परकीय द्वेष | Xenophobia| झेनोफोबिया
झेनोफोबिया (Xenophobia )या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यापूर्वी आपण या शब्दाची फोड करूयात. झेनो + फोबिया आहे. प्रथम आपण फोबिया या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. फोबिया म्हणजे एक प्रकारची भीती. एखाद्या गोष्टीला घेऊन असणारी विनाकारण भीती. आपल्या प्रत्येकाला काश्याची तरी भीती वाटतेच किंवा असतेच . कुणाला साप पाहिल्यावर, कुणाला पाल पाहिल्यावर भीती वाटते तर, कुणाला मोटारसायकल चालवायला भीती वाटते. व्यक्तींपरत्वे वेगवेगळ्या भीतीचे प्रकार लोकांना असते.
कुणाला पाण्याची भीती वाटते. अशी भीती वाटणाऱ्या आपण Hydrophobia म्हणतो. खूप उंचीवरून खाली पाहिल्यावर ज्यांना भीती वाटते त्यांना एक्रोफोबिया आहे म्हणतो. गर्दीची ज्यांना भीती वाटते त्यांना ऍगोराफोबिया (Agoraphobia )असे असे म्हणतो. तसेच झेनोफोबिया म्हणजे परकीय म्हणून असलेली भीती होय.
झेनोफोबिया‘चा शब्दशःअर्थ | Meaning of Xenophobia
झेनोफोबिया ( Xenophobia ) या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील ‘Xenos’ म्हणजे परकीय /अनोळखी या शब्दापासून झालेली दिसते.
Xenos – meaning “strangeness” or “foreignness”
‘Phobia’ ( फोबिया ) या शब्दाचा अर्थ ‘ भीती ‘ असा होतो .
Phobia meaning “fear of”
झेनोफोबिया‘चा शब्दशःअर्थ परकीयांबद्दल असणारा भीतियुक्त दृष्टिकोन
झेनोफोबिया म्हणजे काय | What is Xenophobia
‘झेनोफोबिया’ ही एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला ‘ परकीय ‘ किंवा ‘ इतर ‘ म्हणून संबोधले गेल्यानंतर निर्माण होणारी भीती अथवा पूर्वग्रह दर्शविणारी संज्ञा आहे.
Xenophobia means an unreasonable fear, distrust, or hatred of strangers, foreigners, or anyone perceived as foreign or different.
परकीय विद्वेषाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –
- Immigrant (परदेशातून कायमचे राहण्यासाठी आलेले ,)
- Refugee (निर्वासित)
- Asylum seeker (आश्रय साधक)
- Orphan (अनाथ)
शब्दसंग्रह
- स्थलांतरित (Immigrant) : एक व्यक्ती जी दुसर्या देशात स्थलांतरित होते, सामान्यतः कायमस्वरूपी निवासासाठी.
- निर्वासित (Refugee) : जसे एखाद्या देशातील राजकीय उलथापालथ, युद्ध इ. कारणामुळे दुसऱ्या देशात आश्रय घेतात किंवा परदेशात, सुरक्षिततेसाठी पळून जाणारी व्यक्ती.
- आश्रय साधक ( Asylum seeker) : परदेशी नागरिक स्वःताच्या देशात छळ होईल या या भीती पोटी मायदेशी परतण्यास असमर्थता असतो इतर देशात तो आश्रय शोधतो.
- अनाथ( Orphan) : अशी मुले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत. जे दुसऱ्यांकडे राहत असतात.
वरील सर्व घटक हे ज्या देशात राहत असतात. तेथील लोक यांना परकीय म्हणून संबोधतात. इतर म्हणून समजल्यावर त्यांना परकीय भीती वाटते. प्रत्यक्षात तेथील लोकांकडून कोणताही त्रास नसतो. आश्रित लोकांच्या मनात आपण वेगळे आहोत अशी भावना त्यांच्या मनात असते. ज्यातून झेनोफोबिया त्यांना असतो.