QUIZ on Caste system in Marathi | जाती
जाती किंवा जातीव्यवस्था | QUIZ on Caste system या पोस्ट मध्ये आपण जातीव्यवस्था या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे जसे की, जाती जाती म्हणजे काय?, जातीच्या व्याख्या, जातीची वैशिष्ठ्ये इत्यादी आपणास FAQ स्वरुपात मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. FAQ QUIZ on Caste system
जाती किंवा जातीव्यवस्था या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
जाती किंवा जातिव्यवस्था हे भारतीय समाजाचे एक खास वैशिष्ट्य मानले जाते. हजारो वर्षापासून असलेली ही व्यवस्था आपल्या समाजात अस्तित्वात आहे. जातीच्या आधारावर भारतीय समाजात अनेक श्रेष्ठ -कनिष्ठ स्तर निर्माण झाले आहेत. जातीचे सदस्यत्व व्यक्तीला जन्माने प्राप्त होते आणि ते मरेपर्यंत व्यक्तीला आपली जात बदलता येत नाही. व्यक्ती जरी जात मानत नसला तरी समाज त्याला त्यांच्या जातीच्या स्थानावरून ओळख देतो.
मुजुमदार आणि मदन यांनी केलेली जातीची व्याख्या “जाती म्हणजे एक बंद वर्ग होय” (Caste is a closed class ). जाति-व्यवस्था हा बंद स्तरीकरणाचा प्रकार आहे.
- मुजुमदार आणि मदन यांनी केलेली जातीची व्याख्या “जाती म्हणजे एक बंद वर्ग होय” (Caste is a closed class )
- डॉ . इरावती कर्वे यांनी केलेली जाती ची व्याख्या “जाती म्हणजे एक विस्तारित कुटुंब होय” (Caste is an extended family
- ड्रेसलर आणि विलीस यांनी केलेली जाती ची व्याख्या “जन्माच्या वेळी प्राप्त झालेल्या दर्जापेक्षा उच्च सामाजिक दर्जा वा स्थान मिळविण्यास प्रतिबंध करणारी दर्जा संबंधांची व्यवस्था म्हणजे जाति व्यवस्था होय.”
मुजुमदार आणि मदन यांनी केलेली जातीची व्याख्या “जाती म्हणजे एक बंद वर्ग होय”
सुप्रसिद्ध संशोधक डॉ. गो. स. घुर्ये यांनी जाति व्यवस्थेचे संशोधन केलेले आहे. त्यांच्या मतानुसार की जात ही इतकी गुंतागुंतीची बाब आहे की, तिची सुस्पष्ट व्याख्या करणे कठीण आहे. म्हणूनच त्यांनी जात -व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये त्यांनी त्यांच्या ‘Caste, Class and Occupation’ या पुस्तकात सांगितले आहेत. त्यांनी हे स्पष्ट केले की जात ही स्तरीकरणाचा एक बंद प्रकार आहे.
- समाजाचे खंडात्मक विभाजन होते.
- जातीव्यवस्था असणाऱ्या समाजाची श्रेणीबद्ध रचना असते.
- जाती व्यवस्थेत सामाजिक संबंधावर नियंत्रण असते. सामाजिक वर्तनावर काही बंधने असतात.
- जाती व्यवस्थेत धार्मिक बंधने असतात.
- जाती व्यवस्थेत व्यवसाय निवडीवर मर्यादा असते. मनाला वाटेल ते व्यवसाय हे व्यक्ती करू शकत नव्हती.
- जातीव्यवस्थेत जातीच्या जातीच विवाह केला जातो म्हणून जाती या आतंरविवाही गट म्हणून ओळखले जाते.