Short and Long Answer on Madal & Social network
Short and Long Answer on Madal या पोस्ट मध्ये आपण मंडळ म्हणजे काय ?, मंडळची व्याख्या, उदाहरणे आणि वैशिष्ठ्ये तसेच सामाजिक संजाल किंवा सामाजिक जाळे म्हणजे काय, इत्यादीचे FAQ स्वरुपारील प्रश्ने व उत्तरे पाहता येईल. ही संकल्पना जास्तीत जास्त 5 मार्कला येऊ शकते.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर या लिंकवर क्लिक करा. Short and Long Answer on Madal
मंडळ ( Association ) & सामाजिक संजाल किंवा सामाजिक जाळे ( Social Network) यावरील लघुउत्तरी प्रश्ने व उत्तरे
व्यक्ती त्यांच्या गरजा या समूहामध्ये पूर्ण करतो. तो त्यांच्या गरजा एकटा पूर्ण करू शकत नाही. काही गरजा त्यांच्या प्राथमिक समूहात तर काही गरजा दुय्यम समूहात भागविल्या जातात. सर्वच व्यक्तीच्या गरजा या दोन समूहात भागविल्या जात नाही. आपली विशिष्ट गरजा किंवा उद्देश भागविण्याच्या उद्देशाने व्यक्ती एकत्र येतात तेव्हा मंडळ तयार होते.
1) मॅक आयव्हर आणि पेज “विशिष्ट हितसंबंध किंवा हितसंबंधांच्या सामान्य संचास साध्य करण्यासाठी तयार झालेल्या संघटित समूहास ‘मंडळ’ असे म्हणतात.”
2) ई, एस. बोगार्डस्- “काही समान उद्दिष्टे साध्य करण्याकरिता एकत्र आलेल्या लोकांच्या समूहास ‘मंडळ’ असे म्हणतात.”
3) ऑगबन आणि निमकॉफ– “विशिष्ट हितसंबंधांना केंद्रस्थानी मानून विकसित झालेल्या संघटनांना ‘मंडळ’ असे म्हणतात.”
ई, एस. बोगार्डस्- “काही समान उद्दिष्टे साध्य करण्याकरिता एकत्र आलेल्या लोकांच्या समूहास ‘मंडळ’ असे म्हणतात.”
मंडळाची उदाहरणे:- महिला मंडळ, वारकरी मंडळ, गणेश मंडळ, भजनी मंडळ, नाट्य मंडळ, क्रीडा मंडळ, कॉलेज, व्यापारी संघ, शाळा, क्रीडा संकुल, राजकीय पक्ष, व्यावसायिक सोसायटी, धार्मिक संघटना इत्यादी.
मंडळाची वैशिष्ठ्ये
1.मंडळाला समान उद्दिष्ट किंवा गरजा असते
2.मंडळाचे सदस्यत्व हे ऐच्छिक असते.
3.मंडळास विशिष्ट नाव, प्रतीके व संविधान असते.
4.मंडळाचे नियानात्मक स्वरूप काही ठिकाणी दिसून येते.
5.मंडळाची जाणीवपूर्वक निर्मिती केली जाते.
6. मंडळ हे अस्थिर काही अंशी स्थिर ही असते.
7. मंडळातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना असते.
8. मंडळाची संरचना थोडीशी बंदिस्त आणि सैल अशी स्वरुपाची असते.
व्यक्ती त्यांच्या गरजा या समूहामध्ये पूर्ण करतो. तो त्यांच्या गरजा एकटा पूर्ण करू शकत नाही. काही गरजा त्यांच्या प्राथमिक समूहात तर काही गरजा दुय्यम समूहात भागविल्या जातात. सर्वच व्यक्तीच्या गरजा या दोन समूहात भागविल्या जात नाही. आपली विशिष्ट गरजा किंवा उद्देश भागविण्याच्या उद्देशाने व्यक्ती एकत्र येतात तेव्हा मंडळ तयार होते.
ई, एस. बोगार्डस्- “काही समान उद्दिष्टे साध्य करण्याकरिता एकत्र आलेल्या लोकांच्या समूहास ‘मंडळ’ असे म्हणतात.”
मंडळाची उदाहरणे:- महिला मंडळ, वारकरी मंडळ, गणेश मंडळ, भजनी मंडळ, नाट्य मंडळ, क्रीडा मंडळ, कॉलेज, व्यापारी संघ, शाळा, क्रीडा संकुल, राजकीय पक्ष, व्यावसायिक सोसायटी, धार्मिक संघटना इत्यादी.
मंडळाची वैशिष्ठ्ये
1.मंडळाला समान उद्दिष्ट किंवा गरजा असते
2.मंडळाचे सदस्यत्व हे ऐच्छिक असते.
3.मंडळास विशिष्ट नाव, प्रतीके व संविधान असते.
4.मंडळाचे नियानात्मक स्वरूप काही ठिकाणी दिसून येते.
5.मंडळाची जाणीवपूर्वक निर्मिती केली जाते.
6. मंडळ हे अस्थिर काही अंशी स्थिर ही असते.
7. मंडळातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना असते.
8. मंडळाची संरचना थोडीशी बंदिस्त आणि सैल अशी स्वरुपाची असते.
जाल /नेटवर्क म्हणजे सामाजिक संपर्काचे जाळे होय. नेटवर्क मध्ये समूहातील व्यक्ती या सामाजिक संबंधांद्वारे एकमेकांशी जोडलेल्या असतात. सामाजिक संबंधांद्वारे एक किंवा अधिक एकमेकांशी जोडल्या जाऊन सामाजिक नेटवर्क बनते. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक संबंधांच्या जाळ्यातून 'सामाजिक संजाल' तयार होते.
सामाजिक संबंधांचे उदाहरण
1.नातेसंबंध,
2. मैत्री,
3. संप्रेषण , &
4.अधिकारशाही.
1) मार्सडेन- “सामाजिक संजाल म्हणजे सामाजिक क्रिया ( Social Actors ) करणाऱ्यांना जोडणाऱ्या संबंधांची रचना होय.”
वॉसनमन आणि फॉस्ट:- “क्रिया करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्यातील संबंधांचा संच म्हणजे सामाजिक संजाल होय.”
तंत्रज्ञान म्हणजे काय ते पाहू या. 'तंत्रज्ञान म्हणजे ज्ञानाचे उपयोजन होय' अशी व्याख्या केली जाते. तंत्रज्ञानाचे सॉफ्टवेअर व हार्डवेअर असे दोन प्रकार पडतात. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या (सोशल मीडिया ) सामाजिक नेटवर्क तयार करीत आहे.
सोशल मीडियाचे काही उदाहरणे
1.फेसबुक,
2. what's app,
३. ट्विटर,
4. जी-मेल,
5. टिकटॉक,
6. WeChat,
7. इंस्टाग्राम,
8. लिंक्डइन.
सोशल मीडिया एक आभासी जग-
सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. हे एक आभासी जग आहे. ज्यात व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी संपर्कात राहून संबंध प्रस्थपित करते.
सोशल मीडिया हे संवादाचे एक उत्तम व्यासपीठ व प्रभावी लोकप्रिय माध्यम आहे.-
सोशल मीडिया हे संवादाचे एक उत्तम व्यासपीठ, प्रभावी माध्यम आहे. व्यक्तीची माहितीची गरज भागविण्याचे काम सोशल मीडिया हे करते. सोशल मीडिया द्वारे वायुवेगाने यामध्ये माहितीची देवाणघेवाण वापरकर्त्याद्वारा केला जातो.
सोशल मीडियाद्वारे क्षणात शेयर केली जाते.-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वापरकर्ता फोटो, व्हिडिओ, माहिती, कागदपत्रे, लोकेशन आणि इतर अनेक गोष्टी क्षणार्धात शेयर करीत असतो. त्यामुळे सोशल मीडिया हे एक अतिशय लोकप्रिय माध्यम बनले आहे. काळाबरोबर ते अधिकाधिक विकसित होत आहे. त्यामुळे व्यक्तीचे सामाजिक संबंधाचे स्वरूप बदलताना दिसून येत आहे.