सामाजिक स्तरीकरण | QUIZ on social stratification.
सामाजिक स्तरीकरण | QUIZ on social stratification. या पोस्ट मध्ये सामाजिक स्तरीकारण म्हणजे काय? सामाजिक स्तरीकारण व्याख्या, सामाजिक स्तरीकारणाची वैशिष्ठ्ये, मुख्य प्रकार- बंद स्तरीकरण व मुक्त किंवा खुला स्तरीकरण सामाजिक स्तरीकारणाची उदाहरणे. तसेच अर्जित व अर्पित दर्जा इत्यादी संकल्पनावरील FAQ स्वरूपातील प्रश्ने व उत्तरे आपणास उपलब्ध होतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. FAQ QUIZ on social stratification.
सामाजिक स्तरीकरण संकल्पनेवरील सर्व लघु व दिर्घौत्तरी प्रश्ने व उत्तरे
समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे विषम पद्धतीने वितरण झालेले असते. या विषम वाटपामुळे समाजाचे भिन्नभिन्न दर्जा व वर्गांमध्ये स्तरीकरण होते. समाजातील विविध स्तरांची दर्जाच्या आधारे झालेली अशी उतरंडी सारखी रचना म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.
समाजाची विभागणी ही अनेक स्तरात झालेली असते. हे स्तर दर्जेच्या आधारावर ठरतात.
उदा.
आर्थिक दर्जावरून समाजाचे तीन प्रमुख स्तर पडतात.
- उच्च वर्ग ( Upper class ),
- मध्यम वर्ग (middle class) &
- कनिष्ठ वर्ग ( lower class ).
एली चिनॉय -“श्रेष्ठ आणि कनिष्ठ , श्रीमंत आणि गरीब , सत्ताधारी आणि सत्ताविहीन यांच्यातील तफावत किंवा भेद हा सामाजिक स्तरीकरणाचा गाभा होय”.
सोरोकिन- ” एखाद्या समाजाचे एकावर एक रचलेल्या वर्गामध्ये झालेले श्रेणीतील विभेदन म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.
( कोणतेही एक व्याख्या द्यावे. )
स्तरीकरण (Stratification) हा इंग्रजी शब्द Stratum या मूळ शब्दापासून बनला आहे. ‘Stratum’ हा ग्रीक शब्द आहे , त्याचा अर्थ layer म्हणजे ‘ थर ‘ किंवा ‘स्तर’ होय. ‘Strata’ म्हणजे अनेक स्तर, आता या स्तरांची जी रचना तयार होते तिचा निर्देश करणारा इंग्रजीतील stratification हा शब्द वापरतात. ‘stratification’ म्हणजे नुसते अनेक सामाजिक स्तर नव्हेत तर त्या स्तरांची श्रेणीबद्ध अशी रचना किंवा व्यवस्था असते.
- सामाजिक स्तरीकरणामध्ये समाजाची उतरंडी सारखी रचना/व्यवस्था असते.
- श्रेष्ठ – कनिष्ठ या तत्वावर ही रचना तयार झालेली असते.
- सामाजिक स्तरीकरणाचा विषमता ( inequality ) हा प्रमुख आधार असतो.
- विविध सामाजिक स्थाने आणि भूमिका याप्रमाणे दर्जा व पारितोषिकाचे ( असमान ) वितरण होते.
- दर्जा व पारितोषिकांचा असमान वितरणामुळे विभिन्न दर्जाचे अनेक स्तर समाजात अस्तित्वात येतात.
- एकावर एक रचल्या गेलेल्या विभिन्न स्तराची जी रचना तयार होते तिलाच सामाजिक स्तरीकरण असे म्हणतात.
- विषमतेवर आधारित अशी ही स्तरीकरणाची व्यवस्था त्या त्या समाजाच्या संरचनेचा एक भाग बनते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जाते.
- समाजातील प्रमुख सामाजिक संस्थांद्वारे स्तरीकरण व्यवस्थेचे सातत्य टिकवून ठेवले जाते.
सामाजिक स्तरीकरणाचे मुख्य दोन प्रकार पडतात.
1. बंद स्तरीकरण (Closed Stratification ) आणि
2. खुले स्तरीकरण ( Open stratification ).
बंद स्तरीकरण हे स्तरीकरणाचा पहिला प्रकार किंवा रूप आहे. ज्या स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलता येण्याची शक्यता नसते त्याला बंद स्तरीकरण असे म्हणतो.
या स्तरीकारणात सामाजिक गतिशीलतेचा जवळ जवळ पूर्ण अभाव असतो. या स्तरीकरणामुळे व्यक्तीला आपल्या पालकांमुळे मिळालेल्या सामाजिक दर्जा किंवा स्थानावरच आयुष्यभर राहावे लागते.
ज्या स्तरीकरणात जन्मानेच व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरतो व त्यात बदल करता येत नाही, असे स्तरीकरण बंद स्तरीकरण होय . उदा . भारतातील जातिव्यवस्था ( Caste system ).
जातिव्यवस्था ( Caste system ) हे बंद स्तरीकरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
बंद स्तरीकरण हे व्यक्तीच्या अर्पित दर्जावर त्या अवलंबून असतात.
समाजातील व्यक्तीला काही गोष्टी या जन्माने मिळतात तर, काही गोष्टी या त्याला प्रयत्नपूर्वक कष्टाने मिळवाव्या लागतात. म्हणजेच ज्या गोष्टी जन्माने प्राप्त होतात त्याला अर्पित दर्जा आपण म्हणतो.
बंद स्तरीकरणामध्ये व्यक्तीला आपल्या स्वप्रयत्नाने स्वतःचा जन्मजात दर्जा बदलण्याची सोय नसते. व्यक्तीला कितीही वाटलं तरी तो त्यांची जात सोडू शकत नाही. जाती सोबत वंश हा देखील बंद स्तरीकरणाचा उदाहरण आपल्याला सांगता येईल.
खुले स्तरीकरण हे स्तरीकरणाचा दुसरा प्रकार किंवा रूप म्हणता येईल. ज्या स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची अनुमती, संधी आणि सोय असते त्याला खुले स्तरीकरण असे म्हणतात.
या स्तरीकारणात सामाजिक गतिशीलतेस वाव असतो. व्यक्ती स्वत:च्या पात्रता, कौशल्ये यांच्या आधारे सामाजिक दर्जात बदल घडवून आणण्याची मोकळीक असते.
वर्गव्यवस्था ( Class system ) हे खुले स्तरीकरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
खुले किंवा मुक्त स्तरीकरण हे व्यक्तीच्या अर्जित दर्जावर अवलंबून असते.
अर्जित दर्जामध्ये व्यक्तीला जन्मजात कोणत्याही ती मिळत नाही. तर त्या त्याला जाणीवपूर्वक कष्ट करून प्रयत्नपूर्वक करून मिळेल ज्या गोष्टी मिळवाव्या लागतात.
खुले किंवा मुक्त स्तरीकरण हे प्रामुख्याने अर्जित दर्जावर अवलंबून असल्याकारणाने व्यक्तीला त्याचा सामाजिक स्तर बदलण्याची सोय असते. या प्रकारच्या स्तरीकारणात व्यक्ती जाणीवपूर्वक, स्वप्रयत्नाने, कष्टाने, स्वतःच्या गुणवत्तेच्या ,कौशल्याच्या आणि पात्रतेच्या आधारावर समाजातील उच्च स्थान मिळवू शकतो.
समाजात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे विषम पद्धतीने वितरण झालेले असते. या विषम वाटपामुळे समाजाचे भिन्नभिन्न दर्जा व वर्गांमध्ये स्तरीकरण होते. समाजातील विविध स्तरांची दर्जाच्या आधारे झालेली अशी उतरंडी सारखी रचना म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय.
समाजाची विभागणी ही अनेक स्तरात झालेली असते. हे स्तर दर्जेच्या आधारावर ठरतात.
उदा.
आर्थिक दर्जावरून समाजाचे तीन प्रमुख स्तर पडतात.
- उच्च वर्ग ( Upper class ),
- मध्यम वर्ग (middle class) &
- कनिष्ठ वर्ग ( lower class ).
सामाजिक स्तरीकारणाची वैशिष्ठ्ये
- सामजिक स्तरीकरण हे सर्वत्र आढळून येते.
- सामजिक स्तरीकरण अस्तित्वात येण्यासाठी सामाजिक घटकांचा आधार असतो.
- सामाजिक स्तरीकरण मध्ये समाजाची श्रेणीबद्ध रचना असते.
- सामाजिक स्तरीकरण हे प्रक्रियेद्वारे व्यवस्थेत हळूहळू काळाप्रमाणे बदल होत जाऊन अस्तित्वात येते.
- सामाजिक स्तरीकरण हे श्रेष्ठ आणि कनिष्ठ या तत्त्वावर आधारलेले असते.