झेनोफोबिया बहुसंस्कृतिवाद आणि संकरीकरण | QUIZ on Xenophobia in Marathi
या पोस्ट मध्ये झेनोफोबिया म्हणजे काय त्यांची उदाहणे, बहुसंस्कृतिवाद म्हणजे काय? बहुसंस्कृतिवाद दृष्टीकोन म्हणजे काय? आणि संकरीकरण म्हणजे काय? इत्यादी थोडक्यात आपण झेनोफोबिया बहुसंस्कृतिवाद आणि संकरीकरण या संकल्पनावर आधारित FAQ स्वरुपातील प्रश्ने व उत्तरे आपणास मिळतील.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. FAQ QUIZ on Xenophobia in Marathi
झेनोफोबिया, बहुसंस्कृतिवाद आणि संकरीकरण या संकल्पनेवरील प्रश्ने व उत्तरे
झेनोफोबिया शब्दाची उत्पत्ती अर्थ- झेनोफोबिया ( Xenophobia ) या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील ‘Xenos’ म्हणजे परकीय /अनोळखी या शब्दापासून झालेली दिसते.
Xenos – meaning “strangeness” or “foreignness” परकीय किंवा अनोळखी,
‘Phobia’ ( फोबिया ) या शब्दाचा अर्थ ‘ भीती ‘ असा होतो .
झेनोफोबिया‘चा शब्दशःअर्थ परकीयांबद्दल असणारा भीतियुक्त दृष्टिकोन
‘झेनोफोबिया’ ही एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला ‘ परकीय ‘ किंवा ‘ इतर ‘ म्हणून संबोधले गेल्यानंतर निर्माण होणारी भीती अथवा पूर्वग्रह दर्शविणारी संज्ञा आहे.
परकीय विद्वेषाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –
- Immigrant (परदेशातून कायमचे राहण्यासाठी आलेले ),
- Refugee (निर्वासित),
- Asylum seeker (आश्रय साधक),
- Orphan (अनाथ)
बहुसंस्कृतिवाद हा एक दृष्टिकोन आहे. दृष्टिकोनाप्रमाणे विविध सांस्कृतिक भिन्नता असलेले समूह, विविध वंशाचे व वांशिकता असलेले आणि अल्पसंख्याक समूह एकत्र राहण्यास प्रोत्साहन देण्यात येते.
बहुसंस्कृतिवादमध्ये प्रस्थापित राजकीय संस्कृतीमध्ये अश्या विभिन्न सांस्कृतिक समूहांची विशेष दखल ( Acknowledgment ) मिळणे अपेक्षित आहे , जेणेकरून संबंधित समूहांना अधिक सुरक्षित व शांततेत जीवन जगण्यास मदत होईल.
विकसित व विकसनशील देशांमध्ये अलीकडील काळात बहुसंस्कृतिकवादास ( Multiculturalism ) प्राधान्यक्रम दिला जातो. जेणेकरून तेथील विविध धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक समूहांना स्थिरावण्यास मदत होऊ शकते.
बहुसंस्कृतिवाद हा दृष्टिकोन सांस्कृतिक भिन्नतेचा आदर करून तिला प्रोत्साहित करतो.
हा दृष्टिकोन सांस्कृतिक भिन्नतेचा आदर करतो. अशी संस्कृती राहावी, फुलावी आणि प्रसरावी यासाठी तिला प्रोत्साहित करतो. एखाद्या समाजातील सांस्कृतिक विविधता जवळून अभ्यासण्याचा एक दृष्टिकान म्हणून समाजशास्त्रज्ञ बहुसंस्कृतिवादाकडे ‘ पाहतात.
विकसित व विकसनशील देशांमध्ये अलीकडील काळात बहुसंस्कृतिकवादास ( Multiculturalism ) प्राधान्यक्रम दिला जातो. जेणेकरून तेथील विविध धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक समूहांना स्थिरावण्यास मदत होऊ शकते. भरपाई करण्याचा मार्ग म्हणून बहुसंस्कृतिवादकडे पहिले जाते.
भारतामध्ये जातीव्यवस्था होती. हजारो वर्ष अस्पृश यांना त्यांच्या सामाजिक जीवनात भेदभाव सहन करावा लागला. त्यांची नुकसानभरपाई त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी शिक्षण, राजकारण आणि नोकरी मध्ये आरक्षण ठेवण्यात आले.
तसेच धर्माच्या व वंशांचा आधारवर ज्यांना विविध देण्यात भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागला अश्या समूहांना सुरक्षित व शांततेत जीवन जगण्यास मदत करण्यासाठी अनेक विकसित राष्ट्रांनी त्यांना नागरिकत्व देऊन त्यांना आश्रय देण्यात आले आहे. अशा भूतपूर्व बहिष्कार, भेदभाव आणि अत्याचार याला सामोरे गेलेल्या सांस्कृतिक समूहांना भरपाई करण्याचा मार्ग आहे असे बहुसंस्कृतिवाद मानले जाते.
संकरीकरणमध्ये भिन्न संस्कृती एकत्र येऊन त्या दोघांच्या मिश्रणातून एक नवीन संस्कृती उदयास येते..
संकरीकरण या प्रक्रियेत बाह्याप्रवाहाचा संपर्क अंतर्गत प्रवाहाशी होऊन एकमेव एक अशी नवीन संमिश्र संस्कृती निर्माण होते, की जे दोन घटकांच्या एकत्रित करण्यातून बनते.
जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या धोरणामुळे देशोदेशातील अनेक लोक हे रोजगार, शिक्षण आणि व्यवसाय स्थलांतर करतात.त्यामुळे संस्कृतीच्या संकरीकरण घडून येते.
संकरीकरणमध्ये भिन्न संस्कृती एकत्र येऊन त्या दोघांच्या मिश्रणातून एक नवीन संस्कृती उदयास येते.
संकरीकरण या प्रक्रियेत बाह्याप्रवाहाचा संपर्क अंतर्गत प्रवाहाशी होऊन एकमेव एक अशी नवीन संमिश्र संस्कृती निर्माण होते, की जे दोन घटकांच्या एकत्रित करण्यातून बनते.
मानवी विकासाच्या विविध टप्प्यांवर आपल्याला एका सामाजिक समूहाने दुसऱ्या सामाजिक समूहाच्या भाषेचा, त्यांच्या संस्कृतीचा अवलंब केलेला दिसतो. दोन वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक समूह एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक देवाण-घेवाणीतून नवीन संस्कृती उदयास येताना दिसते. तेव्हा त्या प्रक्रियेला आपण सांस्कृतिक संकरीकरण असे म्हणू शकतो