QUIZ on origin of Sociology | समाजशास्त्र उदयाचे घटक
QUIZ on origin of Sociology | समाजशास्त्र अर्थ, व्याख्या आणि उदयाचे घटक या पोस्टमध्ये आपणास समाजशास्त्र अर्थ, व्याख्या आणि उदयास कारणीभूत असलेले घटक, ज्ञानोदय चळवळ म्हणजे काय?, फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय? आणि औद्योगिक क्रांती म्हणजे काय इत्यादी संकल्पनाचे FAQ स्वरूपातील आपणास मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on origin of Sociology
समाजशास्त्र अर्थ, व्याख्या आणि उदयाचे घटक प्रश्ने व उत्तरे
समाजशास्त्राचा अर्थ & समाजशास्त्र शब्दाचा उगम
Sociology हा शब्द Socious+Logos या संकरीत दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ -(Study of human association ) थोडक्यात Sociology = Socious ( Latin )+ logos (Greek ). लॅटिन भाषेतील ‘ Socius ‘ म्हणजे सहचर ( Companion ) ग्रीक भाषेतील logos ‘ म्हणजे शास्त्र किंवा उच्च पातळीवरील अभ्यास.
- समाजशास्त्राची व्याख्या हॅरी जॉन्सन यांची समाजशास्त्र व्याख्या- “समाजशास्त्र हे सामाजिक समूहांसबंधीचे शास्त्र आहे.” (“Sociology is the science that deals with social groups”) हॉर्टन आणि हंट यांची समाजशास्त्राची व्याख्या “मानवी सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय . (“Sociology is the scientific study of human social life” )
- Sociology हा शब्द Socious+Logos या संकरीत दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ -(Study of human association ) थोडक्यात Sociology = Socious ( Latin )+ logos (Greek ). लॅटिन भाषेतील ‘ Socius ‘ म्हणजे सहचर ( Companion ) ग्रीक भाषेतील logos ‘ म्हणजे शास्त्र किंवा उच्च पातळीवरील अभ्यास.
- -व्युत्पतिशास्त्रदृष्ट्या ‘समाजशास्त्र’ या शब्दाचा अर्थ, मानवा मानवातील साहचर्याचा अमूर्त पातळीवरील अभ्यास करणारे शास्त्र. -ऑगस्ट कॉम्त (Auguste Comte) या समाजशास्त्रज्ञ यांनी सन १८३८ मध्ये पहिल्यांदा -‘समाजशास्त्र'(Sociology) हा शब्दप्रयोग त्यांच्या एका अ डिसकोर्स अन पॉझिटिव्ह फिलॉसॉफी (A Discourse on Positive Philosophy) या पुस्तकात केला म्हणून त्यांना समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) असे म्हणतात.
- समाजशास्त्राचा उदय एक विद्याशाखा म्हणून तसेच सामाजिक घडामोडींचा आणि घटकांचा वैज्ञानिक, चिकित्सकपणे अभ्यास करणारे विज्ञान किंवा शास्त्र म्हणून समाजशास्त्र १९ व्या शतकात युरोपमध्ये उदयास खालील घटकांचे योगदान
- 1) ज्ञानोदय चळवळ ( १७ शतक ते १८ वे शतक ),
- 2) फ्रेंच राज्यक्रांती ( १७८९)
- 3) औद्योगिक क्रांती ( १७४० ते १८६० )
- -ज्ञानोदय म्हणजे १७ शतक ते १८ वे शतक या काळांतील बौद्धिक, प्रबोधनात्मक चळवळ होय. -ज्ञानोदय याचा शब्दशः अर्थ म्हणजे पुनरुज्जीवन, नवनिर्माण होय. कशाचे पुनरुज्जीवन, नवनिर्माण तर बुरसटलेली विचारसरणीचे, पारंपारिक दृष्टिकोणाचे. -ज्ञानोदय हा वैश्विक दृष्टिकोन घडविणारा कालखंड होय. या काळात नव्या श्रद्धा, नवी मूल्ये यांच्या आधारे नव्या संस्था, व्यवस्था निर्माण झाल्या. -ज्ञानोदय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण विचारांचा संच होय. या विचारसंचात विवेक, मुक्ती, विज्ञान, सार्वत्रिकता, प्रगती, वैयक्तिकता, सहिष्णुता, स्वातंत्र्य, मानवी स्वरूपातील सारखेपणा धर्मनिरपेक्षता इ.चा अंतर्भाव होतो. -ज्ञानोदयकालीन काही विचारवंत रेने देकार्त, जॉन लॉक, न्यूटन, थॉमस मूर, हॉब्ज, इमॅन्युअल कान्ट, गटे, वॉल्टेअर, रुसो, मॉन्टेस्क्यू, स्पिनोझा, लिबनिझ, गॅलिलिओ, अंडम स्मिथ, -ज्ञानोदय चळवळ ही समाज आणि निसर्ग अथवा सृष्टी याविषयीचे पारंपरिक-धर्मनिष्ठ दृष्टिकोन बदलवणारी घटना आहे.
- -सन १७८९ मध्ये फ्रान्समधील जनतेने १६ व्या लुई या राजा विरुद्ध एक राजकीय उठाव केला.
- फ्रेंच राज्यक्रांतीची आर्थिक कारणे -फ्रान्सची जनता उपाशी असताना ऑस्ट्रियन राजकुमारी मेरी अँटोइनेट या राणीची पैशाची उधळपट्टी त्यामुळे फ्रान्सची तिजोरी रिकामी झालेली होती. -१६ लुई यांनी पैसे नसताना कर्ज काढून ही अमेरिकेला मदत केली. -१६ लुईकडून फ्रेंच जनता उपाशी मरत असताना करांमध्ये (Taxes) वाढ केली.
- फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यापाठीमागील सामाजिक कारणे -फ्रेंच जनता ही तीन वर्गात विभागली गेली होती 1) प्रथम वर्ग (First Estate) 2) द्वितीय वर्ग (Second Estate) 3) तृतीय वर्ग (Third Estate)
- पहिले दोन वर्गास विशेष अधिकार होते आणि खास सवलती होत्या तिसऱ्या वर्गाला या नव्हत्या त्यामुळे तिसरा वर्ग हा नाराज होता. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता.
- फ्रेंच लोकांना हवे होते की राजकीय सत्ता मध्ये सहभाग (राजकीय प्रतिनिधित्व ), सामाजिक समानता, अन्न, आदर समान कर पद्धत
- फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे तत्त्वज्ञ, विचारवंत, बंडखोर क्रांतिकारक यांचे क्रांतीप्रवण विचार व भूमिका महत्वाची राहिली. -सन १७८९ ते १८०२ या काळात फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे देणाऱ्यामध्ये थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, रुसो, व्हॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू यांसारखे अनेक विचारवंत सामील होते. या विचारवंतानी मांडलेले विचार, नवीन कल्पना या संबध युरोपवर चर्चा करीत होत्या. त्यातूनच लोकांना प्रेरणा मिळाली. आपल्यावर अन्याय होतंय याची जाणीव लोकांना झाली. ही जुलमी राज्य व्यवस्था बदलली पाहिजे असे लोकांना वाटले आणि त्याचा परिणाम हे उठावमध्ये झाले.
- -फ्रान्समध्ये सरंजामशाहीतील पारतंत्र्य, विषमता, जुलमी राजवट हे नवीन राज्यघटनेद्वारे नष्ट करून स्वातंत्र्य, समता व बंधुता वर आधारित लोकशाहीची स्थापना करून सरंजामशाहीला मूठमाती देण्यात आली आहे. समाजजीवनाच्या अनेक बाजूंवर या प्रभाव टाकला होता. याच फ्रेंच राज्यक्रांती म्हणून संबोधले जाते.
- -युरोप अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागून युरोपच्या उत्पादन पद्धतीत जी क्रांती घडून आली तीच औद्योगिक क्रांती या नावाने ओळखली जाते. -सर्वप्रथम या क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली व नंतर हळहळू ती संपूर्ण युरोपमध्ये जाऊन पहोचले. -शोधांची मालिका सुरु झाली. विविध शोध लागल्यामुळे उत्पादन, वितरण, वाहतूक आणि संपर्क यांना गती आली. -बाजारकेंद्री आणि नफ्याच्या हेतूने उत्पादन होऊ लागले. -जीवनाच्या सर्व अंगांवर म्हणजेच अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, समाजरचना, संस्कृती, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत औद्योगिक क्रांतीने मूलगामी क्रांतीकरी परिणाम घडविले.
- औद्योगिक क्रांतीची प्रामुख्याने तीन वैशिष्ट्ये सांगता येतील अ) हातानी उत्पादन करण्याऐवजी आता यंत्राने उत्पादन होऊ लागले. ब ) व्यवसायाचे ठिकाण घर न राहता कारखाना हे व्यवसायाचे ठिकाण बनले. क) भांडवल अथवा कारखानदारीच्या समाजात उदय झाला.
- औद्योगिक क्रांतीचे परिणाम अ ) औद्योगिक क्रांती मुळे समाजाची वाटचाल कृषिप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे ब ) औद्योगिक क्रांती मुळे मध्यमवर्गाचा उदय होऊ लागला क) औद्योगिक क्रांती मुळे शहरी जीवनाचा विस्तार व शहरीकरण प्रक्रीयेने वेग घेतला ड ) औद्योगिक क्रांती मुळे सामाजिक संस्थांमधील मूलभूत परिवर्तन इ ) नव्या सामाजिक समस्यांचा उदय