संस्कृतीचे प्रकार | types of culture| types of culture in sociology
जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे संस्कृती होय. व्यक्तीकडून संस्कृतीचे अंतरीकरण होते. मागील पोस्ट मध्ये आपण संस्कृतीचे घटक- नियमने, मुल्ये, प्रतीके, चिन्हे, भाषा आणि तंत्रज्ञान पाहिले. या पोस्ट मध्ये संस्कृतीचे प्रकार (types of culture ) पाहणार आहोत. संस्कृती ही निसर्ग निर्मित नाही तर ती मानवनिर्मित आहे. यामध्ये मूर्त व अमूर्त गोष्टींचा समावेश होतो.
ऑगबर्न यांनी संस्कृतीचे प्रमुख दोन प्रकार सांगितले आहे | types of culture
संस्कृतीचे डोळ्यांनी दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या घटकांच्या आधारावर संस्कृतीचे भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती असे प्रमुख दोन प्रकार पडतात असे ऑगबर्न यांनी सांगितले आहे.
1) भौतिक संस्कृती (Material Culture)
भौतिक संस्कृती मध्ये डोळ्याने दिसणार या मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. (Physical objects that a culture creates)
उदा. ऑटोमोबाईल्स (Automobiles) , पुस्तके (Books) , इमारती (Buildings) , कपडे (Clothing )
2) अभौतिक संस्कृती (Non-material Culture)
या प्रकारच्या संस्कृतीमध्ये मानवाने बनविलेल्या मात्र डोळ्यांनी न दिसणाऱ्या अशा असंख्य गोष्टींचा, घटकांचा व वस्तूंचा समावेश होतो. संस्कृतीमध्ये लोकरीती, लोकनीती, रूढी, प्रथा व परंपरा इत्यादी घटकांचा समावेश होतो. रोजच्या व्यवहारात आपण या गोष्टींचा वापर करतो. आपल्याला ते अनुभवता येते. (Abstract human creations.)
उदा. विश्वास (Beliefs) ,, कौटुंबिक रचना, कल्पना, भाषा, राजकीय आणि आर्थिक प्रणाली . Family patterns, Ideas, Language, Political and economic systems
संस्कृतीचे 5 प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे.
संस्कृतीचे 5 प्रकार | 5 types of culture
१) लोकसंस्कृती | Folk culture
लोक संस्कृती म्हणजे सामान्य लोकांची संस्कृती होय. विशेषत: पूर्व औद्योगिक समाजामध्ये ( शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज, बागायती समाज, पशुपालक समाज, शेती व्यवसाय करणारा समाज ) राहणाऱ्या लोकांत आढळत होती. डॉमिनिक स्ट्रिनाटी (1995) म्हणतात की लोकसंस्कृती बहुतेकदा तळागाळातून अस्तित्वात येते किंवा निर्माण होते. लोक संस्कृती स्वयं-निर्मित आणि स्वायत्त असते. लोकसंस्कृती मध्ये लोकांचे जीवन आणि अनुभव थेट प्रतिबिंबित करते.
उदा.- लोक संस्कृतीमध्ये पारंपारिक गाणी व कथांचा समावेश होतो. अशी संस्कृती ही खासकरून एकसंघ असणाऱ्या ग्रामीण भागात आढळून येते.
२) मास / जन संस्कृती | Mass culture
मास कल्चर त्याच्या समीक्षकांच्या मते, लोकसंस्कृतीपेक्षा मास कल्चर हे कमी योग्य मानली जाते. जसे लोक संस्कृती हे पूर्व औद्योगिक समाजाचे वैशिष्ठ्य म्हणून पाहिल्यास, जन / मास संस्कृती हे औद्योगिक समाजाचे उत्पादन किंवा निर्माण म्हणू शकतो. मास कल्चर हे मूलत: मास मीडियाचे उत्पादन आहे, आणि
उदाहरणांमध्ये लोकप्रिय फिल्म्स, टेलिव्हिजन सोप ऑपेरा आणि रेकॉर्ड केलेले पॉप संगीत समाविष्ट आहे.
३) लोकप्रिय संस्कृती | Popular culture
लोकप्रिय संस्कृती हा शब्द बर्याचदा मास कल्चर सारखा प्रकारे वापरला जातो. लोकप्रिय संस्कृती ही मोठ्या संख्येने सामान्य लोकांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या सांस्कृतिक उत्पादन व घटकांचा समावेश होतो. अश्या संस्कृतीबाबत लोकांचा आक्षेप असत नाहीत. ही संस्कृती सगळ्यांना प्रचंड आवडते.
उदाहरणार्थ,
1) टीव्ही कार्यक्रम,
2) पॉप संगीत,
जसे की स्टार वॉर्स आणि हॅरी पॉटर मालिका आणि लोकप्रिय काल्पनिक कथा जसे की गुप्तहेर कथा. इत्यादी
लोकप्रिय संस्कृतीला काहीवेळा मास कल्चर देखील म्हटले जाते, ती अधिक व्यापक आणि प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, लोकप्रिय संस्कृतीचा उपयोग युरोप आणि युनायटेड स्टेट्समध्ये मनोरंजनासाठी मोठ्याप्रमाणात केला जातो. (उदाहरणार्थ) यात क्रीडा, दूरदर्शन, चित्रपट आणि
लोकप्रिय संगीत रेकॉर्ड केले.
४) उपसंस्कृती | Subculture
एका विशाल भारतीय समाजाच्या अंतर्गत जे अनेक समूह आहेत त्यांच्या त्यांच्या संस्कृत्या या वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेव्हा एकाच समाजातील विभिन्न समूहांच्या ज्या समूहविशिष्ट संस्कृती असतात, त्यांना उपसंस्कृती असे म्हणतात. परदेशात स्थायिक झालेले लोक आपल्या मूळ देशाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आपल्याबरोबर घेऊन तिथे जातात व तेथील संस्कृतीचे काही घटक ते आत्मसात करतात व दोहोंचे मिश्रण होऊन निराळीच संस्कृती अस्तित्वात येते तिलाही उपसंस्कृती असे म्हणता येईल.
५) प्रतिसंस्कृती | Counter-culture
समाजातील काही उपसंस्कृत्या मात्र समग्र समाजाच्या प्रस्थापित संस्कृतीला आव्हान देणाऱ्या असतात. जी उपसंस्कृती समाजाच्या प्रस्थापित संस्कृतीला आव्हान देणारी असते. तिला प्रति संस्कृती किंवा काउंटर कल्चर असे म्हणतात.
उदा. हिप्पी संस्कृती, संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांची संस्कृती.
संस्कृती या घटकावरील प्रश्ने व उत्तरे | QUIZ on Culture in Marathi
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा. संस्कृतीचे घटक | Aspects of culture | Element of culture in Sociology