QUIZ on Nature & Subject matter of Sociology | समाजशास्त्राचे स्वरूप व अभ्यास विषय
QUIZ on Nature & Subject matter of Sociology या पोस्ट मध्ये समाजशास्त्राचे स्वरूप व समाजशास्त्राचेअभ्यास विषय या वरील FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on Nature & Subject matter of Sociology
समाजशास्त्राचे स्वरूप आणि समाजशास्त्राचे अभ्यास विषय यावरील प्रश्ने व उत्तरे
समाजशास्त्र हे सामाजिक विज्ञान आहे. ‘विज्ञान’ मध्ये ज्यापद्धतीने शास्त्रीय पद्धतीद्वारे प्रयोग व निरीक्षण करून मिळवलेले ज्ञान असते. तसेच समाजशास्त्रात शास्त्रीय कसोट्याचा पद्धतशीर वापर करून ज्ञान मिळवले जाते. समाजशास्त्रातील ज्ञान हे वस्तुनिष्ठ, अनुभवजन्य, तार्किक, मूल्य-तटस्थ आणि पारदर्शक असते. म्हणून समाजशास्त्रला सामाजिक विज्ञान असे म्हणतात.
- समाजशास्त्राचे स्वरूप 1. समाजशास्त्र हे एक सामाजिक विज्ञान आहे. 2. समाजशास्त्र हे सामान्यीकरणाचे विज्ञान आहे. 3. समाजशास्त्र हे एक अमूर्त शास्त्र आहे. 4. समाजशास्त्र हे स्पष्ट (Categorical) विज्ञान आहे. 5. समाजशास्त्र हे एक शुद्ध विज्ञान आहे. 6. समाजशास्त्र हे दोन्ही तर्कसंगत आणि अनुभवजन्य विज्ञान आहे. 7. समाजशास्त्र हे एक सामान्य विज्ञान आहे.
- प्रत्येक मुद्द्यांचे थोडक्यात स्पष्टीकरण खालील प्रमाणे
- 1. समाजशास्त्र हे एक सामाजिक विज्ञान आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक विज्ञान आहे. नैसर्गिक विज्ञानमध्ये जसे नैसर्गिक घटनांचा अभ्यास केला जातो. (सजीव आणि निर्जीव दोन्ही). तसे समाजशास्त्र हे मानवी वर्तन, समाजातील मानव, मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाची रचना आणि समग्र समाज यांचा व्यापकपणे अभ्यास करते. म्हणून समाजशास्त्र एक सामाजिक विज्ञान आहे.
- 2. समाजशास्त्र हे सामान्यीकरणाचे विज्ञान आहे. समाजशास्त्र हे सामान्यीकरणाचे विज्ञान आहे. उदाहरणार्थ, समाजशास्त्राला एखाद्या विशिष्ट युद्धात (उदा. महाभारताचे युद्ध) रस नाही तर वारंवार घडणाऱ्या सामाजिक घटना म्हणून युद्ध किंवा क्रांतीच्या अभ्यासात रस आहे. समाजशास्त्र हे मानवी वर्तन आणि सहवास किंवा संबंध यातील सामान्य नियम किंवा तत्त्वे शोधते. त्याला सामान्य वैधतेचे सामान्यीकरण तयार करण्यात त्याला स्वारस्य आहे.
- 3. समाजशास्त्र हे एक अमूर्त शास्त्र आहे. समाजशास्त्र हे एक अमूर्त आहे, असे नाही. उदा. समाजशास्त्राला विशिष्ट कुटुंबाची माहिती घेण्यास त्याला रस नाही, तर कुटुंब एक सामाजिक संस्था म्हणून अभ्यासण्यास त्यास स्वारस्य आहे.
- 4. समाजशास्त्र हे स्पष्ट (Categorical) विज्ञान आहे. समाजशास्त्र हे काय?, केव्हा?, कसे? किंवा का? आणि कोठे? या मनुष्य आणि समाजाशी संबंधित प्रश्नांशी आहे. आणि समजा कसा असावा अथवा समाजात काय असले पाहिजे. (Not what ought to be? ) असे विचार करीत नाही.
- 5. समाजशास्त्र हे एक शुद्ध विज्ञान आहे. समाजशास्त्र हे ज्ञान संपादन करण्यात गुंतलेले आहे. आणि मात्र त्यास ज्ञानाच्या उपायोजनात किंवा वापरात रस नाही. म्हणून समाजशास्त्रावर कधी कधी टीका केली जाते. सैद्धांतिक ज्ञान मिळविण्यात समाजशास्त्राला रस आहे, मात्र त्यांच्या वापरण्यात बाबत नाही.
- 6. समाजशास्त्र हे दोन्ही तर्कसंगत आणि अनुभवजन्य विज्ञान आहे. समाजशास्त्र हे दोन्ही स्वरूपाचे म्हणजेच अनुभववादी आणि तार्किक स्वरूपाचे आहे. अस्तित्वात असणाऱ्या आणि अनुभवास आणि निरीक्षणास येणाऱ्या मूर्त आणि अमूर्त अश्या गोष्टींची समाजशास्त्रज्ञ तथ्ये गोळा करून त्यांची मांडणी करतात.
- 7. समाजशास्त्र हे एक सामान्य विज्ञान आहे. समाजशास्त्राचे स्वरूप संश्लेषणात्मक आणि सामान्यीकरण आहे. हे अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्रासारखे विशेष शास्त्र नाही. सामान्य नियम शोधण्याकडे लक्ष्य केंद्रित करतो. जे सर्वाना लागू होईल असे आहे.
समाजशास्त्राचा उदय १९ शतकात झाला आहे. समाजशास्त्र हा एक विषय आहे, जसे इतर विषय इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व मानववंशशास्त्र इत्यादी. या विषयामध्ये वेगवेगळे त्यांच्या विषयाशी संबधित घटकांचा अभ्यास केला जातो.
- समाजशास्त्राचा अभ्यासविषय 1) समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करते. 2)समाजशास्त्र हे सामाजिक मानवी जीवनाचा अभ्यास करते. 3) समाजशास्त्र हे सामाजिक संस्थांचा अभ्यास करते. 4) समाजशास्त्र हे सामाजिक संबंधांचा अभ्यास करते. 5) समाजशास्त्र हे समूहातील मानवी वर्तनाचा अभ्यास करते. 6) समाजशास्त्र हे सामाजिक क्रिया व अंतरक्रियांचा अभ्यास करते. 7) समाजशास्त्र हे सामाजिक समूह आणि सामाजिक व्यवस्था यांचा अभ्यास करते. 8) समाजशास्त्र हे समग्र समाजाचा अभ्यास करते.
- 1) समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करते. समाजशास्त्र हे समाजाच्या प्रकारांचे अभ्यास करते. प्रत्येक समाजात असणाऱ्या व्यवस्थांचा अभ्यास करते. उदा. पशुपालक समाज, शेती करणारा समाज, औद्योगिक समाज इत्यादी.
- 2)समाजशास्त्र हे सामाजिक मानवी जीवनाचा अभ्यास करते. मानवाचे सामाजिक जीवन हे समूहात व्यतीत होते. मानवाला संस्कृती असते. ही संस्कृती त्याला दिशा देण्याचे कार्य करते. मानवाने तयार केलेल्या दृश्य व अदृश्य अश्या सर्व गोष्टींचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. अश्या सर्व घटकांचा अभ्यास समाजशास्त्रात होतो.
- 3) समाजशास्त्र हे सामाजिक संस्थांचा अभ्यास करते. समाजाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी सामाजिक संस्थाची निर्मिती झालेलि असते. उदा. कुटुंब संस्था ( family ), विवाह संस्था (marriage) , राज्य संस्था (Polity), अर्थ संस्था ( Economy ), धर्म संस्था (Religion ), शिक्षण संस्था ( Education) कायदा (Law), प्रसारमाध्यमे( Media ) इत्यादी. अश्या सामाजिक संस्थांचा अभ्यास समाजशास्त्र करते. व्यक्ती व सामाजिक संस्था, समूहा आणि सामाजिक संस्था यांच्यातील सामाजिक संबंधाचा अभ्यास समाजशास्त्र करते.
- 4) समाजशास्त्र हे सामाजिक संबंधांचा अभ्यास करते. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. आपणास माहितीच आहे की सामाजिक संबंध हे व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समूह आणि समूह-समूहामध्ये आढळून येतो. त्याचबरोबर समाजाने निर्माण केलेल्या विविध घटकांसोबत व व्यवस्थांसोबत ही संबंध येतो. या सर्वांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो.
- 5)समाजशास्त्र हे समूहातील मानवी वर्तनाचा अभ्यास करते. व्यक्तीकडून किंवा समूहाकडून सातत्याने विशिष्ठ प्रकारचे वर्तन होत असते. हे वर्तन का होते त्यांच्या मुळाशी जाऊन समाजशास्त्र अभ्यास करते.
- 6) समाजशास्त्र हे सामाजिक क्रिया व अंतरक्रियांचा अभ्यास करते. व्यक्तीकडून होणाऱ्या विविध कृती आणि वर्तन होत असते. व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समूह आणि समूह-समूहामध्ये सातत्याने क्रिया व आंतरक्रिया घडत असतात. अश्या सामाजिक क्रिया व अंतरक्रियांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो.
- 7) समाजशास्त्र हे सामाजिक समूह आणि सामाजिक व्यवस्था यांचा अभ्यास करते. माणूस जन्मापासून मृत्यू हा समुहातच राहत असतो. माणूस हा समूहशील प्राणी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही समूह हे आकाराने लहान असतात जसे की कुटुंब, मैत्री, बाल सवंगड्यांचा गट इत्यादी यांना आपण प्राथमिक समूह म्हणतो. तर काही हे आकाराने मोठे असतात. जसे की शाळा, राजकीय पक्ष इत्यादी यांना आपण दुय्यम समूह असे म्हणतात. माणसाचे जीवन सुकर व्हावे, समाज गाडा व्यवस्थित चालवा यासाठी विविध सामाजिक व्यवस्था तयार केलेल्या केलेल्या असतात. कुटुंब, शाळा इत्यादी.
- 8) समाजशास्त्र हे समग्र समाजाचा अभ्यास करते. संपूर्ण समाज एक व्यवस्था मानून समाजाचे अभ्यास केला जातो. मानवी जीवन प्रभावित करणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो.