संस्कृती म्हणजे काय | what is Culture | संस्कृतीची वैशिष्ठ्ये | Characteristics of Culture
संस्कृती ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे. ज्यामध्ये आपल्या सर्व जीवनपद्धतीचा समावेश होतो. उदा. वागण्याच्या पद्धती, आपले तत्वज्ञान आणि नैतिकता, आचार आणि विचार, चालीरीती आणि परंपरा, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि इतर प्रकारचे सामाजिक जीवन इत्यादी.
संस्कृती आणि समाज हे नाण्याच्या दोन बाजू आहे
संस्कृती ही मानववंशशास्त्रातील मुख्य संकल्पना आहे. परंतु समाजशास्त्रातील सुद्धा ही मूलभूत आहे. समाजाच्या संस्कृतीचे योग्य आकलन झाल्याशिवाय समाजाचा अभ्यास अपूर्ण ठरतो. संस्कृती आणि समाज हे नाण्याच्या दोन बाजू आहे. (Culture and society go together they are inseparable)
माणूस सांस्कृतिक वातावरणात जन्माला येतो आणि वाढतो. इतर प्राणी नैसर्गिक वातावरणात राहतात. (Culture refers to a system of learned behaviour which is shared by and transmitted among the members of a group.)
संस्कृतीची व्याख्या | Definition of culture
सर एडवर्ड बी. टायलर – संस्कृती ही अशी संकीर्ण समग्रता आहे की, ज्यात ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, कायदा, रूढी या व अशाच इतर पात्रतांचा व सवयीचा समावेश होतो आणि या गोष्टी व्यक्तीने समाजाचा सभासद या नात्याने संपादित केलेल्या असतात.
Sir Edward Tylor – Culture is that complex whole which includes knowledge, belief, art, morals, law, custom and any other capabilities acquired by man, as a member of society.
हरस्कोव्हिटस – संस्कृती हा पर्यावरणाचा मानवनिर्मित भाग होय.
J. M. Hetskovits “Culture is the man-made part of the environment”
डेसलर व विलीस – अनेक लोकांना समान असलेल्या आणि ज्यांचे लोकांकडून आपल्या मुलांकडे संक्रमण होते.ती कौशल्ये, श्रद्धा, ज्ञान, उत्पादित वस्तू अश्या सर्व गोष्टींचा संस्कृतीत समावेश होतो.
David Dressler and W. M. Willis “Culture consists sum of total of skills, beliefs, knowledge, and products and that are shared by a number of people and transmitted to their children.”
संस्कृतीची वैशिष्ठ्ये | Characteristics of Culture
1.संस्कृतीचे संपादन होते किंवा ती शिकून घेतली जाते. ( Culture is acquired or learned )
2.संस्कृतीचे संक्रमण होते.( Culture is transmitted )
3.संस्कृतीचे स्वरूप हे सामाजिक असते. ( Culture is social )
4.संस्कृती हा समाजाचा आदर्श होय.( Culture is ideals )
5.संस्कृती समाज सदस्यांना त्यांच्या गरजा भागवून समाधानी ठेवते.( Culture is satisfies needs of the members of society, hence it is gratifying )
6.संस्कृती अभियोजनक्षम किंवा अनुकुलक्षम असते. (Culture is adaptive )
7.संस्कृती ही एकात्मता निर्माण करणारी यंत्रणा होय. (Culture is integrative mechanism )
8. संस्कृती बदलत जाते.( Culture undergoes a process of change )
9. भाषा – संस्कृतीचे एक मुलभूत वैशिष्ट्य आहे.( Language – a basic characteristics of culture )
10. संस्कृती अमूर्त आणि अति वैयक्तिक असते. ( culture is abstract and I is super individuals )
11. संस्कृती व्यक्तींच्या मनात वास करीत असते. म्हणजेच तिचे व्यक्तींकडून आंतरीकरण होते. (Culture staying at individuals heart, it means internalization of culture happens by individuals.
12. प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगवेगळी असते. ( Every society have their own culture, every culture varies from society to society)
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट येथे वाचा:-
.