QUIZ on the sociological imagination | समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती
QUIZ on the sociological imagination या पोस्ट मध्ये सामान्यज्ञान म्हणजे काय? त्यांचे एक उदाहरण तसेच समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती म्हणजे काय? आणि त्यांचे एक उदाहरण इत्यादीचे FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे आपणास मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on the sociological imagination.
सामान्यज्ञान आणि समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
- सामन्याज्ञानद्वारे व्यक्तींकडील आलेले ज्ञान हे काहीवेळा अचूक असले तरी, नेहमीच विश्वासार्ह असेल असे नाही, कारण ते तथ्यांचे पद्धतशीर विश्लेषण करण्याऐवजी सामान्यतः धारण केलेल्या विश्वासांवर अवलंबून असते.
- सामान्यज्ञान हे वैयक्तिक आणि नैसर्गिक गृहितकांवर आधारित असतात. जे एखाद्या व्यक्तीने बनवले असते आणि ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या नियमाप्रमाणे हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. लोकप्रिय श्रद्धेवर आधारित असतात.
- आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टी, कृती करण्याकरिता लागणारे ज्ञान, जे सवयीने बनते अथवा मिळते. एखादी गोष्ट करण्याकरिता असणाऱ्या ज्ञानाला सामान्यज्ञान असे वेबर म्हणतो. सामान्य ज्ञान हे वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. विविध परिस्थितींचा अनुभव घेताना सामान्य ज्ञान विकसित होते. सामान्यज्ञान हे परंपरेने तयार झालेले असते.
- उदाहरण 1. समान उंचीवरून मोठ्या वस्तू लहान वस्तूंपेक्षा वेगाने पडतील.
- हजारो वर्षे लोकांच्या सामान्यज्ञानाने त्यांना सांगितले होते की, एका विशिष्ट समान उंचीवरील अंतरावरून दोन वेगळ्या वजनाच्या व आकाराच्या वस्तू एकाच वेळी खाली सोडल्या तर मोठ्या वस्तू लहान वस्तूंपेक्षा वेगाने पडतील असे व्यक्तीचा कॉमनसेन्स होता.
- ‘समाजशास्त्रीय कल्पना’ हि संकल्पना अमेरिकन समाजशास्त्रज्ञ सी. राइट मिल्स यांनी 1959 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन’ या पुस्तकात मांडली आहे. -मिल्सने समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीची व्याख्या “अनुभव आणि व्यापक समाज यांच्यातील संबंधांची स्पष्ट जाणीव” अशी केली.
- समाजशास्त्रीय कल्पना म्हणजे वैयक्तिक अनुभव आणि व्यापक समाज यातील संबंध शोधण्याचा एक मार्ग होय.
- या संकल्पनेद्वारे व्यक्ती स्वःताचे अनुभवाच्या पलीकडे बघते आणि व्यापक स्तरावरील संरचनात्मक ज्या विविध शक्ती या व्यक्ती आणि त्यांच्या कृतींना कसे आकार देतात हे समजून घेते.
- समाजशास्त्रीय कल्पनाशक्ती तुम्हाला तुमचे जीवन आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक समस्यांकडे पाहण्यास आणि त्यांना इतर लोकांशी, इतिहासाशी किंवा सामाजिक संरचनांशी संबंधित ठेवण्यास सक्षम करते.
- उदा. बेरोजगारी हि वैयक्तिक समस्या & सार्वजनिक समस्या