जीवन बदलणाऱ्या 10 सवयी | 10 Habits Changes Your Life
तुम्ही नक्कीच एकले असाल की माणूस हा सवयीच गुलाम असतो. एकदा का एखादी सवय मग ती चांगली असो किंवा वाईट तुम्हांला लागली की ती लवकर सुटत नसते. हे एक तत्व ( Principle) आहे. या तत्वानुसार आपण अशा काही सवयी आहेत, त्या आत्मसात केल्या की नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल. चला तर पाहूयात जीवन बदलणाऱ्या 10 सवयी.
जीवन बदलणाऱ्या 10 सवयी कोणत्या?
लवकर झोपणे आणि लवकर उठणे .

नेहमी लक्षात ठेवा की, चांगल्या दिवसाची सुरुवात ही, आदल्या रात्री तुम्ही किती वाजता झोपता यावर अवलंबून असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक मनोरंजनाची साधने-गझेट, स्मार्टफोन, TV व इतर गोष्टीमुळे आपण लवकर झोपत नाही. त्याचा परिणाम हे दुसऱ्या दिवसावर होतो.
साधारणपाने झोपण्याची वेळ ही रात्री 10 ते पहाटे 5 ही आहे. निरोगी आयुष्यासाठी कमीत कमी 7 व जास्तीत जास्त हे 8 तासाची झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेण्याचे अनेक फायदे आहेत. कमी झोप घेतल्यामुळे शरीरावर अनेक नकारत्मक परिणाम होतात.
नियमित व्यायाम योग व ध्यानधारणा करणे.

जेव्हा तुम्ही लवकर झोपून लवकर उठण्याची सवय लावून घ्याल तेव्हा तुमच्याकडे मुबलक वेळ असतो. उठल्यानंतर पहिले कोणते काम करायचे तर ते म्हणजे व्यायाम करणे. ‘निरोगी शरीरात निरोगी मन वास करते’. हे सुभाषित आपण वाचले असलाच. . कमीत कमी 40 ते 45 मिनिटांचा व्यायाम केला पाहिजे. व्यायमच्या जोडीला योग ध्यानधारणा ही करू शकता.
सुयोग्य सकस व संतुलित आहार घेणे.

नुसते व्यायाम करून उपयोग नाही तर त्यांच्या जोडीला आपण सकस आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहात जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके यांचे संतुलित प्रमाण असायला हवे.आपल्या आहारात पालेभाज्या, फळे, कच्च्या फळ भाज्या, दुध, अंडी, कडधान्ये, डाळी आणि मासे, चिकन इत्यादीचा करणे जेणेकरून आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होण्यासाठी हे गरजेचे आहे.
कामाची चेक लिस्ट तयार करा.

कामे वेळेवर संपविण्यासाठी कामाची यादी तयार करणे खूप गरजेचे आहे. एक छोटी डायरी करा. त्यामध्ये जे पण काम तुम्हांला आज दिवसभर करायचे आहे. अश्या सर्व गोष्टी नोंदवा. लिहिताना कोणताही विचार करू नका. फक्त जे पण कामे मनात येत आहे ते लिहा. कुठले काम आधी कुठले काम नंतर असे काही विचार न करता यादी तयार करा.
एकदा का यादी तयार झाली तर मग एक काम करा. कामाचे प्राधान्यक्रम ठरावा. म्हणजे कमी वेळात होणारे काम, अशी कामे जी मिनिट ते 10 मिनिटात होतील अशी त्यांना विशिष्ठ खून करा. त्यानंतर 10 मिनिटे ते 1 तास घेणाऱ्या कामाचा खूण करा.
एकूणच सुरुवात अशी करा की. जे कामे कमी वेळ घेतील ते प्रथम करा. जास्त वेळ घेणाऱ्या कामाची चढत्या क्रमाने कामाचे प्राधान्यक्रम बनेल असे लिहिलेल्या यादीत खुण किंवा टिक मार्क करू शकता.
नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

नेहमी शिष्य बना. ज्याला एखादी गोष्ट येते त्याच्याकडून तुम्ही शिष्य बनून ती गोष्ट पदरात पडून घेणे गरजेचे असते. तुमच्या पेक्षा ती व्यक्ती लहान असली तरी सुद्धा. ज्ञान, कौशल्ये व्यक्तीला सातत्याने मिळवत राहावे लागते. म्हणून दररोज नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते काहीही असू शकते, डिजिटल दुनियेतील गोष्टी असतील वा इतर कौशल्ये असतील.
कार्यरत असलेल्या क्षेत्राची अद्ययावत माहिती मिळवून स्वतः ला अपडेट ठेवा.

तुम्ही ही म्हण ऐकलीच असाल ‘थांबला तो संपला’ ही सर्वच क्षेत्रातील लोकांना लागू पडते. तुम्ही ज्याही क्षेत्रात कार्यरत त्या क्षेत्राबाबत संपूर्ण माहिती घ्याच. सोबत अद्ययावत माहिती मिळवून स्वतः ला अपडेट ठेवत चला. आलेल्या अनुभवाच्या आधारावर नवीन थेरी मांडण्याचा प्रयत्न करा. ज्ञान हे शेयर केल्याने वाढते असे म्हणतात. आपल्याकडे असलेल्या माहिती नव्याने सातत्याने भर घालून स्वतः अपडेट ठेवा.
एकदा हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय सोडू नका.
ही सवय एकदा का लागली तर आयुष्यातील बरेच समस्या कमी होतात. ही सवय विकसित करताना मात्र शरीराला ताण येतो. थोडासा ताण शरीराला देणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्या क्षमता वाढीस मदत होते.
थोडी थोडी विश्रांती घेऊन तुम्ही हाती घेतलेले कोणतेही काम प्रथम पूर्णकरण्याचा प्रयत्न करा. हळू हळू त्यांचे सवयीत रुपांतर होऊन मग तुम्ही जोही काम किंवा जबाबदारी हाती घ्याल पूर्ण होणारच.
नेहमी सकारात्मक विचार करा. जीवन बदलणाऱ्या 10 सवयी पैकी ही एक सवय आहे.
जीवनात सकारात्मक राहणे, आशावादी राहणे हे खूप गरजेचे आहे. यश मिळविण्यासाठी ते गरजेचे आहे. जीवनात कितीही वाईट परिस्थिती आली तरी अश्या स्थितीत सुद्धा चांगले काय आहे हे पहा. जेव्हा गोष्ट सकारात्मक घेण्याची सवय लागेल. तुम्ही विश्वास करा तुम्ही 100% यशस्वी व्हालच.
तुम्ही यशस्वी होत आहात. अशी सकारात्मक सोच विकसित करा. तसे चित्र व्हिजवलाईज करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही असे वारंवार कराल तेव्हा मात्र कळत नकळत तुम्ही तुमच्या ध्येय यांच्या दृष्टीने कामे करीत जाता आणि यश मिळविता.
विचारला कृतीची जोड द्या.
विचारला कृतीची जोड देत चला. ही एक सवय आहे हे मान्य करा. दिली तर नक्कीच आपण यशस्वी होण्यावाचून कोणी रोखू शकत नाही. अनेक व्यक्ती विचार तर करतात, परंतु विचारावर आधारित कोणतेही कृती मात्र करीत नाहीत.
एखाद्या अनुभवी व्यक्तीने जर तुम्हांला सल्ला दिला तर त्यावर लगेच कृती करणे गरजेचे असते. व्यक्तीकडून तसे होत नाही. तो फक्त ऐकतो. जे लोक ऐकतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. ते यशस्वी होतात. विचारला जर कृतीची जोड देत काम करण्याची सवय लागली तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.
वैयक्तिक आयुष्यात शिस्त लावून घेऊन जीवन जगणे.
शिस्त ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली मानली जाते. तुम्ही कुठे नोकरी असा अथवा नसा. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात शिस्त लावून घेणे खूप गरजेचे आहे. जर प्रत्येक गोष्ट शिस्तीत करण्याची सवय असेल तर वेळेत कामे होण्यास मदत होते. आपण लोकांचा शब्द पाळतो. वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या विकसित होते.
प्रत्येक गोष्ट वेळेत करण्याबाबतचे दंडक जर आपण स्वतःला घातले तर अपोआप हळूहळू त्याचे रुपांतर मात्र शिस्त मध्ये होण्यास मदत होते.