लोकशाही उत्सव | How to Celebrate Democracy festival
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, आपला देश 15 ऑगस्ट-1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतात स्वतःचे शासन स्थापन करण्यासाठी घटना समिती तयार करण्यात आली. वेगवेगळ्या देशातील राज्यघटनेच्या अभ्यास करून या घटना समितीने संविधान लिखाणाचे काम केले. हे संविधान जवळपास 2 वर्षे 11 महिने 17 दिवस हे काम चालले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे स्वतः प्रत अर्पण करून अधिनियमित करण्यात आले. त्यानंतर भारतात जन्म झाला लोकशाहीचा. या पोस्ट मध्ये लोकशाही उत्सव, तो का साजरा करायचा आणि त्यांचे महत्व आणि लोकशाही उत्सव साजरा करताना राबवता येतील असे कृती कार्यक्रम इत्यादी माहिती मिळेल.
26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन ( लोकशाही उत्सव )
प्रत्यक्षात 26 जानेवारी 1950 रोजी या दिवसापासून आपल्या देशाचा कारभार हे संविधानानुसार सुरु झाले. संविधाणाची अंमलबजावणी या दिवशी झाली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा करतो.
2023 साली भारत साजरा करणार 74 वे प्रजासत्ताक दिन
देश आता 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. प्रजासत्ताक दिना निमिताने राष्ट्रध्वज हे राष्ट्रपतीच्या हस्ते फडकवला जातो. कारण भारतातील लोकशाहीचा कारभार हा राष्ट्रपतीच्या वतीने चालतो. राष्ट्रपती भवन समोरील राजपथ मार्ग येथे हा राष्ट्रध्वज फडकवला जातो.
देशात पहिल्यादाच पहिल्या आदिवसी महिला राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू या राष्ट्रध्वज फडकविनार
या वेळी देशातील पहिल्या आदिवसी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवतील. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाहेरील देशातील एखाद्या राष्ट्रपतीला आमंत्रण देण्यात आलेले असते. यावेळी च्या 26 जानेवारी-2023 रोजीच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे ( Chief guest ) इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देलफताह एल-सिसी उपस्थित राहणार आहे.
भारताची अंतिम सत्ता ही लोकांच्या हातात आहे.
आपल्या संविधानाने भारतीय लोकांना सर्वोच्च ताकद सत्ता दिली आहे. म्हणूनच आपण म्हणतो आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभौम. लोक हे सर्वश्रेष्ठ आहे. देशाची अंतिम सत्ता ही लोकांच्या हातात असते
संविधान वैश्विक मुल्यांवर उभा आहे.
आपले संविधान ज्या वैश्विक मुल्यांवर उभा आहे, ती मुल्ये प्रत्येक भारतीय नागरिकांनी आत्मसात केली पाहिजे.
- समाजवादी,
- धर्मनिरपेक्षता,
- लोकशाही,
- न्याय,
- स्वातंत्र्य,
- समता,
- एकता
- एकत्मता आणि
- बंधुता
लोकशाही उत्सव जागर
संविधानिक मूल्यांना घेऊन जनमानसात त्यांची रुजवणूक करण्याची नितांत गरज आहे. या मूल्यांना घेऊन लोकांचा दृष्टीकोन तयार करणे. . नुसते ही मुल्ये बोलून दाखवली की, त्या लोक अंगिकारतील असे होत नाही. म्हणून विविध संविधानिक मुल्यांची संदेश देणाऱ्या कृती, मुल्यांवरील श्रद्धा तयार करणे आवश्यक आहे.
आदर्श समाज जे संविधानिक मुल्यांवर आधारित असेल
संविधानिक मुल्यांवर आधारित असा आदर्श समाजात तयार करण्यासाठी जसे आपण दिवाळी व दसरा या सारख्या सण साजरे करतो तसे लोकशाही उत्सव साजरा करण्याची काळजीची गरज बनली आहे. असे उत्सव हे एक दिवस न करता कमीतकमी एक सप्ताह तरी व्हावे, हळू हळू ते वाढवत पंधरवडा व महिनाभर साजरे व्हायला हवे तरच ते जन सामन्याचा हृदयात बसेल. तरच संविधानिक मूल्यांनुरूप कृती लोकांकडून घडेल.
बोध मुल्ये देणाऱ्या कृती-कार्यक्रम आणि वैचारिक विचार संचाची निर्मिती करणे
संविधानिक मुल्ये व हक्क-अधिकार लोक ग्रहण करण्याच्या उद्देशाने बोध मुल्ये देणाऱ्या कृती-कार्यक्रम आणि आदर्श देणाऱ्या वैचारिक विचार संचाची निर्मिती करणे गरजेचे आहे. संविधानिक मुल्य आधारित अश्या विचार संचाची पेरणी ही लोकशाही उत्सवच्या विविध कार्यक्रममधून करण्याची गरजा आहे.
पदोपदी लोकांना त्यांच्या मुलभूत हक्क-अधिकार सोबतच त्यांच्या एक नागरिक म्हणून असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देताना प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे हे आपले पहिले कर्तव्य आहे हे लोकांना प्रथम सांगावे.
लोकशाही उत्सवाचे उद्दिष्ट
घटनेतील मूल्यांचे, हक्क-अधिकारांचे जनजागृती करून ते जनमानसात खोलवर रुजवून त्यांची जोपासना करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे. सत्तेचे विकेंद्रीकरण, आणि लोकशाहीच्या सर्वोच्च शिखरावर लोक हित ठेऊन लोकाधिकार मान्य असलेली राज्यसत्ता निवडून आणण्यास लोकजागृतीची ज्योततेवत ठेवणे हे लोकशाही उत्सवाचे उद्दिष्टे असायला हवे.
लोकशाही उत्सव राबविताना छोट्या कृती करून महान परिणाम
- लोकांना संविधान उद्देशिका लोकांना भेट द्या. ती लोकांना समजून सांगा.
- उद्देशिका तोंडपाठ असणाऱ्या बक्षिसे द्या.
- उद्देशिकेतील विविध मुल्यांची ओळखत करून द्या.
- लोकांना संविधानावरील पुस्तके लोकांना द्या.
- संविधान उद्देशिका माळ तयार करा आणि उपक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांना हर ऐवजी ते त्यांच्या गळ्यात सत्कार करा. सन्मान तर होताच. समाजाला यातून संदेश ही वेगळा जातो.