बहुसंस्कृतिवाद | What is Multiculturalism
बहुसंस्कृतिवाद हा शब्द हे एखाद्या समाजात अनेक भिन्न संस्कृतीचे समूह एकत्र राहतात असे वर्णन करण्यासाठी वापरतात. Multiculturalism या शब्दातच एकपेक्षा जास्त संस्कृती एकत्र वास्तव्यास असणे असा अर्थ अभिप्रेत होतो.
बहुसंस्कृतिवाद म्हणजे काय? | What is Multiculturalism
बहुसंस्कृतिवाद हा एक दृष्टिकोन आहे. दृष्टिकोनाप्रमाणे विविध सांस्कृतिक भिन्नता असलेले समूह, विविध वंशाचे व वांशिकता असलेले आणि अल्पसंख्याक समूह एकत्र राहण्यास प्रोत्साहन देण्यात येते.
Multiculturalism is word that describes a society where many different cultures live together.
As a descriptive term it refers to cultural diversity where two or more groups with distinctive beliefs/cultures exist in a society.
It can also refer to government policy as a formal recognition of the cultural distinctiveness of particular groups.
It implies a positive endorsement of cultural diversity.
बहुसंस्कृतिवादमध्ये विभिन्न सांस्कृतिक समूहांची विशेष दखल ( Acknowledgment ) देणे आवश्यक असते.
प्रस्थापित राजकीय संस्कृतीमध्ये अश्या विभिन्न सांस्कृतिक समूहांची विशेष दखल ( Acknowledgment ) मिळणे अपेक्षित आहे , जेणेकरून संबंधित समूहांना अधिक सुरक्षित व शांततेत जीवन जगण्यास मदत होईल.
विकसित व विकसनशील देशांमध्ये अलीकडील काळात बहुसंस्कृतिकवादास ( Multiculturalism ) प्राधान्यक्रम दिला जातो. जेणेकरून तेथील विविध धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक समूहांना स्थिरावण्यास मदत होऊ शकते.
बहुसंस्कृतिवाद म्हणजे अनेकसत्तावाद /बहुलतावादाला दिलेली प्रतिक्रिया आहे.
अनेकसत्तावाद /बहुलतावादाच्या ( Cultural Pluralism )
सांस्कृतिक बहुलवाद अशी सामाजिक स्थिती आहे ज्यामध्ये समाजातील अल्पसंख्याक गट त्यांच्या विशिष्ट सांस्कृतिक ओळख, मूल्ये आणि पद्धती जतन करून ते व्यापक समाजाच्या कायद्यांशी आणि मूल्यांशी सुसंगत असतील.
बहुसंस्कृतिवाद म्हणजे आधुनिक लोकशाहीमधील सांस्कृतिक अनेकसत्तावाद /बहुलतावादाच्या ( Cultural Pluralism ) वास्तविकतेला दिलेली प्रतिक्रिया आहे.
भरपाई करण्याचा मार्ग म्हणून बहुसंस्कृतिवादकडे पहिले जाते.
भारतामध्ये जातीव्यवस्था होती. हजारो वर्ष अस्पृश यांना त्यांच्या सामाजिक जीवनात भेदभाव सहन करावा लागला. त्यांची नुकसानभरपाई त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी शिक्षण, राजकारण आणि नोकरी मध्ये आरक्षण ठेवण्यात आले.
तसेच धर्माच्या व वंशांचा आधारवर ज्यांना विविध देण्यात भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागला अश्या समूहांना सुरक्षित व शांततेत जीवन जगण्यास मदत करण्यासाठी अनेक विकसित राष्ट्रांनी त्यांना नागरिकत्व देऊन त्यांना आश्रय देण्यात आले आहे. अशा भूतपूर्व बहिष्कार, भेदभाव आणि अत्याचार याला सामोरे गेलेल्या सांस्कृतिक समूहांना भरपाई करण्याचा मार्ग आहे असे बहुसंस्कृतिवाद मानले जाते
बहुसंस्कृतिवाद हा दृष्टिकोन सांस्कृतिक भिन्नतेचा आदर करून तिला प्रोत्साहित करतो.
हा दृष्टिकोन सांस्कृतिक भिन्नतेचा आदर करतो. अशी संस्कृती राहावी, फुलावी आणि प्रसरावी यासाठी तिला प्रोत्साहित करतो. एखाद्या समाजातील सांस्कृतिक विविधता जवळून अभ्यासण्याचा एक दृष्टिकान म्हणून समाजशास्त्रज्ञ बहुसंस्कृतिवादाकडे ‘ पाहतात.
बहुसांस्कृतिकता हा जगभरातील काही देशात वादग्रस्त मुद्दा आहे. युरोपमधील काही पुढारलेल्या देशांनी मात्र सिरियातील निर्वासित मुस्लीम लोकांना आश्रय देण्यास नकार दिला.