मूलभूत कर्तव्ये | Fundamental Duties of Every Indian citizen
आपण सर्व जण भारत या देशात राहतो. देशाचे नागरिक म्हणून भारतीय राज्यघटनेने आपणास काही मुलभूत हक्कबरोबर काही कर्तव्ये ( Fundamental Duties ) ही बहाल केलेली आहेत. मुलभूत हक्क वापरताना संविधानानी दिलेल्या कर्तव्यांची सुद्धा पदोपदी जाणीव असणे फार गरजेचे आहे. भारताचे सविधान भाग ४ क मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हे अनुच्छेद ५१ क सांगितले आहे. एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकांनी कर्तव्ये पालन करणे आवश्यक आहे. मात्र ते अनिवार्य नाही.
भारतीय राज्यघटनेत कलम 51 क ( Article-51 A ). यामध्ये मूलभूत कर्तव्ये देण्यात आले आहे
मूलभूत कर्तव्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल असे भारतीय राज्यघटनेत कलम 51 A ( Section 51 A). या कलमामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये देण्यात आलेली आहे.
भारतीय राज्यघटनेतील नागरिकांची मूलभूत कर्तव्ये
प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने खालील मूलभूत कर्तव्ये -1 ते 11 नमूद केलेल्या कर्तव्यांचा पालन करावे
मूलभूत कर्तव्ये -1 | Fundamental Duties-1
प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करावा. (to abide by the Constitution and respect its ideals and institutions, the national Flag and the National Anthem; )
मूलभूत कर्तव्ये -2 | Fundamental Duties-2
स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाचा आदर्शाचे पालन करावे. (to cherish and follow the noble ideals which inspired our national struggle for freedom;)
मूलभूत कर्तव्ये -3 Fundamental Duties-3
देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. (to uphold and protect the sovereignty, unity and integrity of India;)
मूलभूत कर्तव्ये -4 | Fundamental Duties-4
आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. (to defend the country and render national service when called upon to do so;)
मूलभूत कर्तव्ये -5 | Fundamental Duties-5
सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा बाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. ( to promote harmony and the spirit of common brotherhood amongst all the people of India transcending religious, linguistic and regional or sectional diversities; to renounce practices derogatory to the dignity of women;)
मूलभूत कर्तव्ये -6 | Fundamental Duties-6
आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. (to value and preserve the rich heritage of our composite culture;)
मूलभूत कर्तव्ये -7 | Fundamental Duties-7
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दबाबुद्धी बाळगावी. ( to protect and improve the natural environment including forests, lakes, rivers and wild life, and to have compassion for living creatures;)
मूलभूत कर्तव्ये -8 | Fundamental Duties-8
वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी. ( to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform;)
मूलभूत कर्तव्ये -9 | Fundamental Duties-9
सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे . हिंसेचा त्याग करावा.( to safeguard public property and to abjure violence;)
मूलभूत कर्तव्ये -10 | Fundamental Duties-10
देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. ( to strive towards excellence in all spheres of individual and collective activity so that the nation constantly rises to higher levels of endeavour and achievement)
मूलभूत कर्तव्ये -11 | Fundamental Duties-11
6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात. ( Parents should provide educational opportunities to their children in the age group of 6 to 14 years.)