QUIZ on Career opportunities in Sociology | समाजशास्त्रातील करियर
QUIZ on Career opportunities in Sociology या पोस्ट मध्ये, समाजशास्त्राला जगाचे द्वार का समजले जाते? समाजशास्त्रात पदवी व पदवीधरांना कोणत्या करियर संधी उपलब्ध होतात? आणि समाजशास्त्रातील करियर व विविध क्षेत्रे कोणती आहे? या प्रश्नाची FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे आपणास मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करून प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on Career opportunities in Sociology.
समाजशास्त्रातील करियर आणि संधी या घटकांवरील प्रश्ने व उत्तरे
‘Sociology is the gate way of world’ म्हणजेच समाजशास्त्राला जगाचे द्वार समजले जाते. तर या विषयात जर कोणी पदवी घेतली असेल तर जगात कोठेही नोकरी करता येते. जसे कि आपणास माहितीच आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्रातील इतर विषयापेक्षा करियरची संधी या विषयात जास्त उपलब्ध आहे.
- समाजशास्त्र पदवीधरांकडे विविध कौशल्ये असतात
- टीममध्ये चांगले काम करतात.
- चांगले अहवाल लेखन करतात.
- चांगले श्रोते असतात.
- उत्तम संशोधन नियोजक हि जबाबदारी पार पडतात. (
- अहवाल डेटा गोळा करण्यास सक्षम असतात.
- सामाजिक समस्या आणि धोरणांच्या गंभीर विश्लेषणात चांगले भूमिका बजावतात.
- सामाजिक समस्यांची जाणीव असते.
समाजशास्त्राच्या विषयात पदवी किंवा पदवीत्तर झाल्यावर आपणांस नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
- शिक्षण क्षेत्र - MA नंतर आपण सेट (SET) व नेट ( NET) करून आपण असिस्टंट प्रोफेसर / सहाय्य्क प्राध्यापक बनून ग्रॅज्युयेट व पोस्ट ग्रॅज्युयेट च्या विद्यार्थ्याना Central and State Universities मध्ये सहाय्यक प्राध्यापक, कालांतराने प्राध्यापक बनू शकता.
- संशोधन क्षेत्र - विद्यापीठ अनुदान आयोग- University Grant Commission (UGC ) काम करू शकत, धोरण कर्ते (Policy Makers ), अध्यापन आणि संशोधन (Teaching and research) आणि नियोजन कर्ते ( Planning) इत्यादी अश्या विविध क्षेत्रात आपण फुल टाईम कार्यरत राहू शकता.
- सरकारी क्षेत्र- समाजशास्त्रात जर तुमच्याकडे BA डिग्री असेल तर तुम्ही सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षा देऊ शकता. MPSC, UPSC आणि सरळ सेवा भरती तुम्ही सहभागी होऊन सरकारी क्षेत्रातील (Government Sector) विविध पदांवर काम करू शकता. जसे की समाज कल्याण (Social welfare) , कायदा (Law), कामगार कल्याण आणि (Labour welfare) इत्यादी.
- सामाजिक क्षेत्र - समाजशास्त्रामुळे DSW, BSW आणि MSW या डिग्री नसताना ही सामाजिक क्षेत्रांत काम करण्याची मिळते संधी व जॉब मिळते. समाजशास्त्राची डिग्री असेल तर DSW, BSW आणि MSW या डिग्री नसताना ही सामाजिक क्षेत्रांत (Social Sector) कामाची संधी हमखास मिळते. विविध सामाजिक संस्थात व NGO मध्ये आपणांस कामाची संधी मिळते. शासकीय व निम्नशासकीय क्षेत्रातील संस्थामध्ये काम करू शकता.
- मनोरंजन व प्रसारमाध्यमे क्षेत्र- Sociology degree होल्डरला मनोरंजन व प्रसारमाध्यमे क्षेत्र (Entertainment & media Sector) आजकाल कामाचा अनेक संधी मिळत आहे. सामाजिक प्रश्न केंद्रित चित्रपट निर्मिती मध्ये समाजशास्त्रातील व्यक्तींचा सहभाग वाढत आहे.
- मार्गदर्शन समुपदेशक काम करू शकतो.
- मानव संसाधन (एचआर) प्रतिनिधी म्हणून काम करू शकतो.
- व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करू शकता.
- बाजार/ मार्केट संशोधन विश्लेषक म्हणून काम करतो.
- मीडिया प्लॅनर म्हणून काम करू शकतो.
- धोरण विश्लेषक असतात.
- जनसंपर्क (PR) विशेषज्ञ चांगली भूमिका निभवात.
- संवादक चांगली जबाबदारी पार पडते.
- समस्या सोडवणारे असतात.