सामाजिक वंचितता | सामाजिक वर्जीतता | Social Exclusion
सामाजिक वर्जीतता (Social Exclusion ) ही एक महत्त्वपूर्ण समाजशास्त्रातील संकल्पना आहे. या शब्दाचे मूळ ( Social Exclusion ) फ्रान्समध्ये झाल्याचे आढळते. 1970 च्या दशकातील सामाजिक संरक्षणाच्या संदर्भात गणले न गेलेले लोकसमूह ( वगळलेले ) जसे एकेरी पालक, विकलांग, विम्याचे संरक्षण प्राप्त न झालेले कामगार यांना उद्देशून ‘सामाजिक वंचितता’ शब्द वापरला गेला होता.
सामाजिक वंचितता ही एक प्रक्रिया | Social exclusion is the process
सामाजिक वंचितता ही एक प्रक्रिया आहे की, ज्याद्वारे एखाद्या संपूर्ण गटातील किंवा श्रेणीतील लोक सामाजिक जीवनात आवश्यक असणाऱ्या सहभागापासून निष्कासित केले जातात.
( Social exclusion is the process through which individuals or groups are excluded from facilities, benefits and opportunities that the others enjoy.)
सामाजिक वंचिततेच्या प्रक्रियेत लोक समाजातील मुख्य प्रवाहाच्या सहभागापासून दूर ढकलले जातात. सामाजिक वंचितता जात, वर्ग, संस्कृती, वर्ण, वंश, ग्रामीण, शहरी, आदिवासी, गरिबी, लिंग, वांशिक, वय अशा अनेक आयामांसह भेदभाव दर्शविते. अशा गटांना सामाजिक सेवांची उपलब्धता, संधी आणि श्रमिकांच्या बाजारपेठेत त्यांच्या सहभागाच्या संधींवर मर्यादा आणते.
What is Social exclusion | सामाजिक वंचितता म्हणजे काय
सामाजिक वर्जीतता ही एक जटिल व बहुआयामी प्रक्रिया आहे. यामध्ये समाजातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या क्रिया-प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याची असमर्थता, वस्तू व सेवांचा अभाव, अधिकार यांचा समावेश होतो. यामुळे व्यक्तीच्या व त्या अनुषंगाने त्या गटाच्या जीवनाची गुणवत्ता आणि म्हणून संपूर्ण समाजाचे एकत्रीकरण, एकात्मिकता या दोन्हींवर परिणाम होतो.
भारतातील प्रमुख सामाजिकदृष्ट्या वंचित गट | Major socially excluded groups in India,
- अनुसूचित जाती Scheduled caste (SC)
- अनुसूचित जमाती Scheduled tribes (ST),
- विमुक्त जाती व भटक्या जमाती Vimuk Jati, & Nomadic Tribes ( VJNT/ NT DNT
गरिबी आणि सामाजिक वंचितताचे परिमाण: Dimensions of poverty and social exclusion:
- संसाधनाचा अभाव (Lack of resources)
- कामाच्या संधीचा अभाव ( Lack of opportunities to work)
- शिकण्याची संधी न मिळणे ( Lack of opportunities to learn.)
- आरोग्य सुविधातील विषमता / चांगले आरोग्य सोयी न मिळणे ( Health inequalities. )
- स्वःता घर नसणे ( Lack of decent housing.)
- कौटुंबिक जीवना विस्कळीतपणा (Disruption of family life.)
- योग्य ठिकाणी राहण्याचे वसतीस्थान नसणे / चंगला शेजारी नसणे ( Living in a disadvantaged neighborhood )