संस्कृती म्हणजे काय | QUIZ on Culture in Marathi
या पोस्ट मध्ये आपणास आपण संस्कृती म्हणजे काय ?, संस्कृतीची व्याख्या, वैशिष्ठ्ये, घटक तसेच संस्कृतीचे प्रकार यावरील FAQ फॉर्म मधील प्रश्ने व उत्तरे आपण सोडवू शकाल.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर पुढील लिंकवर जाऊन क्लिक करा प्रश्ने व उत्तरे मिळवा. FAQ QUIZ on Culture
संस्कृती या वरील सर्व लघु आणि दीर्घउत्तरी प्रश्ने आणि उत्तरे
संस्कृती ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे. संस्कृतीमध्ये आपल्या सर्व जीवनपद्धतीचा समावेश होतो. उदा. वागण्याच्या पद्धती, आपले तत्वज्ञान आणि नैतिकता, आचार आणि विचार, चालीरीती आणि परंपरा, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि इतर प्रकारचे सामाजिक जीवन इत्यादी. मनुष्याने तयार केलेल्या दृश आणि अदृश्य अशा सर्व गोष्टींचा समावेशक संस्कृती होतो. संस्कृती ही मानवनिर्मित आहे म्हणून संस्कृती ही सामाजिक आहे. व्यक्तीला संस्कृती ही शिकून घ्यावी लागते. एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचे वहन किंवा संक्रमण होते.
संस्कृतीची व्याख्या | Definition of culture
सर एडवर्ड बी. टायलर – संस्कृती ही अशी संकीर्ण समग्रता आहे की, ज्यात ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, कायदा, रूढी या व अशाच इतर पात्रतांचा व सवयीचा समावेश होतो आणि या गोष्टी व्यक्तीने समाजाचा सभासद या नात्याने संपादित केलेल्या असतात.
( Sir Edward Tylor – Culture is that complex whole which includes knowledge, belief, art, morals, law, custom and any other capabilities acquired by man, as a member of society.)
हरस्कोव्हिटस – संस्कृती हा पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग होय. ( J. M. Hetskovits “Culture is the man-made part of the environment”)
1.संस्कृतीचे संपादन होते किंवा ती शिकून घेतली जाते. ( Culture is acquired or learned )
2.संस्कृतीचे संक्रमण होते.( Culture is transmitted )
3.संस्कृतीचे स्वरूप हे सामाजिक असते. ( Culture is social )
4.संस्कृती हा समाजाचा आदर्श होय.( Culture is ideals )
5.संस्कृती समाज सदस्यांना त्यांच्या गरजा भागवून समाधानी ठेवते.( Culture is satisfies needs of the members of society, hence it is gratifying )
6.संस्कृती अभियोजनक्षम किंवा अनुकुलक्षम असते. (Culture is adaptive )
7.संस्कृती ही एकात्मता निर्माण करणारी यंत्रणा होय. (Culture is integrative mechanism )
8. संस्कृती बदलत जाते.( Culture undergoes a process of change )
9. भाषा – संस्कृतीचे एक मुलभूत वैशिष्ट्य आहे.( Language – a basic characteristics of culture )
10. संस्कृती अमूर्त आणि अति वैयक्तिक असते. ( culture is abstract and I is super individuals )
11. संस्कृती व्यक्तींच्या मनात वास करीत असते. म्हणजेच तिचे व्यक्तींकडून आंतरीकरण होते. (Culture staying at individuals heart, it means internalization of culture happens by individuals.)
12. प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगवेगळी असते. ( Every society have their own culture, every culture varies from society to society)
1 संस्कृतीचे घटक | Aspects of culture| components of culture
1) नियमने | Norms,
2) मुल्ये | Value,
3) चिन्हे आणि प्रतीके | Sgins & Symbols,
4 )भाषा | Language,
5) तंत्रज्ञान | Technology
नियमने हे संस्कृतीचे अविभाज्य घटक आहे. नियमने यांची व्याख्या आपल्याला पुढीलप्रमाणे करता येईल
-व्यक्तींच्या वर्तनविषयीच्या समूहाच्या अपेक्षा म्हणजे नियमन होय.
सामाजिक नियमनांची काही उदाहरणे-
१) जेवताना एकाच हाताचा वापर करावा,
२) पाहुण्यांचे हसून स्वागत करावे,
३) दुसऱ्याने नमस्कार केल्यास आपणही नमस्कार करावा.
४) वडिलधारी मंडळींचा मान राखावा
५) गुरुजनांशी आदराने वागावे ,
६) पवित्र वस्तूंचे पावित्र्य बिघडवू नये,
७) स्वत:चे काम करण्यासाठी इतरांना धमकी देऊ नये
८) राष्ट्रध्वजाचा मान राखावा ,
मुल्ये हे संस्कृतीचे अविभाज्य घटक आहे. मुल्ये ही प्रत्येक समाजाचे किंवा संस्कृतीचे आदर्श असतात. मुल्ये ही वर्तनविषयक मानदंड ( Standard) असतात. वर्तन वा एखादी गोष्ट चांगली की वाईट, बरोबर की चूक, योग्य की आयोग्य, हे ठरवण्याचे निकष म्हणजे मुल्ये होत.
मूल्यांचे काही उदाहरणे
१) समता,
२) स्वातंत्र्य,
३) समानता,
४) देशभक्ती,
५) बंधुता,
६) न्याय,
७) लोकशाही,
८) सत्य,
८) अहिंसा इत्यादी मुल्यांची उदाहरणे आपल्याला येतील.
चिन्हे आणि प्रतीके संस्कृतीचे घटक आहे. एखादी विशिष्ट घटना, किंवा विचार किंवा भावना प्रकट करण्यासाठी, एखाद्या गोष्टीचे निर्देशन करण्यासाठी संस्कृतीमध्ये चिन्हांचा व प्रतीकांचा वापर केला जातो. प्रतीके किंवा चिन्हांचा संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे.
आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की शब्दापेक्षा काही वेळा चिन्हे व प्रतीके अधिक प्रभावी ठरतात. चिन्हे किंवा प्रतिकामुळे निश्चित अर्थ स्पष्ट केला जातो. उदाहरणार्थ -वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सिग्नल यांचा वापर केला जातो. घंटेचा मंदिर आणि शाळा वापर केला जातो.
हिदू संस्कृतीमध्ये मंगळसूत्र लाल रंगाचे कुंकू मंगळसूत्र हे सौभाग्याचे चिन्ह म्हणून हिंदू धर्मात समजले
आजकल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा इमोजीचा वापर केला जातो. आनंद व्यक्त करताना वेगळे ईमोजी, दुःख व्यक्त करताना किंवा राग आल्यावर ही अशा वेगवेगळ्या इमोजीचा वापर केला जातो, हे एक प्रकारचे चिन्हांचा माध्यमातून व्यक्ती व्यक्त होतो. अशा सगळ्या गोष्टींचा समावेश संस्कृतीमध्ये होतो.
भाषा ही कोणत्याही संस्कृतीचे एक मूलभूत वैशिष्ट्य असते. भाषेतील शब्दे हे प्रतीके असतात. भाषेमुळे व्यक्तीला अमूर्त पातळीवरील विचार करता येते शक्य होते. भाषेवर संस्कृतीचा विकास अवलंबून असतो. भाषेच्या माध्यमातून एक पिढी दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचे संक्रमण करते.
तंत्रज्ञान हा संस्कृतीचा एक घटक आहे. तंत्रज्ञान हे मानव निर्मित आहे. हा संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. तंत्रज्ञानाच विकास आणि विस्तार जेवढ्या झपाट्याने होईल तितक्या वेगाने संस्कृतीच्या विविध घटकांत परिवतर्न घडवून आणते. मनुष्याने तयार केलेल्या दृश आणि अदृश्य अशा सर्व गोष्टींचा समावेशक संस्कृती होतो. तंत्रज्ञानाने तयार तयार केलेले हार्डवेयर आणि softवेयर हे संस्कृतीचा भाग बनते.
संस्कृतीचे घटक
1) नियमने,
2) मुल्ये,
3) चिन्हे आणि प्रतीके,
4 )भाषा,
5) तंत्रज्ञान,
संस्कृतीचे घटकांचे थोडक्यात उदाहरणासह स्पष्टीकरण - खालीलप्रमाणे
१) नियमने यांची व्याख्या -व्यक्तींच्या वर्तनविषयीच्या समूहाच्या अपेक्षा म्हणजे नियमन होय.
सामाजिक नियमनांची काही उदाहरणे-
१) जेवताना एकाच हाताचा वापर करावा,
२) पाहुण्यांचे हसून स्वागत करावे,
३) दुसऱ्याने नमस्कार केल्यास आपणही नमस्कार करावा ,
४) वडिलधारी मंडळींचा मान राखावा
५) गुरुजनांशी आदराने वागावे ,
६) पवित्र वस्तूंचे पावित्र्य बिघडवू नये,
७) स्वत:चे काम करण्यासाठी इतरांना धमकी देऊ नये
८) राष्ट्रध्वजाचा मान राखावा ,
२) मुल्ये
मुल्ये हे संस्कृतीचे अविभाज्य घटक आहे. मुल्ये ही प्रत्येक समाजाचे किंवा संस्कृतीचे आदर्श असतात. मुल्ये ही वर्तनविषयक मानदंड ( Standard) असतात. वर्तन वा एखादी गोष्ट चांगली की वाईट, बरोबर की चूक, योग्य की आयोग्य, हे ठरवण्याचे निकष म्हणजे मुल्ये होत.
मूल्यांचे काही उदाहरणे
१) समता,
२) स्वातंत्र्य,
३) समानता,
४) देशभक्ती,
५) बंधुता,
६) न्याय,
७) लोकशाही,
८) सत्य,
८) अहिंसा इत्यादी मुल्यांची उदाहरणे आपल्याला येतील.
३) चिन्हे आणि प्रतीके संस्कृतीचे घटक स्पष्ट करा. -
एखादी विशिष्ट घटना, किंवा विचार किंवा भावना प्रकट करण्यासाठी, एखाद्या गोष्टीचे निर्देशन करण्यासाठी संस्कृतीमध्ये चिन्हांचा व प्रतीकांचा वापर केला जातो. प्रतीके किंवा चिन्हांचा संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे.
आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की शब्दापेक्षा काही वेळा चिन्हे व प्रतीके अधिक प्रभावी ठरतात. चिन्हे किंवा प्रतिकामुळे निश्चित अर्थ स्पष्ट केला जातो. उदाहरणार्थ -वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सिग्नल यांचा वापर केला जातो. घंटेचा मंदिर आणि शाळा वापर केला जातो.
हिदू संस्कृतीमध्ये मंगळसूत्र लाल रंगाचे कुंकू मंगळसूत्र हे सौभाग्याचे चिन्ह म्हणून हिंदू धर्मात समजले जाते.
आजकल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा इमोजीचा वापर केला जातो. आनंद व्यक्त करताना वेगळे ईमोजी, दुःख व्यक्त करताना किंवा राग आल्यावर ही अशा वेगवेगळ्या इमोजीचा वापर केला जातो, हे एक प्रकारचे चिन्हांचा माध्यमातून व्यक्ती व्यक्त होतो. अशा सगळ्या गोष्टींचा समावेश संस्कृतीमध्ये होतो.
4 )भाषा:-
भाषा ही कोणत्याही संस्कृतीचे एक मूलभूत वैशिष्ट्य असते. भाषेतील शब्दे हे प्रतीके असतात. भाषेमुळे व्यक्तीला अमूर्त पातळीवरील विचार करता येते शक्य होते. भाषेवर संस्कृतीचा विकास अवलंबून असतो. भाषेच्या माध्यमातून एक पिढी दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचे संक्रमण करते.
5) तंत्रज्ञान
तंत्रज्ञान हा संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. तंत्रज्ञानाच विकास आणि विस्तार जेवढ्या झपाट्याने होईल तितक्या वेगाने संस्कृतीच्या विविध घटकांत परिवतर्न घडवून आणते. मनुष्याने तयार केलेल्या दृश आणि अदृश्य अशा सर्व गोष्टींचा समावेशक संस्कृती होतो. तंत्रज्ञानाने तयार तयार केलेले हार्डवेयर आणि softवेयर हे संस्कृतीचा भाग बनते.
.
संस्कृतीचे डोळ्यांनी दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या घटकांच्या आधारावर संस्कृतीचे भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती असे प्रमुख दोन प्रकार पडतात असे ऑगबर्न यांनी सांगितले आहे.
1) भौतिक संस्कृती (Material Culture),
2) अभौतिक संस्कृती (Non-material Culture).
1) भौतिक संस्कृती (Material Culture)
भौतिक संस्कृती मध्ये डोळ्याने दिसणार या मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. (Physical objects that a culture creates)
उदा. ऑटोमोबाईल्स (Automobiles) , पुस्तके (Books) , इमारती (Buildings) , कपडे (Clothing ).
2) अभौतिक संस्कृती (Non-material Culture)
या प्रकारच्या संस्कृतीमध्ये मानवाने बनविलेल्या मात्र डोळ्यांनी न दिसणाऱ्या अशा असंख्य गोष्टींचा, घटकांचा व वस्तूंचा समावेश होतो. संस्कृतीमध्ये लोकरीती, लोकनीती, रूढी, प्रथा व परंपरा इत्यादी घटकांचा समावेश होतो. रोजच्या व्यवहारात आपण या गोष्टींचा वापर करतो. आपल्याला ते अनुभवता येते. (Abstract human creations.)
उदा. विश्वास (Beliefs) ,, कौटुंबिक रचना (Family patterns) , कल्पना( Ideas), भाषा( Language) , राजकीय आणि आर्थिक प्रणाली( Political and economic systems)
संस्कृतीचे प्रकार-
१) लोकसंस्कृती | Folk culture,
२) मास / जन संस्कृती | Mass culture,
३) लोकप्रिय संस्कृती | Popular culture,
४) उपसंस्कृती | Subculture,
५) प्रतिसंस्कृती | Counter-culture,
लोक संस्कृती म्हणजे सामान्य लोकांची संस्कृती होय. विशेषत: पूर्व औद्योगिक समाजामध्ये ( शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज, बागायती समाज, पशुपालक समाज, शेती व्यवसाय करणारा समाज ) राहणाऱ्या लोकांत आढळत होती. डॉमिनिक स्ट्रिनाटी (1995) म्हणतात की लोकसंस्कृती बहुतेकदा तळागाळातून अस्तित्वात येते किंवा निर्माण होते. लोक संस्कृती स्वयं-निर्मित आणि स्वायत्त असते. लोकसंस्कृती मध्ये लोकांचे जीवन आणि अनुभव यांचे थेट प्रतिबिंबित पडते.
उदा.- लोक संस्कृतीमध्ये पारंपारिक गाणी व कथांचा समावेश होतो. अशी संस्कृती ही खासकरून एकसंघ असणाऱ्या ग्रामीण भागात आढळून येते. पोवाडे हे एक उत्तम उदाहरण आपल्याला लोक संस्कृतीचे देता येईल.
मास कल्चर घेऊन काही समीक्षकांचे असे मत आहे की लोकसंस्कृतीपेक्षा मास कल्चर हे कमी योग्य मानली जाते. जसे लोक संस्कृती हे पूर्व औद्योगिक समाजाचे वैशिष्ठ्य म्हणून पाहिल्यास, जन / मास संस्कृती हे औद्योगिक समाजाचे उत्पादन किंवा निर्माण म्हणू शकतो. मास कल्चर हे मूलत: मास मीडियाचे उत्पादन आहे. मास मीडिया म्हणजे एखाद्या गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी खर्चात, अतिशय परिणामकारक रीत्या पोचविण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक माध्यमे ( TV, रेडीओ, आणि इतर )
उदाहरणांमध्ये लोकप्रिय फिल्म्स, टेलिव्हिजन सोप ऑपेरा आणि रेकॉर्ड केलेले पॉप संगीत समाविष्ट आहे.
लोकप्रिय संस्कृती हा शब्द बर्याचदा मास कल्चर सारखाच वापरला जातो. लोकप्रिय संस्कृतीला काहीवेळा मास कल्चर देखील म्हटले जाते.
लोकप्रिय संस्कृतीमध्ये मोठ्या संख्येने सामान्य लोकांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या सांस्कृतिक उत्पादन व घटकांचा समावेश होतो.
अश्या संस्कृतीबाबत लोकांचा आक्षेप असत नाहीत. ही संस्कृती सगळ्यांना प्रचंड आवडते. लोकप्रिय संस्कृती ही अधिक व्यापक आणि प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, लोकप्रिय संस्कृतीचा उपयोग युरोप आणि युनायटेड स्टेट्समध्ये मनोरंजनासाठी मोठ्याप्रमाणात केला जातो.
(उदाहरणार्थ) यात
क्रीडा, दूरदर्शन, चित्रपट आणि
लोकप्रिय संगीत रेकॉर्ड केले.रामायण आणि महाभारत मालिका,
सुपर man , spiders man आणि लोकप्रिय काल्पनिक कथा,
W 007 गुप्तहेर कथा. इत्यादी
एक मोठ्या संस्कृतीमध्ये असणारी छोटी पण थोडी वेगळी असणारी संस्कृती होय. एका विशाल भारतीय समाजाच्या अंतर्गत जे अनेक समूह आहेत त्यांच्या त्यांच्या संस्कृत्या या वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेव्हा एकाच समाजातील विभिन्न समूहांच्या ज्या समूहविशिष्ट संस्कृती असतात, त्यांना उपसंस्कृती असे म्हणतात. परदेशात स्थायिक झालेले लोक आपल्या मूळ देशाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आपल्याबरोबर घेऊन तिथे जातात व तेथील संस्कृतीचे काही घटक ते आत्मसात करतात व दोहोंचे मिश्रण होऊन निराळीच संस्कृती अस्तित्वात येते तिलाही उपसंस्कृती असे म्हणता येईल.
समाजातील काही उपसंस्कृत्या मात्र समग्र समाजाच्या प्रस्थापित संस्कृतीला आव्हान देणाऱ्या असतात. जी उपसंस्कृती समाजाच्या प्रस्थापित संस्कृतीला आव्हान देणारी असते. तिला प्रति संस्कृती किंवा काउंटर कल्चर असे म्हणतात.
उदा. हिप्पी संस्कृती, संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांची संस्कृती.
संस्कृतीची व्याख्या
सर एडवर्ड बी. टायलर – संस्कृती ही अशी संकीर्ण समग्रता आहे की, ज्यात ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, कायदा, रूढी या व अशाच इतर पात्रतांचा व सवयीचा समावेश होतो आणि या गोष्टी व्यक्तीने समाजाचा सभासद या नात्याने संपादित केलेल्या असतात.
हरस्कोव्हिटस – संस्कृती हा पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग होय.
संस्कृतीचे प्रकार-
१) लोकसंस्कृती,
२) मास/जन संस्कृती,
३) लोकप्रिय संस्कृती,
४) उपसंस्कृती,
५) प्रतिसंस्कृती,
प्रत्येक संस्कृतीच्या प्रकाराचे थोडक्यात स्पष्टीकरण पाहूयात.
१) लोकसंस्कृती-
लोक संस्कृती म्हणजे सामान्य लोकांची संस्कृती होय. विशेषत: पूर्व औद्योगिक समाजामध्ये ( शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज, बागायती समाज, पशुपालक समाज, शेती व्यवसाय करणारा समाज ) राहणाऱ्या लोकांत आढळत होती. डॉमिनिक स्ट्रिनाटी (1995) म्हणतात की लोकसंस्कृती बहुतेकदा तळागाळातून अस्तित्वात येते किंवा निर्माण होते. लोक संस्कृती स्वयं-निर्मित आणि स्वायत्त असते. लोकसंस्कृती मध्ये लोकांचे जीवन आणि अनुभव यांचे थेट प्रतिबिंबित पडते.
उदा.- लोक संस्कृतीमध्ये पारंपारिक गाणी व कथांचा समावेश होतो. अशी संस्कृती ही खासकरून एकसंघ असणाऱ्या ग्रामीण भागात आढळून येते. पोवाडे हे एक उत्तम उदाहरण आपल्याला लोक संस्कृतीचे देता येईल.
2) मास कल्चर-
मास कल्चर घेऊन काही समीक्षकांचे असे मत आहे की लोकसंस्कृतीपेक्षा मास कल्चर हे कमी योग्य मानली जाते. जसे लोक संस्कृती हे पूर्व औद्योगिक समाजाचे वैशिष्ठ्य म्हणून पाहिल्यास, जन / मास संस्कृती हे औद्योगिक समाजाचे उत्पादन किंवा निर्माण म्हणू शकतो. मास कल्चर हे मूलत: मास मीडियाचे उत्पादन आहे. मास मीडिया म्हणजे एखाद्या गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी खर्चात, अतिशय परिणामकारक रीत्या पोचविण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक माध्यमे ( TV, रेडीओ, आणि इतर )
उदाहरणांमध्ये लोकप्रिय फिल्म्स, टेलिव्हिजन सोप ऑपेरा आणि रेकॉर्ड केलेले पॉप संगीत समाविष्ट आहे.
3) लोकप्रिय संस्कृती-
लोकप्रिय संस्कृती हा शब्द बर्याचदा मास कल्चर सारखाच वापरला जातो. लोकप्रिय संस्कृतीला काहीवेळा मास कल्चर देखील म्हटले जाते.
लोकप्रिय संस्कृतीमध्ये मोठ्या संख्येने सामान्य लोकांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या सांस्कृतिक उत्पादन व घटकांचा समावेश होतो.
अश्या संस्कृतीबाबत लोकांचा आक्षेप असत नाहीत. ही संस्कृती सगळ्यांना प्रचंड आवडते. लोकप्रिय संस्कृती ही अधिक व्यापक आणि प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, लोकप्रिय संस्कृतीचा उपयोग युरोप आणि युनायटेड स्टेट्समध्ये मनोरंजनासाठी मोठ्याप्रमाणात केला जातो.
(उदाहरणार्थ) यात
क्रीडा, दूरदर्शन, चित्रपट आणि
लोकप्रिय संगीत रेकॉर्ड केले.रामायण आणि महाभारत मालिका,
सुपर man , spiders man आणि लोकप्रिय काल्पनिक कथा,
W 007 गुप्तहेर कथा. इत्यादी.
4) उपसंस्कृती-
एक मोठ्या संस्कृतीमध्ये असणारी छोटी पण थोडी वेगळी असणारी संस्कृती होय. एका विशाल भारतीय समाजाच्या अंतर्गत जे अनेक समूह आहेत त्यांच्या त्यांच्या संस्कृत्या या वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेव्हा एकाच समाजातील विभिन्न समूहांच्या ज्या समूहविशिष्ट संस्कृती असतात, त्यांना उपसंस्कृती असे म्हणतात. परदेशात स्थायिक झालेले लोक आपल्या मूळ देशाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आपल्याबरोबर घेऊन तिथे जातात व तेथील संस्कृतीचे काही घटक ते आत्मसात करतात व दोहोंचे मिश्रण होऊन निराळीच संस्कृती अस्तित्वात येते तिलाही उपसंस्कृती असे म्हणता येईल.
5) प्रतिसंस्कृती