शिकणे ही अविरत चालणारी प्रक्रिया | तुम्ही आज नवीन काय शिकलात | What is your new learning of the day?
मित्रांनो, आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकत असतो. हे शिकणे कळत-नकळत घडत असते. यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. जेव्हा आपण अश्या नवीन शिकलेल्या गोष्टींची जाणीवपूर्वक नोंद ठेवतो. तेव्हा मात्र आपण अधिक जिज्ञासू बनतो. याकरिता फक्त एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी नवीन काय शिकलो? किंवा आजचे माझे नवीन शिकणे काय होते. जे यापूर्वी, मला माहिती नव्हते आणि ते मला आज समजले.
एखादी गोष्ट माहिती असणे वा नसणे याला घेऊन तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका.
आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी अश्या असतात, त्या आपण पहिल्यांदाच करीत असतो. याचा अर्थ असा होत नाही की, ती गोष्ट दुसऱ्यांना माहिती नसावी. कदाचित ती दुसऱ्यांना माहिती असू शकते. असा ही अनुभव येतो की, तुम्हांला एखादी गोष्ट येते किंवा त्यांची माहिती असते. जी दुसऱ्याला माहिती नसते वा त्यांना येत नसते. त्यामुळे तुम्ही लगेच प्रतिक्रिया देता. “तुम्हांला हे माहिती नाही. तुझे कसे होणार!” जर तुम्ही दुसऱ्याला अशी प्रतिक्रिया दिली तर दुसरे पण अशी प्रतिक्रिया तुम्हास जेव्हा एखादी गोष्ट माहिती असते तेव्हा देऊ शकतात.
तुम्ही हे पहिले असलाच, एखादे मुल आहे ज्याचे वय फक्त 7 वर्षाचे आहे. एक दुसरा व्यक्ती आहे ज्यांचे वय हे 35 वर्षाचे आहे. 7 वर्षाच्या मुलासा जे माहिती आहे ते 35 वर्षाच्या व्यक्तीस माहिती नसते. तसेच उलटेही घडते.
आज तुमचे जे काही वय आहे ते राहू द्या. या वयात तुम्ही एखादी गोष्ट पाहता, शिकता, ऐकता किंवा अनुभवता. मात्र कोणीतरी या सर्व गोष्टी ह्या खूप लहानपणी पाहिलेल्या असतात. ऐकलेल्या असतात. अनुभवलेल्या असतात. माहिती असणाऱ्यांना माहिती नसणाऱ्या यांना कमी लेखात कामा नये. परंतु एखाद्या वेगळ्या गोष्टीत ते नक्कीच तुमच्या पेक्षा जास्तीचे असू शकतात. आश्चर्यचकित होण्याची गरज नसते. हे ध्यानात घेऊन समोरच्याशी व्यवहार करावे.
तुम्हांला आलेला अनुभव शेयर करा.
मी तुमच्याकडून नवीन गोष्ट शिकलो असे म्हणत चला.
ज्याच्याकडून तुम्ही काहीही नवीन शिकता, त्यांना “मी तुमच्याकडून ही गोष्ट शिकलो” असे म्हणत चला. त्यांचे आभार माना. आपण माणूसआहोत. माणूसच चुका करतो. चुकीतूनच तो शिकतो.
तुम्ही नक्कीच हे वाक्य वाचले असाल, “सरावाने व्यक्ती परिपूर्ण बनतो.” जगात असा कोणी नाही की त्यांनी एकदा एखादी गोष्ट केली अथवा वाचली आणि ती कायमची येते किंवा लक्षात राहते. ज्याही गोष्टीची आपण उजळणी किंवा सराव करणार आहात, दिवसातून एकदा का होईना आपण त्याचे व्यवस्थित पणे एकाग्रतेने चिंतन करणे आवश्यक आहे. परत परत उजळणी, सराव किंवा चिंतन केल्याने अधिक गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे येण्यास मदत होते.
चुका -शिका,चुका-शिका हा अविरत चालणार प्रवास आणि प्रक्रिया अविरत चालू राहून आपण शिकतो याला प्रयत्न प्रमाद उत्पत्ती असते म्हणतात. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. काही विषयात आणि जीवनाच्या एखाद्या अंगात ती नक्कीच सरस असू शकेल मात्र त्याला सर्वच येते असे कधी होत नाही. तुम्ही एखाद्या कडून नवीन गोष्टी शिकल्याचे तुमचा अनुभव शेयर करा.
तुमचा अनुभव शेयर करा.
ज्याला जी गोष्ट येते ती शिकण्यासाठी त्यांचे शिष्यत्व पत्कारा.
व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. मरे पर्यत तो नवनवीन गोष्टी शिकत असतो. शिकणे ही प्रक्रिया कधीच पूर्ण होत नाही. शिकणे थांबवलात ते प्रगती संपते. साचलेल्या डबक्यातील पाण्यासारखे व्यक्ती ज्ञान होते. म्हणून थांबला तो संपला किंवा वाचाल तर वाचाल हे यासाठी म्हटले जाते. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती आहे. ते कश्यात ना कश्यात एक्सपर्ट आहेत. तरबेज आहे. ते त्या गोष्टीत सर्वउत्कृष्ट आहेत. अश्या लोकांचे शिष्यत्व पत्कारा, ज्ञान ग्रहण करा. त्यांचे गुरु उपदेश स्वीकारा. तर तुम्ही ती गोष्ट शिकलात. कमी वेळेत तुम्ही गोष्टी शिकू शकतात.
कधी कधी नकळत त्यांच्या सोबतच्या आंतरक्रियेतून आपणास बऱ्याच नवीन गोष्टी शिकत असतो. जाणीवपूर्वक आपणास वागावे लागेल.
झोपताना करा स्मरण आज नवीन शिकणे झालेल्या गोष्टीचा.
रोज रात्री झोपण्यापुर्वी तुम्ही हे कराच. आज मी काय शिकलो ? What is my new learning of this day? शिकलेल्या गोष्टी कोणत्या ह्या गोष्टी तुम्हांला समजतील. काहीच शिकणे झाले नाही तर तुमचा दिवस वाया समजा.
रोज नवीन काही तरी शिकणे यांचा निश्चय करा.
दिवसाकाठी काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. माहिती नसलेली गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बघा चमत्कार, तुमचा वेळ वाया जाणार नाही. आळस तुम्हांला येणार नाही. वेळेचा सदुपयोग होईल.