QUIZ on Age | वय
QUIZ on Age | वय या पोस्ट मध्ये वय म्हणजे काय?, वय हा स्तरीकरणाचा एक घटक कसे आहे? वय यांचे टप्पे आणि परिमाणे इत्यादीची माहिती FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे आपणास मिळतील.
आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on Age
वय या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
वय हा जीवनातील एक टप्पा दर्शवितो ( Age is shows one of the stages of life ). वयाशी निगडीत असमानतेची असणारी व्यवस्था, बहुतेक वेळा वयाच्या संचशी संबंधित असते.
उदाहरण- वृद्ध आणि तरुण दोघांनाही तुलनेने असक्षम मानले जाते आणि त्यांना सामाजिक जीवनातून वगळले जाते.
वय हा स्तरीकरणाचा एक घटक आहे. वेगवेगळ्या समाज हा जेष्ठांकडे असलेल्या स्टेटस व सत्ता हे भिन्न असते. लहान वयातील व्यक्तीकडे सत्ता फारशी दिली जात नाही. त्यामुळे वयामुळे समाजात असमानता आकारास येते.
जॉन ए. व्हिसेंट (2006) यांच्या म्हणण्यानुसार ” समाजातील वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांना वेगवेगळ्या भूमिका व जबाबदाऱ्यांचे वाटप केलेली असते. त्यामुळे काहीना वय हे अडथळे आणते, तर काही ना संधी निर्माण करून देते.
ज्यांना वय हे अडथळे आणते आणि संधी प्राप्त करून देतो, तेव्हा प्रत्येक समाजातील वेगवेगळ्या वयोगटांनी लोकांना प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती आणि उत्पन्न हे विषम प्रमाणत प्राप्त होतात. परिणामी वयाच्या आधारावर समाजाचे स्तरीकरण होते.
वय यांचे टप्पे किंवा जीवनाच्या चार अवस्था
- बाल्यावस्था
- प्रौढ अवस्था.
- निवृत्ती काळ
- समाधी काळ / अन्न त्याग / मृत्यू
वय यांचे टप्पे किंवा जीवनाच्या चार अवस्था
- बाल्यावस्था
- प्रौढ अवस्था.
- निवृत्ती काळ
- समाधी काळ / अन्न त्याग / मृत्यू
- 1) बाल्यावस्था जीवनाच्या या अवस्थेत व्यक्ती हा पूर्णतः एक विशिष्ठ वयापर्यत तो त्यांच्या आई- वडील किंवा पालकांवर अवलंबून राहतो. एखादी जबाबदारी पेलण्याची परिपक्वता त्यामध्ये आलेली नसते. हा का त्यांच्या जडणघडणीचा असतो.
- 2) प्रौढ अवस्था. या अवस्थेमध्ये व्यक्तीला एक शारीरिक व मानसिक परिपक्वता आलेली असते. व्यक्ती कमावती असते म्हणून ती कोणावर अवलंबून नसते. & या जीवनाच्या अवस्थेत व्यक्ती अनेक जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम असते. घेतलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण वचनबद्ध्तेने पूर्ण करते.
- 3) निवृत्ती काळ या काळात व्यक्ती सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त असते.
- 4) समाधी काळ / अन्न त्याग / मृत्यू
- देह त्याग करण्याची प्रक्रिया
- पहिले परिमाण -वयाला जैविक किंवा शारीरिक मिती/ परिमाण असते, त्यामुळे कालांतराने आपल्या शरीराचे स्वरूप आणि शारीरिक क्षमता नाटकीयरित्या बदलतात.
- दुसरे परिमाण, एक माणूस म्हणून समाजात राहता असताना विशिष्ट वयोगटातील व्यक्तींनी कसे वागावे व राहावे याला घेऊन समाजाच्या काही अपेक्षा असतात. वृद्धत्व ही जैविक प्रक्रिया आहे. वृद्धत्वाची सामाजिक व्याख्या वेगवेगळ्या समाजात वेगवेगळी असते. वृद्धापकाळ प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने व प्रकारे अनुभवतात .
- तिसरे परिमाण-वृद्धत्व नेहमी एका विशिष्ट ऐतिहासिक कालावधीत घडते. त्याच ऐतिहासिक कालखंडात जन्माला आलेला समूह म्हणून ओळखला जातो.