झोप पुरेशी घेण्याचे फायदे | Benefits of sleep in Marathi
जर तुम्हाला दररोजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने करायचे असेल तर, प्रथम पुरेशी झोप घ्या. त्याची सुरुवात आधल्या दिवशीच्या रात्री करायला हवे. तुम्ही जाणून असलाच की, व्यक्तीला कमीत काम 6 तासची निद्रा हवी असते. आणि जास्तीत जास्त 8 तासच्या विश्रांतीची आवश्यकता असते. व्यक्तिपरत्वे झोपेची गरज ही वेगवेगळ्या वयोगट यांची वेगळी असते.
सर्वात जास्त झोप घेतात 1-5 महिन्याचे मूल
लहान मुले सर्वात जास्त झोपतात. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळा 12 ते 16 तासाच्या झोपेची गरज असते. एक ते दोन वर्षाच्या मुलांना 11-16 तास निद्रा घेते, जसे जसे वय वाढत जाते तसे झोपेचे प्रमाण कमी होते. वयस्क व्यक्ती 4-5 तासाची निद्रा घेतात. प्रत्येक व्यक्तीची ही गरज ही वेगवेगळी असते. ‘लवकर झोप, लवकर उठा’ असा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो.
तुम्ही स्वःता तुमच्या शरीराचे पहिले डॉक्टर असता.
हे लक्षात नेहमी ठेवा की, या जगात तुम्ही स्वःता तुमच्या शरीराचे पाहिले डॉक्टर असता. तुमच्या सुखदायक व दुखदायक शारीरिक बदल, भाव भावना (feeling)व वेदना हे तुम्हांला प्रथम समजते. त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी अंथरुणातून वरून उठता त्यावेळी तुम्हांला कसे वाटते. यावरून तुम्हीची झोप झाली आहे कि नाही हे ठरते. झोप कमी असेल तर त्याचे तोटे काय असतात ते पाहूयात
सुद्रुढ आरोग्यासाठी निद्रा महत्वाची | पुरेशी झोप घेण्याचे फायदे बघूयात.
पुरेशी झोपेमुळे व्यक्ती होतो एकदम प्रसन्न, उत्साहाने काम करतो.
पुरेशी निद्रा घेऊन जर आपण सकाळी उठलो असेल तर पुनर्जीवन किंवा पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटते. एकदम प्रसन्न, कोणतेही टेंशन नाही. प्रत्येक गोष्ट आपण उत्साहाने हिरीहिरीने करतो. आळस कुठल्या कुठे पाळलेला असतो.
काम गुणवत्ता चंगल्या झोपेमुळे येते.
जेही आपण काम करू त्यात गुणवत्ता येते. आपण क्रियाशीलपणे कार्यरत राहतो.कामावर आपली संपुर्ण पकड असते. कामात एकाग्रता येते आणि साहजिक आपला कॉन्फिडन्स वाढतो. कोणत्याही परिस्थिती तुमच्या समोर येऊ द्या, व्यक्ती खेळीमिळीने परिस्थिती हाताळते. मनात कोणतेही नकारात्मक विचार येत नाही. पूर्ण क्षमतेने आपण काम करतो.
झोप ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच आहे.
आपण झोपेचे सन्मान करणे आवश्यक आहे. कारण झोप ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच आहे. निद्रा ही पैशाने विकत घेता येत नाही. आज कृत्रिमरित्या झोपेच्या गोळ्या व काही अल्कोहोल युक्त पेय लोक घेतात, त्यामुळे झोप तर चांगली येतेच मात्र त्याचा दुष्परिणाम (side effect) हे शरीरावर व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या मेंदूवर होतो. मेंदूची विचार शक्ती मारण्याचे काम झोपेच्या गोळ्या व ही पेये करीत असतात.
नैसर्गिक झोप घेण्याचा प्रयत्न करावे.
झोपताना खोलीत पुरेसा गडद अंधार असावा, आपल्या शरीराला तशी सवय लावावी. कृत्रिम रित्या आपण झोपे करीत औषधे /ड्रिंक करीत असेल तर शरीराला त्याची सवय लागते. तसे न करता नैसर्गिक झोप घेण्याचा प्रयत्न करावे. एकदा सवय व्यक्तीला लागली की ती व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते. सवय चांगली असो व वाईट एकदा लागली की त्यांचे फळ हे आपल्याला मिळणारच.
शरीराला लागणाऱ्या एकूण उर्जेतील 80% ऊर्जा मेंदू वापरतो.
व्यक्तीच्या शरीराला जेवढी ऊर्जा लागते त्यातील 80 ऊर्जा मेंदू वापरतो. आपण अन्नाव्दारे मिळवलेली ऊर्जा बहुतांश मेंदू वापरतो. सर्वांत जास्त विश्रांती सुद्धा मेंदूला लागतो. मेंदूची ही गरज आपण पुरेशी झोप घेऊन भागवणे आवश्यक आहे.
कंप्युटर चा जसा CPU असतो तसा आपला मेंदू. त्यात बिघाड म्हणजे सगळीकडेच बिघाड. एक म्हण आपण ऐकलेच असाल की,”सर सलामत तो पगडी पचास” ही म्हण डोक्यातील मेंदूचे महत्व अधोरेखित करते. हे ‘सर’ आपण पुरेशी झोप, मोटारसायकलवर असताना हेल्मेट, चारचाकी वाहन वर असताना सीटबेल्ट लावूनच वाचवू शकतो.
नवीन विचार तयार तेव्हाच तयार होतात जेव्हा तुम्ही चांगली झोप घेता.
विचार हे शस्त्रासारखे असते. ते येतात आपल्या खोबणीतील मेंदूतुन. मेंदू हे पुरेशी झोप शिवाय व्यवस्थितपणे काम करू शकत नाही. त्यासाठी आपणास शरीरातील जैविक घड्याळ समजून कृती कराव्या लागतील