लिंगभाव म्हणजे काय? | What is Gender | lingbhav
जर मी आपणास एक प्रश्न केला की, लिंग व जेंडर दोन्हीतील फरक काय आहे? What is difference between sex and Gender ? आपण काय उत्तर द्याल ……..? बहुतांश जण हेच म्हणतील की ते एकच आहे. कारण आपण जेंडर हे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचे लिंग दर्शविण्यासाठी जेंडर हा शब्द वापरतात असे आपण म्हणू शकाल. चला तर जाणून घेऊयात की लिंगभाव ही संकल्पना आहे तरी काय.
लिंग म्हणजे काय? | What is sex?
जेंडर ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपण लिंग( sex) म्हणजे काय हे समजून घेऊयात.
लिंग हे निसर्गिक असते. लिंग हे जीवशास्त्रीय आहे. ते स्त्री पुरुषांच्या जानेनोद्रीयातील फरकामुळे दृश्य स्वरूपाचे असते. लिंगातील भेद हे प्रजननप्रक्रियेतील कार्यावर अवलंबून आहेत. लिंग हे शक्यतो सहजपणे बदलता येत नाही.
( Sex typically refers to sexual anatomy and sexual behaviour It’s term also refer to the biological division into male and female. It is natural, it is biological, it is not a social.)
लिंगभाव म्हणजे काय | What is Gender
लिंगभाव ही संकल्पना सर्वप्रथम अँन ओकले यांनी वापरली. अन ओकले यांच्या म्हणण्याप्रमाणे लिंगभाव ही सांस्कृतिक बाबत आहे. यातूनच स्त्री व पुरुषाची बाईपणात व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूची होते.
जेंडर सामाजिक हे आहे | Gender is socially constructed
लिंगभाव हा सांस्कृतिक असून ते मनुष्य निर्मित आहे. लिंगभाव हे सामाजिक सांस्कृतिक आहे. तो भूमिका, गुण व वर्तनप्रकार व जबाबदाऱ्या इत्यादीची स्त्रीयोचीत आणि पुरूषोचित अशी विभागणी करते. ( Gender refers to the sense of maleness or femaleness related to our membership in a given society.)
स्त्री -पुरुषांचे स्थान व भूमिका यात समाजात कसा भेद केला जातो हे लिंगभाव या संज्ञामुळे आकलन होते.
थोडक्यात स्त्री व पुरुष यांच्यामध्ये त्यांच्या लिंगाच्या फरकांच्या आधारावरजो भेदभाव केला जातो त्याला लिंगभेद / जेंडर असे म्हणतात. जेंडर स्त्री पुरुषांचे स्थान व भूमिका यात समाजात कसा भेद केला जातो याचे या संज्ञामुळे आकलन होते. ( Gender: Perception of Being )Male or Female.
जेंडर हा गतिशील असतो | Gender are dynamic
जेंडर बदलता येतो, काळ संस्कृती इतकेच काय कुटुंबा–कुटुंबात तो बदलतो. श्रमाचे लिंगधारित विभाजन झाले आहे. ते नैसर्गिक नसून सामाजिक आहे. ( Division of labour found in our society on the basis of sex . It is not natural, it is socially constructed. )
आपल्या समाजातील महिलांना घेऊन असणारे साचेबंद विचार | Stereotypes thinking towards women in our society
- स्त्रिया या फक्त चूल व मुल या पर्यत मर्यादित आहेत.
- स्त्रि ही क्षणाची पत्नी व दीर्घकाळाची माता असते.
- स्त्रिया या मायाळू, सहनशील व पुरुषापेक्षा कमजोर असतात.
- स्त्रिया यांनी घरातील स्वयंपाक, साफसफाई, शिवणकाम आणि कपडे धुण्याचे काम व जेष्ठाची काळजी घ्यावे. करतात
- स्त्रि ने पुरुषांची सेवा करावी. पती त्यांच्या यासाठी परमेश्वर असतो म्हणून तिने पुरुष अधिकाराच्या अधीन असतात.
- महिलांना मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाच्या व्यवसायांपासून आणि सत्तेच्या पदांपासून वगळण्यात आले आहे
लिंगभाव याची वैशिष्ठ्ये | Characteristics of gender
- सार्वत्रिक– लिंगभाव हे संपूर्ण जगात आढळून येते.
- पितृसत्ताक कुटुंब पद्धती-स्त्रिया दुय्यम स्थान दिले जाते.
- स्त्रियांचे मर्यादित कार्यक्षेत्र– महिला ठराविक कामापर्यत सीमित केले जाते.
- कुटुंबापासून सुरुवात-लिंगआधारित भेदभावाची सुरुवात घरातून होते.
लिंगभाव वरील MCQ सोडविण्यासाठी येथे क्लिक करावे:-MCQ on Caste, Gender, Ethnicity and Social Exclusion | जाती, लिंगभाव, वांशिकता & सामाजिक वंचीतता बहुपर्याय प्रश्ने-उत्तरे
संपूर्ण लिंगभाववर लिहण्यात आलेले पुस्तक ” लिंगभाव समजून घेताना” कमला भसीन यांचे प्रोफेसर – श्रुती तांबे यांनी भाषांतरित केले पुस्तक pdf