QUIZ on class system | वर्ग
वर्ग | QUIZ on class system या पोस्ट मध्ये आपणास वर्ग किंवा वर्गव्यवस्था, म्हणजे काय, सामाजिक वर्ग किंवा वर्गाची व्याख्या, कार्ल मार्क्सची वर्गाची संकल्पना, त्यांनी केलेली वर्गाची व्याख्या व सांगितलेले वर्गाचे दोन प्रमुख प्रकार ,मॅक्स वेबरची वर्ग संकल्पना, व्याख्या, त्यांनी सांगितलेले भाडवलशाही समाजाततील चार प्रमुख वर्ग किंवा क्लास तसेच आर्थिक दर्जावरून सांगितलेले वर्गाचे प्रकार इत्यादीची माहिती आपणास FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे यातून मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. QUIZ on class system
वर्ग संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
एकच आर्थिक स्तर असणाऱ्या लोकांचा वर्ग तयार होतो. वर्गव्यवस्थेत व्यक्तीचे स्थान हे त्यांच्या जन्मावरून किंवा जातीवरून ठरत नाही. तर व्यक्ती आपल्या स्वप्रयत्नाने, कष्टाने उच्च स्थान किंवा दर्जा प्राप्त करून घेऊन मूळ वगपिक्षा वरच्या वर्गात प्रवेश करू शकते. म्हणूनच वर्गव्यवस्था ही सापेक्षतः खुली स्तरीकरण व्यवस्था ठरते . येथे गतिशीलतेला वाव आहे. वर्गातील व्यक्तीचे स्थान हे अर्जित दर्जेवर अवलंबून असते.
प्रामुख्याने संपत्ती , सत्ता , प्रतिष्ठा यांच्या समाजातील विषम वितरणामुळे श्रेष्ठ -कनिष्ठ दर्जाचे आर्थिक-सामाजीक वर्ग निर्माण झालेले आहेत.
टीशलेर, व्हायटन आणि हंटर यांच्या मते , “समान संधी, समान आर्थिक आणि व्यावसायिक दर्जा, समान अभिवृत्ती आणि वर्तन प्रकार तसेच समान जीवनपद्धती असणाऱ्या लोकांचा प्रवर्ग म्हणजे सामाजिक वर्ग होय.
एलि चिनाय – आर्थिक व्यवस्थेत समान स्थान असणाऱ्या व्यक्ती म्हणजे वर्ग बनतो.
मार्क्सप्रणित दृष्टिकोणातून वर्ग म्हणजे असा सामाजिक समूह की, ज्यातील सदस्यांचे उत्पादनाच्या साधनांशी किंवा शक्तींशी सारखेच संबंध असतात.
मार्क्सच्या मते समाजात दोनच प्रमुख वर्ग आहेत.
1. पहिला वर्ग – बूर्ज्वा ( Bourgeoisie ) म्हणजेच भांडवलदार ( Capitalists ),
2. दुसरा वर्ग – प्रॉलेटरियट ( Proletariat ) म्हणजे कामगार किंवा श्रमिकांचा ( Workers or tolling masses )
पहिला वर्ग हा – उत्पादनाच्या साधनांचा मालक असतो. जरी कामगारांच्या श्रमाने उत्पादन होत असले तरी,
दुसरा वर्गाची – उत्पादित वस्तूंवर किंवा उत्पादनाच्या साधनांवर मात्र कामगारांची मालकी नसते .
त्यामुळे पहिला वर्ग ‘अहिरेंचा ’ ( Haves ) तर
दुसरा ‘ नाहीरेंचा ( Have nots ). असतो
मॅक्स वेबर यांनीही आर्थिक घटक महत्त्वाचा मानून वर्गाची व्याख्या केली.
“वर्ग म्हणजे व्यक्तींचा असा समूह की , जे बाजारी अर्थव्यवस्थेत समान स्थानावर असतात आणि त्यामुळे त्यांना समान आर्थिक पारितोषिके प्राप्त होतात.” (Class is group of individuals who share a similar position in market economy and by virtue of that fact receive similar economic rewards.)
भाडवलशाही समाजात चार प्रमुख क्लास असतात असे वेबरने म्हटले आहे
1) मालमत्ताधारी उच्चवर्ग ( The Propertied Upper Class ) ,
2) मालमत्ता नसणारा पाढरपेशी कामगाराचा क्लास ( The property less white collar workers ) ,
3) छोटे भांडवलदार ( The petty bourgeoisie ) आणि
4) शारीरिक कष्ट करून जगणारा कामगार वर्ग ( The Manual working class)
वेबरच्या मते – समान आर्थिक दर्जा असणाऱ्या लोकांचा एक क्लास class बनतो.
ढोबळ मानाने – असे आर्थिक दर्जावरून तीन प्रमुख वर्ग आहेत आणि या तीन स्तरांतही उपस्तर असतात. असे वेबरचे मत आहेत.
वर्गाचे 3 प्रमुख स्तर व 6 उपस्तर पाहण्यासाठी या लिंक वर जावे.
1) उच्चवर्ग
1) उच्च – उच्चवर्ग
2) उच्च कनिष्ठवर्ग
२) मध्यमवर्ग
1) उच्च मध्यमवर्ग
2) कनिष्ठ मध्यम वर्ग
3) कनिष्ठ वर्ग
1) उच्च कनिष्ठवर्ग
2) कनिष्ठ कनिष्ठवर्ग
वर्गाची वैशिष्ठ्ये:-
1 ) वर्गव्यवस्थेत जन्माचा आधार नाही.
2 )वर्गव्यवस्थेत जातीव्यवस्थेप्रमाणे सामाजिक व्यवहारावर निर्बंध नसतात.
3) वर्गव्यवस्थेत व्यवसाय निवडीचे स्वतंत्र असते.
4) वर्गव्यवस्थेत विवाहाचे जोडीदार निवडण्यावर निर्बंध नसतात.
5) वर्गव्यवस्थेत समान संधी आणि अधिकार असते
6 )वर्गव्यवस्थेत अर्जित दर्जा महत्वचा असतो.
7) वर्गव्यवस्थेत व्यक्तीच्या कला, गुणांना वाव असतो. कौशल्याच्या आधारावर व्यक्तीला न्याय दिला जातो.
वर्ग व्यवस्थेमध्ये गतीशिलातेला वाव असतो. वर्ग हे खुले स्तरीकरण आहे. एकाच प्रकारची आर्थिक स्थिती असणाऱ्यांना लोकांचा वर्ग बनतो. अश्या वर्गातील लोकांचा अर्थव्यवस्थेतील त्यांचे स्थान हे समान असते. जाती व्यवस्थेत व्यक्तीला मिळालेला सामाजिक दर्जा बदलता येत नसते. मात्र वर्ग व्यवस्थेत व्यक्ती स्वकष्टाने शिक्षण, कौशल्य विविध क्षमता, पात्रता आत्मसात करून समाजातील उच्च दर्जा हशील करू शकते. त्यामुळे आज SC, ST वVJNT संवर्गातील व्यक्ती IAS व IPS झालेली आपणास दिसून येते.
वर्गाची व्याख्या
एलि चिनाय – आर्थिक व्यवस्थेत समान स्थान असणाऱ्या व्यक्ती म्हणजे वर्ग बनतो.
वर्गाची वैशिष्ठ्ये | Characteristics of class system
- वर्गव्यवस्थेत जन्माचा आधार नाही.
- वर्गव्यवस्थेत जातीव्यवस्थेप्रमाणे सामाजिक व्यवहारावर निर्बंध नसतात.
- वर्गव्यवस्थेत व्यवसाय निवडीचे स्वतंत्र असते.
- वर्गव्यवस्थेत विवाहाचे जोडीदार निवडण्यावर निर्बंध नसतात.
- वर्गव्यवस्थेत समान संधी आणि अधिकार असते
- वर्गव्यवस्थेत अर्जित दर्जा महत्वचा असतो.
- वर्गव्यवस्थेत व्यक्तीच्या कला, गुणांना वाव असतो. कौशल्याच्या आधारावर व्यक्तीला न्याय दिला जातो.