FAQ on Social Group in Marathi या पोस्ट मध्ये आपण समूह म्हणजे काय ?, समूहाची व्याख्या, वैशिष्ठ्ये आणि प्रकार पाहता येईल. समूहाचे जे प्रकार आहेत, प्राथमिक आणि दुय्यम समूहांची व्याख्या आणि त्यांची वैशिष्ठ्ये पाहता येईल.
समाजशास्त्र विषयाच्या 5 मार्कच्या प्रश्नांच्या उत्तरातून लिहा 10 किंवा 20 मार्काचा प्रश्नाचे उत्तर.
FAQ on Social Group in Marathi या पोस्ट द्वारे प्रत्येक प्रश्नाचे 5 मार्क करिता लिहिणे अपेक्षित असलेले उत्तर देण्यात आले आहे.
जेव्हा तुम्ही खालील FAQ मधील दोन 5 मार्कचे प्रश्न एकत्र कराल, तेव्हा तो प्रश्न 10 मार्कचा होईल. उदा, सामाजिक समूह म्हणजे काय ? हे प्रश्न 5 मार्क करिता आहे. आणखीन एक प्रश्न आहे. समूहाची वैशिष्ठ्ये सांगा. हा प्रश्न हा 5 मार्क करिता आहे.
जेव्हा वरील दोन्ही प्रश्न तुम्ही एकत्रित कराल, ते पुढील प्रमाणे बनेल .- सामाजिक समूह म्हणजे काय सांगून वैशिष्ठ्ये सांगा? हे प्रश्न 10 मार्कचा होईल. जेव्हा तुम्ही 5 मार्कचे 3 किंवा 4 प्रश्न एकत्रित कराल तेव्हा मात्र ते 20 मार्कचा प्रश्न तयार होईल. खाली मी एक उदाहरणादाखल एक प्रश्न लिहितो. समूहाची किंवा सामजिक समूहाची व्याख्या व प्रकार सांगून कोणत्याही एका प्रकारची व्याख्या व उदारहण सांगून त्यांची वैशिष्ठ्ये लिहा.
जर आपणास खाली FAQ दिसत नसतील तर या लिंकवर क्लिक करा. FAQ on Social Group in Marathi
सामाजिक समूह ( Social Groups ) या संकल्पनावरील सर्व लघु आणि दीर्घउत्तरी प्रश्ने व उत्तरे
ऑगबर्न आणि निमकॉफ यांचे मते “जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात तेव्हा समूह निर्माण होतो. अशी त्यांनी समूहाची व्याख्या केली जाते. समूह बनविण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्ती असणे अनिवार्य आहे. समूह अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्तीची आवश्यकता असते. एकत्र आलेल्या व्यक्तीमध्ये दीर्घकाळ आणि वारंवार आंतरक्रिया व्हाव्या लागतात. अश्या या आंतरक्रियांची जाणीव असावी त्या समूहातील सदस्यत असावे लागते. अशी आंतरक्रिया करणे हे अर्थपूर्ण आहे असे त्यांना वाटावयास हवे. दोन व्यक्तीचा समूह हा लहानात लहान सामाजिक समूह होय. त्याला इंग्रजीत Dyad असे म्हणतात, तर तीन व्यक्तींचा समूह त्याला Triad असे म्हणतात. जास्तीतजास्त समूहात किती सदस्य असायला हवे याला काही बंधन नाही, ते कितीही असू शकतात.
उदा. पती-पत्नी, कुटुंब, शाळा, एखादे गाव, शहर आणि राष्ट्र हे देखील सामाजिक समूह होऊ शकतो.
उत्तर-> ऑगबर्न आणि निमकॉफ यांचे मते “जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात तेव्हा समूह निर्माण होतो.
हॉर्टन आणि हंट – सदस्यत्वाची व आंतरक्रियांची जाणीव असणारे कितीही लोक म्हणजे सामाजिक समूह होय.
सामजिक समूहाची वैशिष्ठ्ये
1) समूहात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती असतात.
2) समूहाचे समान हेतू ,ध्येय & समजूत असते.
3) समूहातील व्यक्तीमध्ये सामाजिक आंतरक्रिया घडते व त्याची सर्वाना जाणीव असते.
4) समूहातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना असते.
5) एकात्मतेची भावना असते.
6) समूहाला संरचना असते.
7) समूहामधील संबंध हे सापेक्षता कायम किंवा टिकवू स्वरूपाचे असते.
8) समूहामध्ये परिवर्तनशीलता किंवा गतिशीलता असते.
उत्तर-> हॉर्टन आणि हंट – सदस्यत्वाची व आंतरक्रियांची जाणीव असणारे कितीही लोक म्हणजे सामाजिक समूह होय.
समूहाचे प्रकार
1) प्राथमिक समूह
2) दुय्यम समूह
3) अंतःसमूह
4) बाह्य समूह
5) संदर्भ समूह
अमेरिकेतील सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सी . एच् . कूले त्यांनी त्यांच्या Human Organization ( 1909 ) या ग्रंथात "प्राथमिक समूह" ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.
ज्या समूहात सदस्यांमधील परस्परसंबंध अत्यंत घनिष्ठ (intimate ) , समोरासमोरचे (face to face) , दीर्घकाळ टिकणारे (durable) आणि प्रामुख्याने सहकार्यावर आधारित (based on co-operation) असे असतात, त्या समूहाना कूले यांनी प्राथमिक समूह असे म्हटले आहे.
उदा. कुटुंब, मैत्री , बालसंवंगडी, शेजारी आणि जोडपे
दुय्यम समूह संकल्पना प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध अशी आहे. याची व्याख्या पहिल्या की आपल्या लक्षात येईल.
ड्रेसलर आणि विलीस – “ज्या समूहातील सदस्यांमधील संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहाला ‘ दुय्यम समूह ‘ असे म्हणतात.”
ऑगबर्न आणि निमकॉफ –“जो समूह घनिष्ठतेचा अभाव असलेले अनुभव प्रदान करतो त्यास ‘दुय्यम समूह’ असे म्हणतात.”
उदा. शाळा, राजकीय पक्ष, बिजनेस ऑर्गनायझेशन & कामाचे ठिकाण
व्यक्ती ज्या समूहांची सभासद असते, म्हणजे ज्यात ती असते तो तिच्या दृष्टीने अंत:समूह (In–group ) होय.
उदा. एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबाची, महाविद्यालयाची, क्रीडासमूहाची सभासद असेल तर हे समूह तिच्या दृष्टीने अंत:समूह (In–groups ) होत. या समूहांविषयी व्यक्तीच्या मनात आपलेपणाची भावना असते, आम्हीची (We–Feeling ) भावना असते.
उत्तर -> व्यक्ती ज्या समूहांची स्वत: सभासद नसते ते तिच्या दृष्टीने ‘बहिःसमूह’ (Out – Groups) होत.
बाह्य समूहांबद्दल व्यक्तीच्या मनात तितकीशी आपलेपणाची भावना नसते. एवढेच नव्हे तर ते तिला ‘परक्यांचे समूह’ (They Group ) वाटतात.
उदा. आपण सर्व भारतीय एक आहोत अशी भारतीयांबद्दलची आपली भावना असते तर पाकिस्तान हा भारतीयांच्या दृष्टीने परक्यांचा समूह होय.
एखादी व्यक्ती स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहाचा संदर्भ घेते त्याला संदर्भ समूह असे म्हणतात.
उदा. एखाद्या समूहातील काही व्यक्ती, दुसऱ्या एका समूहाची प्रत्यक्ष सभासद होण्याची इच्छा बाळगून असतील तेव्हा दुसरा समूह पहिल्या समूहातील व्यक्तींचा संदर्भ समूह असतो उदाहरणार्थ- कमी उत्पन्न गटांतील व्यक्ती या जर मध्यम वर्गात जाण्याची इच्छा करीत असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या साठी मध्यम वर्ग हा संदर्भ समूह असतो.
या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना प्राथमिक समूहाचे उदा. कुटुंब, मैत्री व शेजारी इत्यादी लक्षात ठेऊन वैशिष्ठ्ये लिहावे.
1) प्राथमिक समूहात भौतिक सान्निध्य खूप जवळचे असते.
2) या समूहाचा आकार लहान लहान असतो.
3) या समूहातील सदस्यांत मध्ये समोरासमोरचे संबंध
4) या समूहातील सदस्यांत व्यक्तिगत संबंध असतात.
5) या समूहातील सदस्यांत अनौपचारिक संबंध असतात.
6) स्वयंस्फुर्त संबंध असतात
7) अहस्तांतर्णीय संबंध असतात.
8) या समूहातील सदस्यांतील संबंधात सातत्य असते.
9) या समूहातील सदस्यांतील संबंध हे अत्यंत घनिष्ठ असतात.
या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना प्राथमिक समूहाचे उदा. शाळा, राजकीय पक्ष, बिजनेस ऑर्गनायझेशन, & कामाचे ठिकाण इत्यादी लक्षात ठेऊन वैशिष्ठ्ये लिहावे.
1) दुय्यम समूह मधील सदस्यांत भौतिक सान्नीध्यांचा अभाव असतो.
2) या समूहाचा मोठा आकार असतो.
3) या समूहातील सदस्यांत अप्रत्याक्ष संबंध असतात.
4) या समूहातील सदस्यांत कमी घनिष्ट संबंध असतात.
5) या समूहातील सदस्यांमध्ये व्यक्तिनिरपेक्ष संबंध असतात.
6) या समूहातील सदस्यांमध्ये औपचारिक संबंध असतात.
7) या समूहातील सदस्यांमध्ये कराराच्या स्वरूपाचे संबंध
8) या समूहात संबंध हस्तांतर्णीय असतात
9) या समूहातील संबंध हे तुटक संबंध