामासाठी आपणास कंपनीचा कस्टमर केयर सदस्य फॉर्म भरण्यास मदत करतो. कंपनीकडे प्रपोसल गेल्यावर अनेक पद्धतीने तुमचे व्हेरिफिकेशन होते.
काही कंपनी ऑनलाईन पद्धतीने तुमची मुलाखत घेऊन तुमच्या आरोग्याबाबत विचारू पूस करते. तुम्हांला कोणते आजार आहे का ते पाहते. हे व्हिडीओ call द्वारे केले जाते. हा व्हिडीओ call रेकॉर्ड केला जातो. तुम्हांला बहुतांश प्रश्ने ही Yes आणि NO मध्ये द्यावे लागेल.
त्यानंतर तुम्हांला फिजिकल body व्हेरिफिकेशनला बोलावले जाते. तुमच्या अनेक टेस्ट केल्या जातात. त्यावर तुमची सही घेतली जाते.
संपूर्ण प्रकिया संपल्यावर तुम्ही हेल्थ स्थिती, आजार आणि वय हे सर्व पाहून तुम्हांला प्रीमियम भरण्याचा हप्ता सांगते.
मुख्य टर्म इन्शुरन्स प्लान मध्ये add on होणाऱ्या विविध रायडर संदर्भात जाऊन घ्या.
गंभीर आजाराचा राइडरचा कव्हर असतो. तो घेतल्यास रायडर अंतर्गत समाविष्ट असलेल्या कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी तुमच्या कुटुंबाला होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानाविरुद्ध, एक रकमी रक्कम दिली जाते.
अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व राइडर घेतल्यास
अपघात झाल्यास त्याच्या तीव्रतेनुसार, तुमचा वैद्यकीय खर्च आणि उत्पन्नाचे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची आवश्यकता असू शकते.
अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व रायडरसह टर्म इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करण्यास मदत करतात.
अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व राइडर हा तुम्हाला अपघाती अपंगत्व आणि मृत्यूपासून संरक्षण देऊन तुमच्या कुटुंबाला विस्तारित आर्थिक संरक्षण प्रदान करतो.
अनेक पेआउट पर्याय असतात.
Policy काढतानाचा तुम्ही तात्काळ एक रक्कम एकदाच 100% पैसे मिळावे हा पर्याय निवडू शकता. नॉमिनीला इन्शुरन्सची मोठी रक्कम हाताळू शकणार नसेल तर दरमहा निश्चित रक्कम मिळविता येते.
टर्म इन्शुरन्सचे प्राथमिक फायदे
तुम्ही नसताना तुमच्या कुटुंबाचे काय होईल ही चिंता मिटते.
तुमच्या कुटुंबाचे जगणे सुकर होते.
मुलांचे प्रशिक्षण व लग्न आणि आजारपणात मदत होते.
एकदमच तुमचे कुटुंब हे रस्त्यावर येत नाही.