स्वसमूहश्रेष्ठतावाद | QUIZ on Ethnocentrism in Marathi
या पोस्ट मध्ये आपणास स्वसमूहश्रेष्ठतावाद म्हणजे काय? त्यांच्या विविध व्याख्या मिळतील. ही संकल्पना कोणी मांडली हे समजेल. कोणत्या पुस्तकात मांडली हेही आपणास समजेल.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. FAQ QUIZ on Ethnocentrism
स्वसमूहश्रेष्ठतावाद वरील सर्व प्रश्ने व उत्तरे
स्वसमूहकेंद्रितता (Ethnocentrism ) ही संज्ञा विल्यम जी. सम्नेर यानी त्यांच्या ‘Folkways’ (1906) या ग्रंथात सर्वप्रथम मांडली. आगदी साध्या शब्दात, आपल्या समूहाता व आपल्या संस्कृतीला केंद्रस्थानी मानून, आपला समूह वा संस्कृती हीच श्रेष्ठ आहे आणि इतर या संस्कृत्या कनिष्ठ आहेत असे मानण्याची प्रवृत्ती म्हणजे स्वसमूहकेंद्रितता होय. आपला समाज, आपली संस्कृती हीच इतर सर्व समाजांत व संस्कृतीत श्रेष्ठ आहे असे मानण्याची प्रवृत्ती म्हणजे स्वसमूहकेंद्रितता होय.
विल्यम सम्नेर यांनी केलेली स्वसमूहकेंद्रिततेची व्याख्या “स्वत : च्या समूहाला सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी मानून इतर सर्व गोष्टींचे मोजमाप करण्याचा व इतरांचा दर्जा आपल्या समूहाच्या संदर्भात निश्चित करण्याचा दृष्टिकोन म्हणजे स्वसमूहकेंद्रितता होय”.
लाइंट आणि केलर यांनी केलेली स्वसमूहकेंद्रिततेची व्याख्या
“आपली जीवनरीत – वर्तनप्रकार , श्रद्धा , मूल्ये , नियमने – हीच जीवन जगण्याची खरी योग्य रीत आहे असे मानण्याची प्रवृत्ती म्हणजे स्वसमूहकेंद्रितता होय.”
विल्यम पी. स्कॉट यांनी केलेली स्वसमूहकेंद्रिततेची व्याख्या- "आपलीच संस्कृती वा समूह मूलत : च श्रेष्ठ आहे अशी त्याविषयीची अभिवृत्ती म्हणजे स्वसमूहकेंद्रितता होय"
स्वसमूहकेंद्रितता ही एक प्रवृत्ती आहे.
आपली संस्कृतीला इतर सर्व समूहांच्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी मानून स्वत:ची संस्कृती ही श्रेष्ठ आहे असे समजले जाते.
आपल्या समूहाच्या संदर्भात इतरांचा दर्जा निश्चित केला जातो .
मूल्यमापनाचा आधार स्वत:ची संस्कृती केंद्र स्थानी ठेवली जाते.
आपला समूह किंवा संस्कृती मूलत:च श्रेष्ठ आहे असे मानले जाते, तर इतर समूहांना वा संस्कृतींना कनिष्ठ लेखले जाते
स्वसमूहश्रेष्ठतावादी दृष्टिकोण म्हणजे काय?
आपल्या समाजाच्या चालीरीती आदर्श आहेत, आपला वंश श्रेष्ठ आहे, आपल्या समाजातील कला, संगीत, नियमने, मूल्ये, श्रद्धा, वर्तनप्रकार या सर्व गोष्टी श्रेष्ठ आहेत, आपलाच धर्म हा खरा धर्म आहे, तर इतरांच्या कला, संगीत, नियमने, मूल्ये, वंश, धर्म इ . गोष्टी आपल्या समूहाच्या तुलनेत किती केले तरी कनिष्ठ प्रतीच्याच आहेत, असा दृष्टिकोण हाच स्वसमूहश्रेष्ठतावादी दृष्टिकोण होय.
जगातील सर्वच समाज स्वसमूहश्रेष्ठतावादी असतात. आपण ज्यांना मागासलेले समजतो ते अगदी साधे आदिवासी समाज देखील स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असतात. आता, प्रत्येक समाजामध्ये ज्याप्रमाणे स्वसमूहश्रेष्ठतावादी प्रवृत्ती दिसते. त्याचप्रमाणे समाजांतर्गत असलेल्या विविध उपसमूहांतही स्वसमूहकेंद्रिततेची वृत्ती आढळते.
उदा. आपले कुटुंब, आपली शाळा, महाविद्यालय, आपला राजकीय पक्ष, आपली जात हीच प्रत्येकजण सर्वश्रेष्ठ मानीत असतो.
अर्थात सर्वच समाजांत सारख्याच तीव्र प्रमाणात स्वसमूहकेंद्रितता आढळते असे नव्हे. पण, सर्व समाजांत, त्यातील सर्व समूहांत आणि बहुतांशी व्यक्तींमध्ये स्वसमूहकेंद्रिततेची अभिवृत्ती कमी-अधिक प्रमाणात आढळतेच,